Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १


  • बहुप्रतीक्षित नोबेल शांतता पुरस्कार अखेर जाहीर झाला. सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विरोधक असलेल्या, ‘आपल्या देशात अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करावा’ अशी मागणी करणार्‍या आणि जगभरात सर्वाधिक खनिज तेलाचे साठे असलेल्या त्या देशातील ते साठे भांडवलदारांच्या ओटीत टाकण्यास उत्सुक असणार्‍या, व्हेनेझुएलाच्या मारिया मच्याडो यांच्या पदरात हा पुरस्कार पडला. मच्याडो यांचा राजकीय दृष्टीकोन शांततावादी मुळीच नाही. नोबेल शांतता कमिटीने बहुधा ‘समाजवाद नि समाजवादी विरोधक = शांततावादी’ ही सोपी व्याख्या स्वीकारली असावी. विध्वंसाचे हत्यार असलेल्या डायनामाईटच्या विक्रीतून अमाप पैसा केलेल्या नोबेलने हा पुरस्कार ठेवलेला असल्याने अंतर्विरोध हा त्याचा स्थायीभाव असा पुन्हा-पुन्हा दिसतो. पण मच्याडोंना हा पुरस्कार मिळाला यापेक्षा, ‘मी आठ युद्ध थांबवली, मला नोबेल शांतता… पुढे वाचा »