Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

पौरुषाचा कांगावा


  • महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी आपले नेहमीचे वरणभाताशी असलेली ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्‍या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला. मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव… पुढे वाचा »