एका देहाच्या कुडीत वास्तव्यास असणारी विविधरंगी व्यक्तिमत्वे, तिच्यावर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी झटू लागतात... ...तेव्हा तुम्ही काय करता? त्या कुडीत वास्तव्यास असलेला तत्त्वज्ञ व्यक्ती-समष्टीचे कोडे उलगडून सांगताना मध्येच थकून झोपी जातो... ...तेव्हा तुम्ही काय करता? त्या निद्रिस्त तत्त्वज्ञाची प्रतारणा करत एखाद्या वारयोषितेसारखी तुमची प्रवृत्ती तुमच्यातल्याच विदूषकाचा हात धरते... ...तेव्हा तुम्ही काय करता? अजरामर अशा हॅम्लेटच्या भूमिकेऐवजी तुमच्यातला नट, रंगमंचावरील निश्चल ठोकळ्याची भूमिका स्वीकारू इच्छितो... ...तेव्हा तुम्ही काय करता? तुमच्यातील सुरेल-सूर-मग्न संगीत-प्रेमी षड्ज-पंचमांच्या आधार स्वरांना त्यागून धर्मस्थळांतील गोंगाटाला शरण जातो... ... तेव्हा तुम्ही काय करता? सत्तेच्या खेळात निष्णात असलेला तुमच्यातील राजकारणी, जेव्हा ’इदं न मम’ म्हणत संन्यस्त होतो... ... तेव्हा तुम्ही काय करता? मनात सदैव बागडत असलेला रोमिओ आपल्या सद्गुण-सालंकृत सखीऐवजी एखाद्या स्वार्थ-साधिकेवर लुब्ध होतो... ... तेव्हा तुम्ही काय करता? देहा-मनाला आत्यंतिक क्षुब्ध करणार्या प्रश्नावर, एखादा लेख लिहित असताना कागदावर एखादी कविताच उमटते... ...तेव्हा तुम्ही काय करता? - डॉ. मंदार काळे
- oOo -
‘वेचित चाललो...’ वर :   
अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती       न स्त्री स्वातंत्र्यमर्हती       धारयते इति धर्मः ?       स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)       स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)       वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा       माझा बाप       स्वप्न-वास्तव-सत्ता      
गुरुवार, ५ जुलै, २०१८
...तेव्हा तुम्ही काय करता?
संबंधित लेखन
अनुभव
कविता
साहित्य-कला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा