Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, १४ मे, २०१०

होते कुरूप वेडे (कथा)


  • (Italo Calvino यांच्या The Black Sheep या कथेचा स्वैर अनुवाद.) कोण्या एका गावी सगळेच चोर होते. प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतून येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई. या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम… पुढे वाचा »

बुधवार, ५ मे, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५


  • << मागील भाग काही काळापूर्वी सत्यजित रे यांच्या चित्रपटांची एक दोन परिच्छेदात ओळख करून देणारे अमृत गंगर यांनी लिहिलेले एक लहानसे पुस्तक (प्रकाशक लोकवाङ्मय गृह) वाचले होते. त्यांनी हा चित्रपट ‘भारतातील अंधश्रद्धेवर आसूड ओढणारा होता’ असे म्हटले आहे. तसेच तो प्रकाशित झाला तेव्हा अनेक धार्मिक संघटनांनी त्याविरुद्ध गदारोळ केला अशी माहिती दिली आहे. आता डावे नि उजवे यांचे ज्यावर एकमत झाले आहे त्याबाबतच मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. मला वाटते इथे आपले टिपिकल भारतीय मन विचार करते आहे. आपल्याला जसे ‘असावे असे वाटते’ तसे ‘आहे’ असा आपला समज असतो. वरवर न पाहता, थोडे वस्तुनिष्ठ होऊन बारकाईने पाहणे आपल्याला जमत नाही. चटकन एक शिक्का मारला की आपण ‘वा’ म्हणायला किंवा दगड मारायला मोकळे होतो. मुळात ही शोकांतिका ही व्यक्ती-समष्टीची लढाई आहे, माणसे न… पुढे वाचा »