-
स्थळः कुण्या एका घाटातील एक अनामिक, पण नयनरम्य धबधबा काळः ऐन पावसाळ्याचा प्रसंग १: दिवसः आठवड्याअखेरचा वेळः ऐन दुपारची ऐन धुवांधार पावसात धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले उत्साही पर्यटक. दोन चार मिनीबसेस, पाच सहा ‘कॉर्पिओ’ आणि आठ दहा मध्यमवर्गीय गाड्या घाटरस्ता अडेल, वाहनांना, वाहतुकीला अडथळा होईल, याची फिकीर न करता उभ्या केलेल्या. एका स्कॉर्पिओवर थोरल्या आबासाहेबांचा फोटो/स्टिकर, मध्यमवर्गीय गाड्यांवर मागच्या काचेतून डोकावणार्या मांजरीचे, कुत्र्याचे किंवा वाघाचे चित्र... आणि हो, गाडी पार्क करताना ऐकू येणारी ‘सारे जहाँसे अच्छा’ ही रिवर्स इन्डिकेटर ट्यून. आसपास चहा, वडापाव, मक्याची भाजलेली कणसे यापासून थेट ‘टू मिनिट नूडल्स’ तयार करून देणारी टपरीवजा दुकाने नि हातगाड्या. एक रोमँटिक जोडी ध… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
मंगळवार, २५ जुलै, २०१७
एका धबधब्याचे विधिलिखित
गुरुवार, १३ जुलै, २०१७
अरे सेन्सॉर सेन्सॉर...
-
(बहिणाईची क्षमा मागून...) अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा उभा दारावर, आधी करावा सलाम, तेव्हा मियते मोटर । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्होटा कधी म्हनू नही अरे उदाच्या काडीला, सोटा कधी म्हनू नही । अरे सेन्सॉर सेन्सॉर, नाही सोचनं बिचनं येड्या पायातली व्हान, म्हनू नको रे तोरन । अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा कारल्याचा येल एक खुळं म्हनं गोड, बाकी सार्याले अकाल । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्हनू नको रे बहावा, त्याले नही पान फूल, वाजि होयबाचा पावा । देखा सेन्सॉर सेन्सॉर, शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे, मधी मठ्ठ सागर गोटे । ऐका सेन्सॉर सेन्सॉर, निर्हा पदाचा इचार, देते खोट्याले होकार, अन् खर्याले नकार । देखा सेन्सॉर सेन्सॉर, म्हनं फिल्लम सुधार आधी अक्कल उधार, त्यात पदाचा तेगार । अरे सेन्स… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)