-
१९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे बावीस वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१ मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून– त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन– आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. ही विश्वचषक स्पर्धा– त्याकाळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
Labels:
‘अक्षरनामा’,
क्रिकेट,
क्रीडा,
माध्यमे,
शक्यताविज्ञान
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
अर्थ-साक्षरता - २ : उत्पन्न आणि खर्च
-
अर्थ-साक्षरता आणि मी << मागील भाग उत्पन्नाचे नियोजन करता येत नाही, खर्चाचे करता येते. उत्पन्न आणि खर्च दरमहा उत्पन्न किती हाती यावे याचे नियोजन फार थोड्या व्यक्तींना करता येते. मासिक अथवा त्रैमासिक व्याज देणार्या मुदत-ठेवी, म्युच्वल फंडांच्या अथवा पोस्टाच्या ’मासिक परतावा योजना’ अथवा मालकीच्या घरांवरील ’रिव्हर्स मॉर्टगेज’सारख्या योजनांमधून नेमकी रक्कम दरमहा हाती पडेल अशी सोय करुन ठेवता येते.पण हा निवृत्तीनंतरचा विचार झाला, तोवर बचत आणि गुंतवणुकीचा विचार बव्हंशी कालबाह्य झालेला असतो. एरवी फारतर वेतनधारी मंडळींना दरमहा किती रक्कम हाती पडेल हे ठाऊक असते, ’किती पडावी’ यावर त्यांचेही फार नियंत्रण नसते. व्यावसायिक मंडळींना तेही शक्य नसते. तेव्हा आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा हा ’सरासरी मासिक उत्पन्नाचा अदमास घेणे’ हा असायला हवा… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)