-
विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट विस्तारासह ‘ बोर्डचाट्याच्या शोधात ’ या शीर्षकाखाली ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. - oOo - पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
सोमवार, २१ मार्च, २०१६
एवरीबडी लव्ज् रेमंड...
शुक्रवार, १८ मार्च, २०१६
ते काहीच म्हणाले नाहीत...
-
काल ‘ते म्हणाले’ , आज ‘ ’ते काहीच म्हणाले नाहीत‘ ’. त्यांना फारच डिवचलं तेव्हा म्हणाले, ‘There I spoke, here I remain silent’ त्यांचे आडगल्लीतले उपाध्यक्ष म्हणाले ‘याची जीभ कापा, पाच लाख देतो’ ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांचे लोकनियुक्त खासदार म्हणाले ‘याची तंगडी मोडा, अकरा लाख देतो’ ... ते काहीच म्हणाले नाहीत... यांच्या ‘संन्यासी’ नेत्या म्हणाल्या ‘त्यांना’ पुरे निखंदून काढा ... ते काहीच म्हणाले नाहीत त्यांची चिल्लीपिल्ली म्हणाली ‘त्या’ लोकांना गो़ळ्या घाला ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांचा ओसाडवाडीचा नेता म्हणाला ‘ते’ सगळे देशद्रोही आहेत, ठार मारा ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांची वानरसेना म्हणाली सगळ्या पुरोगाम्यांना फाशी द्या ... ते काहीच म्हणाले नाह… पुढे वाचा »
गुरुवार, १७ मार्च, २०१६
ते म्हणाले...
-
ते म्हणाले, तुम्ही ‘भारतमाता की जय’ म्हटलेच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले ‘जय जगत्’, कुणी म्हणाले, ‘आम्ही म्हणणार नाही.’ नकार देणार्यांना त्यांनी निलंबित केले. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराज की जय’ म्हटलेच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले ‘केम?’, कुणी म्हटले ‘आम्ही म्हणणार नाही’ नकार देणार्यांना त्यांनी निलंबित केले. ते म्हणाले, तुम्ही ‘वंदे मातरम्’ म्हटलेच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले गोल टोपीवाले म्हणाले, ‘आम्ही म्हणणार नाही.’ नकार देणार्यांना त्यांनी निलंबित केले. ते म्हणाले, तुम्ही तिरंगा उंच फडकवलाच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले तळमजल्यावरचे म्हणाले ‘आम्हाला शक्य नाही.’ तळमजल्यावरच्यांना त्यांनी ‘निलंबित’ केले. ते म्हणाले, ‘जय श्रीराम, जय रामराज्य… पुढे वाचा »
मंगळवार, ८ मार्च, २०१६
ऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी
-
क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल << मागील भाग जानेवारी महिन्यात फ्रेंच नियतकालिक ‘चार्ली हेब्दो’ने एक व्यंगचित्र प्रकाशित केले. त्यात त्यांनी ‘अलान कुर्दी’ या भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळालेल्या तीन वर्षाच्या सीरियन निर्वासिताबद्दल अश्लाघ्य टिपणी केली होती. हा तोच अलान होता, ज्याच्या समुद्रकिनारी वाळूत विसावलेल्या मृतदेहाचे छायाचित्र गेल्या सप्टेंबर महिन्यात जगभर पसरले आणि देशोदेशीच्या शांततावाद्यांना झडझडून जागे केले होते. हे ‘चार्ली हेब्दो’ तेच होते ज्याच्या कार्यालयावर इस्लामी माथेफिरुंनी हल्ला करून त्यांच्या अकरा सदस्यांना ठार मारले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या शांततावादी समाजाला या निमित्ताने त्यांनी तोंडघशी पाडले आणि जगात शांततावादी, स्वातंत्र्यवादी कि… पुढे वाचा »
Labels:
‘पुरोगामी जनगर्जना’,
आंतरराष्ट्रीय,
जिज्ञासानंद,
राजकारण,
व्यक्तिमत्व,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)