-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) पहिले पाऊल « मागील भाग --- हा बिम्म आहे( https://riseandshine.childrensnational.org/ येथून साभार.) ‘बखर बिम्मची’ हाती घेतल्या घेतल्या ‘बिम्म’ हे कथानायकाचे नाव ऐकूनच वाचक प्रथम बुचकळ्यात पडतो. वाटतं ‘अरे, हे काय नावं आहे?’ पण तुम्हा-आम्हालाच का, बिम्मलाही हाच प्रश्न पडायचा ना, ‘आपले नाव बिम्म का आहे?’ असा. त्यावरचे उत्तर भलतेच मासलेवाईक आहे. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार ‘बब्बीने – त्याच्या बहिणीने – प्रथम आपल्या या भावाला पाहिले तेव्हा ती म्हणाली, ‘हा बिम्म आहे!’ म्हणून त्याचे नाव बिम्म.’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि या तिसर्याच वाक्याने मला खिशात टाकले होते. लहान मुला… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
बुधवार, २९ मार्च, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - २ : हा बिम्म आहे
रविवार, २६ मार्च, २०२३
राजसा, किती दिसांत...
-
उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment... ( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.) ( कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून.. .) आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत मोकळे करून टाक एकवार सर्व अंग काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी त… पुढे वाचा »
गुरुवार, २३ मार्च, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल
-
(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास) रांगते लहान मूल जेव्हा प्रथम एखाद्या गोष्टीला धरून दोन पावले टाकते, तेव्हा त्याला ‘चालणे’ या क्रियेचा वा हालचालीचा शोध लागतो. यात त्याने ज्या जड गोष्टीचा आधार घेतलेला असतो अशा– भिंत, टेबल, खुर्ची, पलंग वगैरे वस्तूंना पकडले, की आपण केवळ उभेच राहू शकतो असे नव्हे, तर पायांची हालचाल केल्यावरही पडत नाही इतका आधार मिळतो, याचे भान त्याला येत असते. परंतु याने आधाराचे भान आले तरी ‘खोली’चे येत नाही. म्हणून मग पलंगावर उभे राहून चालता चालता पलंगाच्या वा सोफ्याच्या कडेपाशी पोचते तेव्हा थांबावे हे त्याला समजत नाही. जेव्हा ते पायाखालची जमीन संपून धाडकन पडते, तेव्हाच त्याला पायाखाली नेहमीच आधार असतो असे नाही याचे भान येते. मग ते एक एक पाऊल टाकताना जमि… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


