Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

‘राजनीती’चे महाभारत


  • मंडळी काल आम्ही ‘राजनीती’ नामे चित्रपट पाहिला– सहज टीवीवर दिसला म्हणून पाहिला. अगदी शेवटपर्यंत पहावे असे त्यात काय होते, ते काही समजले नाही. एरवी १०-१५ मिनिटात पुढील चित्रपटाची इस्टुरी ९५% अचूकतेसह (संख्याशास्त्री ना आम्ही, ५% सोडावे लागतात) सांगून टीवी बंद करणारे आम्ही, या चित्रपटात काय होते की शेवटपर्यंत चिकाटीने पाहिले. कदाचित एरवी ‘पहावी’ लागणारी भिकार गाणी नव्हती म्हणून, कि दर दहा मिनिटांनी होणारा पंधरा मिनिटांचा ‘छोटासा’ ब्रेक न घेता अर्धा तास सलग चित्रपट पाहता आला म्हणून, की त्यात ती कत्रिना का कोण होती – जी सुंदर आहे, म्हणे – म्हणून, की त्या रणवीर– चुकलो ‘रणबीर’ म्हणायला हवं नाही का– चा एकही चित्रपट पूर्वी पाहिला नसल्याने ‘He deserves a chance' असाही एक सुप्त हेतू असावा. तर कारण काहीही असो, आम्ही तो चित्रपट टिच्चून बसून पा… पुढे वाचा »

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

नरोटीची उपासना


  • पु.ग.सहस्रबुद्धे यांनी ‘नरोटीची उपासना’ (१) हा लेख लिहिला, त्याला आज पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहेत. पन्नास वर्षे झाली त्या वर्षी एका प्रथितयश वृत्तपत्राने तो पुनर्मुद्रित केला होता. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्याची आठवण झाली. हा पु.गं.चा लेख नाही, त्याचा आजच्या काळात वेध घेणारा म्हणून शकू कदाचित. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो (फारसा उपयोग नसतो हे ठाऊक असूनही) ती म्हणजे पु. गं.चा लेख किंवा हा लेख आपल्या परंपरांचे/ प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. इथे अश्रद्धतेचा विचार येणार नाही. (प्रतिवादाच्या सोयीसाठी प्रथम तसा शिक्का मारणे सोपे असते, पण लेखाची व्याप्ती ती नाही.) --- नरोटी म्हणजे करवंटी, नारळाच्या आतील जीवनदायी पाण्याचे, खोबर्‍याचे रक्षण करणारे भक्कम वेष्टण. श्रद्धा आणि परंपरांच्या भाषेत… पुढे वाचा »

शुक्रवार, १४ मे, २०१०

होते कुरूप वेडे (कथा)


  • (Italo Calvino यांच्या The Black Sheep या कथेचा स्वैर अनुवाद.) कोण्या एका गावी सगळेच चोर होते. प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतून येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई. या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम… पुढे वाचा »

बुधवार, ५ मे, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५


  • << मागील भाग काही काळापूर्वी सत्यजित रे यांच्या चित्रपटांची एक दोन परिच्छेदात ओळख करून देणारे अमृत गंगर यांनी लिहिलेले एक लहानसे पुस्तक (प्रकाशक लोकवाङ्मय गृह) वाचले होते. त्यांनी हा चित्रपट ‘भारतातील अंधश्रद्धेवर आसूड ओढणारा होता’ असे म्हटले आहे. तसेच तो प्रकाशित झाला तेव्हा अनेक धार्मिक संघटनांनी त्याविरुद्ध गदारोळ केला अशी माहिती दिली आहे. आता डावे नि उजवे यांचे ज्यावर एकमत झाले आहे त्याबाबतच मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. मला वाटते इथे आपले टिपिकल भारतीय मन विचार करते आहे. आपल्याला जसे ‘असावे असे वाटते’ तसे ‘आहे’ असा आपला समज असतो. वरवर न पाहता, थोडे वस्तुनिष्ठ होऊन बारकाईने पाहणे आपल्याला जमत नाही. चटकन एक शिक्का मारला की आपण ‘वा’ म्हणायला किंवा दगड मारायला मोकळे होतो. मुळात ही शोकांतिका ही व्यक्ती-समष्टीची लढाई आहे, माणसे न… पुढे वाचा »

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४


  • << मागील भाग आणखी काही दिवस गेले आहेत. आता छोटू आजारी आहे. पण त्याच्या आईने हे कालिबाबूंना किंवा छोटूच्या वडिलांपासून लपवून ठेवले आहे. त्यांना समजले तर पुढे काय होईल हे तिला स्वच्छ दिसते आहे. त्यांच्यापासून लपवून तिने वैद्याला बोलावले आहे. आल्याआल्या तो विचारतो, ‘घरात साक्षात देवी असताना मला बोलावण्याचे काय कारण?’ बोलता बोलता तो हे ही सांगून टाकतो, की देवीने त्याचे दीर्घकाळ त्रास देणारे दुखणे बरे केले आहे. तरीही तिच्या विनंतीवरून तो छोटूला तपासतो आणि औषधे पाठवून देण्याचे मान्य करतो. अर्थात या पेक्षा छोटूला देवीच्या पायावर घालणे अधिक चांगले हे सांगायलाही विसरत नाही. वैद्यबुवा बाहेर पडत असतानाच छोटूचे वडील तिथे येतात आणि छोटूला आजारी पाहून कालिबाबूंना सांगायला धावतच बाहेर जातात. छोटूच्या आईला ज्याची भीती वाटत होती तेच घडते. बेशुद्… पुढे वाचा »