Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २६ जुलै, २०१२

काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...


  • (कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग ‘नसतोच खेळलो तर बरं’ असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आपली संमती दिलेली असणार... मग ते केजरीवालांनी लिहिलेलं असणार मग… पुढे वाचा »

गुरुवार, १४ जून, २०१२

शोध तुकारामाचा


  • तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव – निदान विशी उलटलेल्या – मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातील कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत, की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची ‘कर्कशा’ पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुंठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती – नि रुचीही – संपते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्व… पुढे वाचा »

रविवार, १० जून, २०१२

पराभूत थोरवीच्या शोधात


  • कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. ‘हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात?’ एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सांगितले होते, की एका महागायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले ‘ हे गाणं जर बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता. ’ महागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते. जी गत गायकांची तीच गायनप्रेमींची. गाण समजून-उमजून ऐकायला वेळ कोणाला आहे? आम्ही पैसे देतो, तुम्ही गा, आम्ही वा:, जै हो. अनेक तथाकथित गायनप्रे… पुढे वाचा »