Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼
सकाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ जुलै, २०१७

अरे सेन्सॉर सेन्सॉर...


  • (बहिणाईची क्षमा मागून...) अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा उभा दारावर, आधी करावा सलाम, तेव्हा मियते मोटर । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्होटा कधी म्हनू नही अरे उदाच्या काडीला, सोटा कधी म्हनू नही । अरे सेन्सॉर सेन्सॉर, नाही सोचनं बिचनं येड्या पायातली व्हान, म्हनू नको रे तोरन । अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा कारल्याचा येल एक खुळं म्हनं गोड, बाकी सार्‍याले अकाल । अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्हनू नको रे बहावा, त्याले नही पान फूल, वाजि होयबाचा पावा । देखा सेन्सॉर सेन्सॉर, शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे, मधी मठ्ठ सागर गोटे । ऐका सेन्सॉर सेन्सॉर, निर्‍हा पदाचा इचार, देते खोट्याले होकार, अन् खर्‍याले नकार । देखा सेन्सॉर सेन्सॉर, म्हनं फिल्लम सुधार आधी अक्कल उधार, त्यात पदाचा तेगार । अरे सेन्सॉर सेन्सॉर, वरी मोठा जादुगर याच्या पदाचा मालक; त्याच्यापुढी हे लाचार । असा सेन्सॉर सेन्सॉर, आधी ‘देवा’चा इचार मर्जी माझी तू सांभाळ, तुवा मिळंल मोकार। - बहिराभाई पायधरी - oOo - (दै. सकाळ - सप्तरंग पुरवणी दि. २० ऑगस्ट २०१७)

    पुढे वाचा »