-
पुण्यात शुक्रवार पेठेत मंडईजवळ एका रहात असताना आम्हा पोराटोरांनीही आमचे स्वतःचे एक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले होते. सार्या गल्लीत तेवढे एकच मुलांचे गणेशोत्सव मंडळ होते. (पाच-सहा वर्षांनंतर आणखी एका वाड्यात तसा प्रयत्न झाला, पण तो फसला. ‘फाटाफूट नि आम्ही लै भारी’ हे तेव्हाही अनुभवत होतो. :) ) सार्या गल्लीभर फिरून वर्गणी जमा केली जाई. त्या परिसरात ‘अखिल मंडई मंडळा’सह एकुण आठ(!) मंडळे होती/आहेत. मंडईचे मंडळ जरी वर्गणी गोळा करत नसले, तरी उरलेल्या मंडळांना वर्गणी द्यावीच लागे. आजच्याप्रमाणे मंडळे थेट राजकारणी गुंडांच्या ताब्यात गेली नसली, तरी स्थानिक पुंडांच्या ताब्यात होतीच. तेव्हा तिथल्या लोकांना गणेशोत्सव म्हटले की पोटात गोळाच येत असणार. (अर्थातच आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांना ते समजावं हे वय नव्हतं.). तरीही एखाद-दुसरा खवट म्हातारा वगळला, … पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४
नॉस्ट्याल्जिआ ऊर्फ आमचाही गणेशोत्सव
गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४
एक बिम्म नि दोन बब्बी
-
सुटणारे पोट नि वाढणारा रक्तदाब या नव्या सुखवस्तू जगाच्या देणग्यांपासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी हल्ली दिवसाचा एक तास फिरण्यासाठी राखून ठेवला आहे. सामान्यपणे वर्दळ कमी असते अशा वेळी ही एक तासाची फेरी घडते. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. निम्मी फेरी संपवून परतीच्या वाटेवर होतो. रस्त्यात एके ठिकाणी कचराकुंडी आहे. त्याच्या आसपास बर्याच अंतरापर्यंत कचरा लोकशाही पद्धतीने ऐसपैस पसरलेला असतो. त्यामुळे श्वानपंथीय देखील वहिवाटीच्या हक्काने तिथे वावरत असतात. यातच एका कुत्रीची दोन पिले - एक पांढरे नि एक कबरे - तिथे लुडबुडत असतात. पिले तशी धीट नि चटपटीत. आज तिथे दहा-बारा वर्षांच्या दोन शाळकरी मुली थांबल्या होत्या. शाळेच्या वेशात नसल्या तरी पाठीवर सॅक ऊर्फ दप्तर असल्याने बहुधा क्लासच्या वाटेवर असाव्यात. त्या दोन पिलांना पाहून त्या थांबल्या. साय… पुढे वाचा »
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४
आरसा दाखवणारा ‘रेगे’
-
पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो. दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच. पण त्याच वेळी ‘आयला, आपण पहिल… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)