-
कधी पापा, पाठीवर थापा कधी हपापा, कधी गपापा कधी थट्टा, कधी रट्टा कधी सत्ता, कधी बट्टा कधी चंदन, कधी भंजन कधी खंडन, कधी भांडण कधी झेंडा, कधी दंडा कधी चंदा, कधी गुंडा कधी थाप, कधी व्हॉट्स-अॅप कधी चाप, कधी मार-काप कधी खांदा, कधी फंदा नाही मंदा, कधी धंदा - रमताराम पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३
सत्तेचे सोपान
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
जम्प-कट - २ : अन्नं वै प्राणिनां प्राणा
-
मानवी जीवनप्रवासाचा ‘जम्प-कट’ << मागील भाग --- अन्नं वै प्राणिनां प्राणा । अन्नमोजो बलं सुखम् । तस्मात्कारणात्सद्भिरन्नदः प्राणदः स्मृतः ।।" - (भविष्यपुराण--१६९.३०) अन्न हेच प्राणिमात्रांचा प्राण आहे. अन्न हे ओज, बल आणि सुखही आहे. यास्तव अन्नदात्यालाच प्राणदाताही म्हटले जाते. --- या जीवसृष्टीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी त्याच्या आहार आणि संरक्षण या दोन मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी लागते. प्रत्येक प्राण्याच्या आयुष्याच्या मोठा भाग या दोन गरजांनी व्यापलेला असतो. बारकाईने पाहिले तर या दोनही गरजा परस्परांशी निगडितच दिसतात. जीवो जीवस्य जीवनम् जीवसृष्टी ही ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या तत्त्वाच्या आधारे चालणारी एक प्रकारची बंदिस्त… पुढे वाचा »
फुकट घेतला मान
-
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक धोरणांबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करणारा अमेरिकास्थित ’हिन्डेनबर्ग’चा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या शेअर्सनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांच्यामार्फत गुंतलेल्या सर्वसामान्यांच्या पैसा धोक्यात आला. अदानींनी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याऐवजी राष्ट्रवादाची ढाल पुढे केली. त्याला अनुसरून स्वयंघोषित राष्ट्रभक्तांचे बुद्धिहीन जथे अदानींच्या समर्थनार्थ धावले... ( शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांची क्षमा मागून...) “नाही खर्चली कवडी दमडी, नाही सांडिला घाम फुकट घेतला मान, भाऊ (१) मी फुकट घेतला दाम.” “कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे हुशारी; देशबंधूच्या बचतीतील मी, सहज … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)