-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) पाऊस « मागील भाग --- काही वर्षांपूर्वी ‘सिंडरेला’ या गाजलेल्या परीकथेवर आधारित एक चित्रपट पाहिला होता. मध्यरात्रीचे टोले ऐकून घाईने निघून गेलेल्या सिंडरेलाचा काचेचा (१) बूट निसटून पडतो. तिच्या प्रेमात पडलेला राजपुत्र तो घेऊन तिचा शोध घेण्याचा मनोदय जाहीर करतो. ‘इतक्या सार्या प्रजेमध्ये हा बूट कुणाचा असेल हे कसे शोधणार?’ या प्रश्नावर राजपुत्र म्हणतो, ‘Every shoe has a foot that fits.’ आणि तो त्या बुटाच्या मालकिणीच्या शोधात निघतो. आज भांडवलशाहीच्या जमान्यामध्ये विशिष्ट व्यक्तिच्या पायाच्या नेमक्या मापानुसार पादत्राणे, बूट शिवणारे चर्मकार दुर्मिळ झाले आहेत. पावलांच्या निव्वळ लांबीवरून बारा-चौदा आकारांत ठोक वर्गीकरण करून जगभरात… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
बिम्मच्या पतंगावरून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बिम्मच्या पतंगावरून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ९ : Foot that fits
शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ८: पाऊस
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास. ) अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन « मागील भाग --- सध्या पाऊस देशातून माघार घेण्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जीवनदायी पाण्याचा मुख्य स्रोत हा मोसमी पाऊसच असतो. अगदी गेल्या शतकाअखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून. त्यामुळे पाण्याबरोबरच अन्नाचा पुरवठाही त्याच्यावरच अवलंबून. या टप्प्यावर ‘या वर्षी पावसाने काय दिले?’ याचा आढावा घेतला जात असतो. पाऊस पुरेसा पडला की अधिक पडला, ओला दुष्काळ की कोरडा दुष्काळ, याबाबतचे आडाखे घेण्यास आता सुरुवात होईल. कारण पाऊस हा ‘पुरेसा’ कधीच होत नाही. कधी– वा कुठे, तो जेमतेम तहान भागवण्याइतक्या पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहायला लावतो,… पुढे वाचा »
गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ७: अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) रंगांचे कोडे « मागील भाग --- बिम्मच्या पतंगावरून आतापावेतो झालेल्या प्रवासामध्ये त्याने प्रतिबिंब, सावली, पक्षी, रंग, फळे यांच्या संदर्भात निरीक्षण-शक्तीचा उपयोग केला आहे. त्याद्वारे भवतालाचे आकलन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या सर्व टप्प्यांमध्ये तो केवळ निरीक्षक आहे, जिज्ञासू आहे. त्याची भूमिका अकर्मक आहे. भवतालावर परिणाम घडवणारी कोणतीही कृती त्याने अद्याप केलेली नाही. निरीक्षणांकडून अनुकरणाकडे जाण्याची, अकर्मकता झाडून सकर्मक होण्याची, कृतीप्रवण होण्याची वेळ आता आलेली असते. आयुष्याचा प्रवास बिम्म जेव्हा सुरु करतो, तेव्हा स्वत:हून केलेली पहिली कृती असते ती पहुडल्या ठिकाणी पालथे पडणे. ही पहिली कृती घरच्या मोठ्यांकडून नावाजली गेली… पुढे वाचा »
गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ६ : रंगांचे कोडे
