Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - १ : उपोद्घात


  • “हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने” असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. “माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत! भंडारा कधी काळा, राखेसारखा असतो होय? तो असतो हळदीचा पिवळा जर्द.” “मग काय!, हा पिवळाच आहे की!” भुत्याने खवचटपणे हसून म्हटले. “अरे, हा तर अगदी राखेसारखा काळाढुस्स आहे.” रामण्णाने अगदी नेटाने स्पष्ट सांगितले. “हे बघ पंडित, तू म्हणतोस हा काळा आहे, मी म्हणतो हा पिवळा आहे. म्हणजे हा भंडारा काळाही असेल, पिवळाही असेल, होय की नाही? पण तू अगदी छातीवर हात ठेवून तो काळाच आहे असं कसं सांगतोस? पाव्हण्या, जरा आजूबाजूला बघ, आहे आणखी कोणी तिसरं माणूस? तर नाही... अख्ख्या जगात तू आणि मीच आहो. तू एका बाजूला, मी एका बाजूला. तुझ्या बोलण्याला माझ्या … पुढे वाचा »