-
प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा ‘मी’ होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता. माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, ‘तसा मी’ चा ‘असा मी’ होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले. या निमित्ताने इतरांनाही स्वतःमधे डोकावून पाहण्याची संधी मिळेल नि त्यातून आदानप्रदान होईल ज्यातून काही नवे सापडेल, आपले आपल्यालाच काही अनपेक्षित सापडून जाईल असा आमचा होरा आहे. त्याला अनुसरून लेख लिहा… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०१४
तसा मी... असा मी, आता मी
रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४
जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला
-
एखाद्या चित्रपटाने डोके भणाणून गेले किंवा व्यापून राहिले की काहीतरी खरडण्याची माझी जुनीच खोड आहे. पण एखाद्या चित्रपटाने झोप उडवल्याने गद्याऐवजी कवितेच्या माध्यमाची निवड केली अशी ही एकच घटना. अनेक चित्रपट, चरित्रे असोत कि कथानके, त्यात एकच प्रसंग वा तुकडा असतो ज्याच्या भोवती सारा भवताल फिरतो. ‘फँड्री’मधला शेवटाकडचा विहिरीचा प्रसंग असाच. त्या भोवतीच उगवून आलेली ही कविता. डोक्यातला सारा संताप, सारं वैफल्य तिने शोषून घेतलं न मला मोकळं केलं. काल संध्याकाळी फँड्री पाहिला त्यानंतर घरी आलो ते हे तुफान डोक्यात घेऊनच. शेवटच्या डुकराच्या पाठलागात त्या डुकराच्या जागी जब्या दिसू लागला नि डोकं सुन्न झालं. त्यातच चित्रपट पाहताना आणि पाहून बाहेर पडताना असंवेदनशील प्रेक्षकांनी केलेली शेरेबाजी नि मतप्रदर्शन ऐकून डोकं आणखीनच आउट झालेलं. घरी येऊन ते डोक… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)