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) खेळ सावल्यांचा « मागील भाग --- एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. ही वस्तू बिम्मने प्रथमच पाहिली. ‘ते काय आहे नि त्याचा उपयोग काय?’ असा प्रश्न चौकस बिम्मला पडला नसल्यासच नवल. ‘तो एक पिंजरा आहे नि ते एका पिवळ्या(!) पक्ष्याचे घर आहे.’ असे आईने त्याला सांगितले. मागच्या आवारात वा बागेत खेळताना त्याने अनेक पक्षी पाहिले होते, त्यामुळे त्याला पक्षी ठाऊक होते. पण आईने वापरलेला ‘पिवळा’ हा शब्द, ही गोष्ट काय असावी असा प्रश्न त्याला पडला असेल. त्यातून वस्तू वा जीवमात्रांमध्ये दिसणारे रंग हे त्याच्या कुतूहलाच्या कक्षेत येऊ लागले असतील. बिम्मच्या वयाचं मूल घरात रांगू लागतं, भिरभिर फिरु लागतं, घराबा… पुढे वाचा »
रविवार, ६ ऑगस्ट, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ५ : खेळ सावल्यांचा
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) आपल्या पक्ष्याचा शोध « मागील भाग --- माणसाचे मूल जन्मत: परावलंबी असते. सुरुवातीचे काही महिने ते पूर्णपणे आई-वडिलांच्या निर्णयांच्या नि कृतीच्या अधीन असते. काय खावे, केव्हा खावे, काय परिधान करावे वगैरे किमान निर्णयही पालकांच्या अधीन असतात. पुढे मूल बसते, चालते झाले की त्याला स्वत:च्या निर्णयाने जागा बदलता येते– पण तरीही त्या निवडीला घराचे भौतिक बंधन असतेच. त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याहून अधिक काळ पालकांच्या अधीन असतो. या टप्प्यातच त्याचा घराबाहेरील सजीव निर्जीव गोष्टींशी परिचय होत जातो. परिचय दृढ झाला की त्यातून त्यांच्याशी बंध वा नाते प्रस्थापित होत जातात. आणि असे बंध स्मरणांच्या स्वरूपात त्याच्यासोबत मनात नि घरात प्रवेश … पुढे वाचा »
मंगळवार, ११ एप्रिल, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ४ : आपल्या पक्ष्याचा शोध
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) प्रतिबिंबांचा प्रश्न « मागील भाग --- एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. पिंजर्याचे दार मोडलेले होते, पक्ष्याचे अस्तित्त्व संपून गेले, पण रंग नि आतील दांडी नव्या पक्ष्याचे स्वागत करायला अजूनही उत्सुक होती. पूर्वी त्यात एक पिवळा पक्षी (१) होता हे आईकडून बिम्मला समजते. ‘आता तो कुठे गेला?’ हा प्रश्न ओघाने आलाच. त्या पक्ष्याचे काय झाले असेल हे तर्क करण्याजोगे आहे. पण खरे ते सांगणे म्हणजे बिम्मच्या पुढच्या अवघड प्रश्नांना सामोरे जाणे आहे. साहजिकच ‘त्याच्याशी खेळायला कोणी नव्हते म्हणून कंटाळा येऊन तो उडून गेला असेल.’ असे सांगत आईने ते टाळले आहे. ‘मग मी त्याला बोलावून आणतो.’ असे म्हणून बिम्म त… पुढे वाचा »
मंगळवार, ४ एप्रिल, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) हा बिम्म आहे « मागील भाग --- बेम्म आणि बिम्म ( https://www.nenko.com/ येथून साभार.) एकदा एका कापडाच्या दुकानात बिम्मला दोन आरसे दिसले. एकात डोकावून पाहिले तर त्यात उंचच उंच काठीसारखा बिम्म दिसला, तर दुसर्यात तो हवा भरलेल्या फुग्यासारखा जाडजूड दिसला. आता हे दोघे कोण बुवा? असा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य होतेच. मग घरी परत येईतो त्याच्या कल्पनेचा वारू उधळतो. त्यापैकी उंच माणसाचे नाव बेम्म आणि फुग्यासारख्याचे नाव बूम्म आहे असे निश्चित केले जाते. घरी आल्यावर तो आईला हे सारे सांगून त्याच्या मते अवघड प्रश्न विचारतो, ' यातला खरा बिम्म कोण… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)






