-
अर्थ-साक्षरता आणि मी « मागील भाग --- उत्पन्नाचे नियोजन करता येत नाही, खर्चाचे करता येते. उत्पन्न आणि खर्च दरमहा उत्पन्न किती हाती यावे याचे नियोजन फार थोड्या व्यक्तींना करता येते. मासिक अथवा त्रैमासिक व्याज देणार्या मुदत-ठेवी, म्युच्वल फंडांच्या अथवा पोस्टाच्या ’मासिक परतावा योजना’ अथवा मालकीच्या घरांवरील ’रिव्हर्स मॉर्टगेज’सारख्या योजनांमधून नेमकी रक्कम दरमहा हाती पडेल अशी सोय करुन ठेवता येते.पण हा निवृत्तीनंतरचा विचार झाला, तोवर बचत आणि गुंतवणुकीचा विचार बव्हंशी कालबाह्य झालेला असतो. एरवी फारतर वेतनधारी मंडळींना दरमहा किती रक्कम हाती पडेल हे ठाऊक असते, ’किती पडावी’ यावर त्यांचेही फार नियंत्रण नसते. व्यावसायिक मंडळींना तेही शक्य नसते. तेव्हा आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा हा ’सरासरी मासिक उत्पन्नाचा अदमास घेणे’ हा असायला हवा. कार… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
अर्थ-साक्षरता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
अर्थ-साक्षरता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
अर्थ-साक्षरता - २ : उत्पन्न आणि खर्च
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२
अर्थ-साक्षरता - १: अर्थ-साक्षरता आणि मी
-
मागील आठवड्यात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची बातमी आली होती. त्यापूर्वीही अशा अनेक प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर अथवा उतारवयामध्ये सहन कराव्या लागणार्या आर्थिक चणचणीच्या बातम्या आलेल्या होत्या. यात अगदी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान, जुन्या जमान्यातील यशस्वी अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचाही यांचाही समावेश होता. त्यानिमित्ताने उतारवयातील खर्चाची तरतूद म्हणून बचत आणि आर्थिक-नियोजन याबाबत बालक-पालक नावाचा एक लेख इथेच लिहिला होता. मुद्दा असा होता की कारकीर्दीच्या शिखरावर असताना अमाप- निदान सामान्यांपेक्षा कैकपट- पैसा मिळवणारी ही मंडळी आर्थिक विपन्नावस्थेत जातात याचे कारण न केलेले, अथवा करुन फसलेले आर्थिक नियोजन असते. चार गाड्या बाळगणार्या, एकाहुन अधिक घरे मालकी… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

