Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

शून्य, आकार आणि अनंताची वाटचाल


  • हे चित्र पाहा. तुम्ही म्हणाल या चित्र काय , दोन बिंदू तर आहेत. ठीक तर. मग असं म्हणतो की ’A आणि B हे दोन बिंदू पाहा.’ ’प्रत्येक बिंदू हा बिंदू स्वयंभू असतो ’ हे आपण भूमितीमध्ये फार वर्षांपूर्वी शिकलो. तो शून्य मिती, शून्य लांबी व क्षेत्रफळ असलेला मानलेला आहे. (असल्या सुरुवातीनंतर गणित अप्रिय झाले नाही तरच नवल. :) ) आता माझ्याकडे एक नव्हे, दोन बिंदू आहेत. आता यांच्याबद्दल एकत्रितपणे काय म्हणता येईल? मग ’दोन भिन्न बिंदूंतून एक आणि एकच रेषा जाते’ हा पुढच्या सिद्धांत आपल्याला आठवेल. तर हे घ्या, दोन बिंदूंना जोडून मी ही रेषा- रेषाखंड A-B मी तयार केला. आता मी द्विमितीमध्ये* प्रवेश केला आहे. आता द्विमितीमध्ये मला फक्त रेषाखंडच नव्हे तर इतर अनेक आकार … पुढे वाचा »

रविवार, २४ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ८ : केल्याने प्रसिद्धी


  • मोबाईल-विशेष   << मागील भाग इतरांकडून शिकावे आपल्या लेखनाची, ब्लॉगची, वेबसाईटची जाहिरात कशा तर्‍हेने करावी, वाचकांना कसे खेचून आणावे, त्यांना पकडून कसे ठेवावे, याची उदाहरणे विविध वेबसाईट्सवर दिसत असतात. बारकाईने लक्ष दिले तर, आपणही ती वापरु शकतो का, आपल्या ब्लॉगसाठी ती उपयुक्त ठरु शकतात का, याची चाचपणी करुन पाहता येते. एक 'केस-स्टडी' म्हणून maharashtratimes.com वेबसाईट पाहता येईल. वेबसाईट ओपन केल्यावर सर्वात वरच्या बाजूला महाराष्ट्र टाईम्सच्या लोगोच्या बरोबर खाली ’ट्रेडिंग’ची पट्टी दिसते. पॉप्युलर- म्हणजे सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या लेखांकडे जाण्यासाठी वाचकाला दिलेला शॉर्टकट आहे. त्याच्या विरुद्ध दिशेला उजवीकडे वर ’रीड अ‍ॅंड अर्न’ची (Read and Earn) लिंक दिसते. इथे वाचकांना लॉग… पुढे वाचा »

माझी ब्लॉगयात्रा - ७ : मोबाईल-विशेष


  • अनुक्रमणिका आणि सूची   << मागील भाग ( मागील भागाच्या शेवटी या भागाचे जे नाव दिले होते ते ’काही अनुभव’ असे होते. माझ्या वैय्यक्तिक, व्यावसायिक आयुष्यात उत्पादक/सेवादाते-ग्राहक संबंधांबाबत मला जे अनुभव आले, त्यातून जे आकलन झाले त्यांच्या आधारे तो भाग लिहिण्याचे नियोजन होते. त्या आकलनाच्या आधारेच ब्लॉगलेखनाच्या शिफारस व प्रसिद्धीसाठी काही तंत्र वापरले आहे. परंतु तो भाग अपेक्षेहून खूप मोठा झाल्याने आणि एक स्वतंत्र लेख म्हणून विकसित झाल्याने या मालिकेतून गाळून टाकला आहे. तो जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची लिंक इथे समाविष्ट करेन. ) मोबाईलवर लेखनसूची? मागील भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ’सूची देण्याचा जो श्रम केला, तो मोबाईल थीमवर वृथा गेला’ असल्याने आता मोबाईल थीमची ही मर्यादा कशी दूर करता येईल याचा विचार करु लागलो. मोबाईल थीम्स… पुढे वाचा »

बुधवार, २० एप्रिल, २०२२

कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने


  • बातमी: कुराणाचा प्रथमच संस्कृतमध्ये भावानुवाद ; दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या ग्रंथाचे शुक्रवारी प्रकाशन --- काही काळापूर्वी जावेद अख्तर यांचे रेख़्ता या वार्षिक उर्दू संमेलनातील भाषण ऐकले होते, त्यावर ’वेचित चाललो...’ वर (’ भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार ’) लिहिलेही होते. त्या भाषणादरम्यान त्यांनी केलेला एक उल्लेख मला रोचक वाटला होता. ते असं सांगतात की, १७९८ मध्ये कुराण प्रथम उर्दूमध्ये अनुवादित केले गेले. त्यावेळी ’असल्या अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले’ म्हणून तो अनुवाद करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा काढला होता. त्याचवेळी ’असल्या अमंगळ भाषेला ’देव’नागरी नावाने ओळखळी जाणारी आमची पवित्र लिपी वापरल्याने ती विटाळेल’ असा विरोध हिंदू समाजातील संभावितांनी केला होता. ’अमंगळतेच्या कल्पना अमंगळ मनातूनच येतात’ हे माझे … पुढे वाचा »

