-
१. वार्धक्याची वाट प्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो. वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते. प्रगतीच… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...
बुधवार, ११ जून, २०२५
काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता
-
(मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.) मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. पण अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते (१) . अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र त… पुढे वाचा »
शनिवार, ७ जून, २०२५
चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही
-
पुणे विद्यापीठ हे ‘गव्हर्नर हाऊस’ असण्याच्या काळात मुख्य इमारतीच्या बरोबर समोर, कुण्या ब्रिटिश साहेबाचा ऐसपैस डायनिंग हॉल होता, भक्कम दगडी बांधकामातला. काही शतकांपूर्वी मी पुणे विद्यापीठात शिकत असताना तिथे ‘ओल्ड कॅन्टिन’ या नावाने ओळखले जाणारे एक कॅन्टिन चालवले जात असे. घरचे जेवण नसेल तर कधीमधी दुपारच्या जेवणासाठी, आणि एरवी चहापानासाठी, तिथे फेरी होत असे. तिथे एक पोरसवदा वेटर होता. तो सदैव घाईत असे. एखाद्या टेबलपाशी ऑर्डर घेण्यास पोहोचला, म्हणून टेबलवरील दोघे-चौघे एकमेकाला विचारून ऑर्डर त्याला सांगेपर्यंत तो लगेच भटारखान्याकडे तरी पळे किंवा दुसर्या टेबलकडे तरी. सोशल मीडियावर यथेच्छ टाईमपास करुन काही कामासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आई-वडिलांसाठी वेळ द्यायचा म्हटले, हटकून ‘आयॅम किनी सो बिज्जी बाबा. इतरांसोबत इतर कामांना म्हणजे बघा, टाईमंच म… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)