-  
      
(कथा, प्रसंग नि एक पात्र काल्पनिक असले तरी अनुभव वास्तव आहे.) काल घरातील ‘धुलाई निर्जंतुकीकरण द्रव्य’ (laundry disinfectant) संपले होते. ते आणायचा होते. इतरही लहान-सहान गोष्टी आणायच्या होत्या म्हणून सकाळी-सकाळी अॅमेझॉनच्या दुकानात शिरलो. आत शिरताक्षणीच तेथील प्रतिनिधीने धडाधड माझ्या मागच्या खरेदी सूचीतल्या वस्तू समोर टाकायला सुरुवात केली. मी म्हटलं, “राजा थांब जरा. मला काय हवे ते मी पाहातो.” तर तो पुन्हा आतल्या दिशेन धावला बरीचशी माहितीपत्रके घेऊन परतला नि डिस्काउंट, एकावर-एक फ्री वगैरे स्कीम्सची माहिती देऊ लागला. मी म्हटलं, “मला फक्त लॉण्ड्री डिसइन्फेक्टन्ट हवा आहे. बाकी किरकोळ गोष्टी माझ्या मी घेईन.” “ओ: शोअर सर,” दोन्ही हात कमरेजवळ एकावर एक असे ठेवत तो अदबीने म्हणाला, कंबरेत किंचित झुकून त्याने एक पाऊल मागे घेतले नि धावत जाऊन (… पुढे वाचा » 
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : | 
शनिवार, २९ मार्च, २०२५
अमेझिंग अॅमेझॉन
मंगळवार, १८ मार्च, २०२५
वांझ राहा रे
-  
      
(कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...) हे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: Photo by Maan Limburg on Unsplash तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ रा… पुढे वाचा » 
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

