-
तुम्ही जन्माला येता, त्यानंतर सुरुवातीची एक दोन वर्षे तुमचे जन्मदाते/पालक तुम्हाला तुम्हाला लंगोटात लपेटून टाकतात. तुमचे नियंत्रण नसलेल्या उत्सर्जितांनी तो लंगोट खराब झाला, की बदलण्याचे कामही तेच करत असतात. सोबत तुम्हाला आहार देणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादि जबाबदार्याही त्या पालकांनीच स्वीकारलेल्या असतात. थोडक्यात तुम्ही तुमचे पालक आणि तो लंगोट यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असता. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने तुमची ’त्या आई-बापाचे मूल’ याहून कोणतीही वेगळी ओळख नसते. कारण अजून तुम्ही खूप लहान असता. स्वत:च्या पायावर उभे राहणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याला आवश्यक असणारे शारीर बळ, कुवत आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो. तुमच्या आयुष्यातील सर्वस्वी परावलंबी काळाचा आधार म्हणून त्या लंगोटाचे स्थान असते . … पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
मंगळवार, २६ जानेवारी, २०२१
‘लंगोटाची उपासना’ ऊर्फ ‘भूतकालभोग्यांची आस, आभास आणि अट्टाहास’
Labels:
‘अक्षरनामा’,
तत्त्वविचार,
भूमिका,
संस्कृती,
समाज
रविवार, १७ जानेवारी, २०२१
चर्चा अजून संपलेली नाही...
-
चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू. --- पोस्ट: या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू. प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का? प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात. प्रतिसाद ३: आपल्या देशातील … पुढे वाचा »
गुरुवार, १४ जानेवारी, २०२१
समीक्षक
-
(अनुभवातून...) अमुकचे नवीन विनोदी पुस्तक आले... तो म्हणाला... ’ह्यॅ: सगळा मध्यमवर्गीय कचरा. यात सामाजिक खोली नाही.’ तमुकची सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली. तो म्हणाला... ’ह्यॅ: संकुचित परिघात फिरते. तिला वैश्विक परिमाण नाही.’ ढमुकचा नवा कथासंग्रह आला. तो म्हणाला... ’ह्यॅ: उगाच आव आणणारे लेखन. घाटाचा नीट अभ्यास नाही.’ चामुकचा नवा कवितासंग्रह आला तो म्हणाला... ’ह्यॅ: पोज घेऊन केलेले लेखन. त्याला अनुभवसंपृक्ततेची जोड नाही. चापलूसचा नवा चारोळीसंग्रह आला तो म्हणाला... ’ह्यॅ: नुसत्या अनुभवाच्या रांगोळ्या. त्याला वैचारिक बैठक नाही.’ पामुकची (१) नवी कादंबरी आली. पानेही न फाडता तो म्हणाला... ’ह्यॅ: आपल्याकडे कुणाला जमणार नाही. कथानक असे खोल उतरले पाहिजे.’ आणि… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)