Game of Thrones या मालिकेतील The House of Black and White (Season 5, Episode 2) या भागातील एक स्थिरचित्र.
ते होतं शहर गुलामांचं... तिथे मूठभर मालक नि ढीगभर गुलाम. ती, एक परागंदा राणी... अवतरली तिथे, त्यांची मसीहा म्हणून तिने तोडल्या त्यांच्या शृंखला तिच्या एकनिष्ठ सैनिकांच्या मदतीने त्यांच्या हाती तिने दिली त्यांना दुर्मिळ अशा स्वातंत्र्याची सनद! ते 'स्वतंत्र गुलाम' म्हणाले, ही तर आमची 'मिसा', साक्षात माता ! ती निघाली पुढल्या शहरी, द्यायला आणखी स्वातंत्र्याच्या सनदा पण इकडे ते माजी गुलाम, आता रुतले स्वार्थ नि परस्पर तंट्यात जेंव्हा ते सारे गुलाम झाले तेव्हाच गहाण पडले त्यांचे विचारही त्यांच्या छाताडावर आता पुन्हा स्वार झाले त्यांचे माजी मालक या गुलामांना नसते समज आपली सत्ता आपणच राबवण्याची! विपदांच्या निवारणासाठी ते सतत शोधत असतात एक त्राता! निरुपायाने परतली 'मिसा', त्यांची राज्ञी म्हणून, शासक म्हणून... मग तिने उभी केली तिथे व्यक्तिनिरपेक्ष अशी न्यायव्यवस्था पण नव्या शासकाविरुद्ध कारस्थाने करत होते ते जुने मालक कुणी एक सापडला अखेर, राज्ञीच्या एकनिष्ठ सैनिकांच्या हाती. 'हे सुधारणार नाहीत कधी, मृत्युदंडच द्या यांना' गर्जून उठले तिचे नवे सहकारी, तेच ते पूर्वीचे गुलाम... राज्ञी होती न्यायप्रिय, म्हणे न्याय असतो समान माजी गुलाम, माजी मालक, नवे शासक, सार्यांसाठी... या आरोपीला का नसावा अधिकार, निवाड्याचा? आरोपी नसतो गुन्हेगार, गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय गुलामांना समजत नसतात न्यायनिवाडे वगैरे त्यांना फक्त ठाऊक, करावी गुलामी वा करावी हत्या शेवटी केली हत्या त्या बंधकाची, माजी गुलामाने नव्या सत्तेजवळ असलेल्या सहकार्यांच्या मदतीने! आणि तोच ठरला गुन्हेगार, नव्या न्यायव्यवस्थेचा ! अधिकार नसतो एकाला, दुसर्याची हत्या करण्याचा ! न्यायप्रिय 'मिसा'ने दिला मृत्युदंड त्याला... कारण हक्कही असतात सर्वांसाठी सारखे माजी गुलाम, माजी मालक... सार्यांसाठीच! पण त्याचे सारे भाईबंद, ते सारे माजी गुलाम आक्रोशले, म्हणाले क्षमा कर त्याला, हे माते, शेवटी एका गुन्हेगारालाच तर मारले ना त्याने? न्यायप्रिय मिसाने न्यायाचे पावित्र्य जपले आणि दिला मृत्युदंड त्या गुन्हेगाराला. पण... गुलामीच्या काळात नव्हते घडले असे काही घडले पेटून उठले सारे ते माजी गुलाम, आणि म्हणाले 'हा आमचा बंधू, तू आमची माता; याला माफ करणे हे असायला हवे होते कर्तव्य तुझे, तेच होते योग्य' 'आता क्षमा नाही तुला', कारण... न्याय असावा लागतो धार्जिणा, आमच्याच गटाला तसा तो नसेल तर बरे होते की गुलामीचेच दिवस हाती दगड असलेले डोके म्हणाले करू निर्माण आपली नवी व्यवस्था जिथे गुलामच होतील मालक आणि मालकांचे होतील गुलाम नवी व्यवस्था असेल श्रेष्ठ, फक्त आम्हा जुन्या गुलामांसाठी... न्यायव्यवस्था नाही करू शकली मिसाचे रक्षण शस्त्रधारी हत्यार्यांचेच घ्यावे लागले संरक्षण अखेर निष्ठावंत, 'विकत घेतलेल्या' सैनिकांनीच जीव वाचवला 'मिसा'चा, रक्तरंजित हातांनी! झाला बेफाम वर्षाव दगडांचा निसटून जाणार्या त्या राणीवर भिरकावलेल्या त्या दगडांखाली चिरडले न्यायव्यवस्थेचे कलेवर... -oOo-
Game of Thrones या मालिकेतील Mossador's Execution प्रसंगावर आधारित.
Mast. Episode dolyasamor ubha rahila. Dragon ne pan vishvas ghat kelyasarkhe vatat ahe tila dothraki chya pradeshat anun. Baghu pudhe Kay kalatni milte te
उत्तर द्याहटवाThanks for the feedback.
हटवा