Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
‘प्रभात दिवाळी’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
‘प्रभात दिवाळी’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

अन्योक्ती २: खड्डे खणणारे हात


  • एक आटपाट मैदान होतं... त्या मैदानावर सकाळी म्हातारे कोतारे फिरायला येत असत. मैदान असलेलं ते गाव हे खरंतर लहानसं शहरच होतं. महानगरी ‘ज्येष्ठ नागरिकां’ प्रमाणे ओघळणारे पोट घट्ट दाबून बसवणारे टी शर्ट नि ट्रॅक पँट, किंवा बर्मुडा ऊर्फ पाऊण चड्डी घातलेले पुरुष इथे नसले, तरी इथले पुरुषही त्यांच्या प्रमाणेच मैदानाला एखादी फेरी मारून घाम पुसत पुसत राजकारणाच्या खेळाच्या आणि खेळातल्या राजकारणाच्या गप्पा मारत असत. हल्ली एकत्र कुटुंब पद्धती मागे पडू लागली असल्याने, सुनेच्या कागाळ्या हा म्हातार्‍या स्त्रियांचा हक्काचा विषय मागे पडून त्या हिंदी चित्रपटातल्या हिरो हिरोईनच्या न जुळलेल्या वा मोडू घातलेल्या लग्नाची चिंता करत असत. किंवा एखाद्या मालिकेतल्या त्या कुण्या सासुरवाशिणीला त्रास देणार्‍या तिच्या सासूच्या नावे बोटे मोडत, आपण तसे नाही हे स्वतःला… पुढे वाचा »