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ६ : अनुक्रमणिका आणि सूची


  • मजकूर सुरक्षितता   << मागील भाग ब्लॉगच्या मजकुराची शक्य तेवढ्या सुरक्षिततेची सोय केल्यावर आता पुढच्या टप्प्यात विचार करायचा, तो ब्लॉगच्या सुशोभीकरणाचा. त्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी, बाबी वा पर्याय वाचकाला उपयुक्त ठरु शकतात याचा विचार करायला हवा. हा विचार तुमच्या ब्लॉगमधील विषयांच्या अनुषंगाने व्हावा. एका प्रकारच्या ब्लॉगसाठी जे तंत्र कामात येईल, तेच सर्व प्रकारच्या ब्लॉग्सना लागू असेल असे नव्हे. व्यावसायिक ब्लॉग्समध्ये उपयुक्त ठरणारे पर्याय साहित्यिक लेखनाच्या ब्लॉगमध्ये तितकेच उपयुक्त असतील असे नाही. आणि तिथे उपयुक्त असणारे पर्याय हे प्रासंगिक लेखनाच्या, 'सुचले तसे' अथवा run of the mill प्रकारच्या लेखनाच्या ब्लॉगवर कामात येतील असे नाही. बहुतेक ब्लॉगमंचांवर तुमच्या पोस्ट्सची… पुढे वाचा »

रविवार, १० एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ५ : मजकूर सुरक्षितता


  • ब्लॉग लिहिल्यानंतर   << मागील भाग वास्तव आयुष्यात मृत्यू टाळता येत नाही, औषधांनी त्याची संभाव्यता कमी करता येते. आभासी जगात लेखन-चौर्य टाळता येत नाही, पण त्याची संभाव्यता कमी करता येते. - स्वामी जिज्ञासानंद काही वर्षांपूर्वी मी मराठी संस्थळांवर सक्रीय होतो तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याचे आणि माझे लेखन आवडल्याचे एका संस्थळमित्राने 'व्यक्तिगत निरोपाने’ (हा संस्थळावरचा खासमखास शब्द) कळवले. मी बुचकळ्यात पडलो. माझा ब्लॉगच नव्हता आणि मी तसा नुकताच लिहू लागलो होतो. दोन-चार बरे लेख या पलिकडे फारसे लिहिलेही नव्हते. त्या लेखनाला आज मी लेखन म्हणू धजणार नाही. फेसबुक पोस्टच्या दर्जाचे ते लेखन म्हणता येईल. Shutterstock.com येथून साभार. कुतूहल म्हणून मी शोधले, तर माझा ए… पुढे वाचा »

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ४ : ब्लॉग लिहिल्यानंतर


  • ब्लॉग लिहिताना   << मागील भाग ब्लॉग तयार केल्यानंतर, ब्लॉगपोस्ट लिहिल्यानंतर बहुतेक ब्लॉगर मंडळी ’प्रसिद्ध करा’ (Publish) पर्याय वापरतात नि थांबतात. याच्यापुढे काही असते याची बहुतेकांना माहिती नसते. काही मंडळी तर इतकी बेफिकीर दिसतात, की त्यांच्या एकाच पोस्टमध्ये वेगवेगळ्या आकाराचा वा प्रकाराचा फॉन्ट असणारा मजकूर दिसतो. अन्य एडिटरमधून किंवा अन्य वेबसाईटवरून पेस्ट करताना त्याच्या फॉरमॅटिंगचे काय होते, याबाबत बहुतेक सारे अनभिज्ञ असतात. बरं निदान समोर वेगवेगळे फॉन्ट दिसत असताना ते सुधारून कसे घ्यावे याचा विचार तरी करावा. यातील काही मंडळी तर पोस्ट प्रसिद्ध केल्यावर ती पोस्ट, आपला ब्लॉग, निदान आपल्या ब्राउजरवर व्यवस्थित दिसते का, याची शहानिशाही करत नसावेत असा मला दाट संशय आहे. (जसे फेसबुकवर शेअर बटन दाबल्यावर आपली वॉल पाहून आपल्याला अप… पुढे वाचा »

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ३ : ब्लॉग लिहिताना


  • ">माझी वाटचाल   << मागील भाग (हा भाग सामान्य तयारीचा आहे. ज्यांना ब्लॉग सुरु करायचा आहे पण त्याबाबत अजिबात माहिती नाही अशांना अधिक उपयुक्त. मी स्वत: ब्लॉगर वापरत असल्याने इथे स्क्रीनशॉट्स त्याचे दिले आहेत.) सर्वात प्रथम तुम्हाला स्वत:चा असा ब्लॉग पत्ता तयार करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला ब्लॉगचे नाव निश्चित करुन त्यानुसार पत्ता तयार करता येईल. उदा. रमताराम या टोपणनावाने मी संस्थळावर लेखन करत असल्याने ’रमतारामाचे विश्रांतीस्थळ’ हे माझ्या ब्लॉगचे नाव निवडले आणि म्हणून ramataram हा माझा ब्लॉग पत्ता निश्चित केला. आता हा ब्लॉग तयार करण्यासाठी मी प्रथम ब्लॉगर.कॉम (किंवा तुमचा ब्लॉगसेवादाता जो असेल तो) वर लॉगिन केले. (गुगलचा फायदा - आणि कदाचित तोटाही - हा की एकदा गुगल लॉगिन … पुढे वाचा »