Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, १६ मार्च, २०१९

अकर्मक पुरोगामी आणि राजकीय पर्याय


  • स्वत:ला पुरोगामी विचारवंत म्हणवणारे ’हे ही वैट्टं, ते ही वैट्टं, ते तर वैट्टंच वैट्टं’ करत बसले आहेत. राजकारणात - रोजच्या जगण्यातसुद्धा - सर्वगुणसंपन्न पर्याय मिळत नसतो. ६०-७०-८० टक्के गुणवान मिळाला तरी हत्तीवरुन साखर वाटावी अशी स्थिती असते. (रोज आरशात पाहतो ना आपण!) तुम्ही राजकारणात उतरुन तुमच्या पवित्र मार्गाने यशस्वी होऊन दाखवू शकत नसाल, तर तो मार्ग कितीही पवित्र असला तरी वाहतुकीस बिनकामाचा म्हटला पाहिजे. पुस्तकातले तत्त्वज्ञान माणसांपर्यंत पोचत नसेल तर त्या बुद्ध्यामैथुनापलिकडे महत्त्व देता येणार नाही . संकल्पचित्र https://www.deccanherald.com/ येथून साभार या अकर्मक पुरोगाम्यांचे बहुधा असे असावे की ’शहरातले सगळे ट्रॅफिक सिग्नल हिरवे झाल्याखेरीज मी गाडी गॅरेजबाहेर काढणार नाही.’ परिण… पुढे वाचा »

रविवार, ३ मार्च, २०१९

अग्गोभाई आणि भकोभाई


  • बाबा : मी आदि शंकराचार्यांचा खापरपणतू आहे. भक्त कोरस (भ.को.) : बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय. एक उपस्थित (ए.उ.) : पण शंकराचार्य तर... सदर meme आंतरजालावरुन कायप्पामार्गे (WhatsApp) प्राप्त झाले आहे. बाबा: (त्याचे बोलणे तोडून) मी आईन्स्टाईनचा तिसरा अवतार आहे. भ.को.: बोला तिसरे आईन्स्टाईन अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय. ए.उ.: पण आईन्स्टाईन तर मागच्या श... बाबा: (त्याचे बोलणे तोडून) माझ्या तिसर्‍या अवतारात मी आर्यभटाकडून आर्यभटीय लिहून घेतले. (भक्त बावचळून आर्यभट कोण हा प्रश्न चेहर्‍यावर आणून एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात.) बाबा: (जोरात खाकरतात.) भ.को.: (भानावर येऊन) बोला आर्यभट-गुरु अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग… पुढे वाचा »

शनिवार, २ मार्च, २०१९

छोटा शेल्डन आणि छद्मराष्ट्रवाद


  • विषयसंगतीमुळे हा लेख काही संस्करणासह ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. हा लेख इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »