-
https://www.shutterstock.com/ येथून आभार. विचाराचे वावडे नि माणसांची ड्रांव ड्रांव कळत्या वयापासून मी कोणतेही कर्मकांड, उपासना करणे बंद केले. अर्थात घरच्यांनी ते करण्यास माझा विरोध नव्हता/नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मी मानतो. इतकेच काय त्याला लागणारे साहित्यही आणून देत असे. पण त्यामुळे आमचे तीर्थरूप आमच्यावर उखडून होते. म्हणजे ते स्वत: काही करत/करतात असे मुळीच नाही. अस्सल भारतीय मानसिकतेप्रमाणे जे काय करायचे ते काटेकोर करायचे नि ते इतरांनी - म्हणजे आईने - करायचे असा त्यांचा बाणा होता. आपण नाही का ज्ञानेश्वर जन्मावेत पण इतरांच्या घरी, तुकोबा जन्मावा पण तो आमचा जावई म्हणून नको, शिवाजी जन्मावा तो फार लांब नको म्हणून शेजारच्या घरी... अलीकडचे पाहिले तर ’हौं जौं द्या … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९
हे ही असेच होते... ते ही तसेच होते - १
सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९
भ्रमनिरास आणि अहंकाराची निरगाठ
-
माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर एखाद्या संकल्पनेने, एखाद्या विचारव्यूहाने, एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे इतका झपाटून जातो की’ ’बस्स, हेच काय ते एक सत्य’, ’हाच काय तो अंतिम सत्याचा/विकासाचा मार्ग’, ’हाच काय तो देवबाप्पाने आमच्या उत्थानार्थ पाठवलेला प्रेषित’ म्हणून भारावलेपणे तो त्याची पाठराखण करत राहतो. पण - माझ्या मते- जगातील कोणतीही विचाराची चौकट, व्यवस्था, व्यक्ती ही सर्वस्वी निर्दोष असू शकत नाही, ती कायमच यशस्वी होईल अशी खात्री देता येत नाही . माणूस भानावर असेल, डोळस असेल, तर हे सहज दिसूनही येते. देव-असुर, बरोबर-चूक, पवित्र-अपवित्र, तारक-मारक अशा द्विभाजित जगात राहणार्यांना हे बहुधा ध्यानात येत नाही. त्याला अर्थातच एका कळपात राहण्याची, एकट्याने उभे राहण्याच्या भीतीची जोडही असतेच. पण ड… पुढे वाचा »
रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९
काँग्रेस आणि पर्यायांच्या मर्यादा
-
( एका चर्चेत विरोधकांच्या वा चॅनेल्सच्या मते ’काँग्रेसने स्वीकारलेला ’सॉफ्ट हिंदुत्वाचा’ आणि काँग्रेसच्या मते 'हिंदुत्वाच्या राजकीय बाजूला वगळून स्वीकारलेल्या हिंदुपणाचा' प्रवास राजकीयदृष्ट्या लाभ देईलही पण वैचारीकदृष्ट्या मागे घेऊन जाणारा नाही का?’ असा एक प्रश्न उपस्थित झाला. त्याला दिलेला हा प्रतिसाद .) --- अगदी बरोबर. याच कारणासाठी मला तो पटलेला नाही. पण... राजकीय पक्षाला राजकीय सत्ता हवी असते आणि ती वैचारिकतेवर कधीच मिळत नाही हे ढळढळीत सत्य आहे. वैचारिक मंडळींमध्ये आपसातच इतका अंतर्विरोध असतो, की कितीही नेमकी वैचारिक भूमिका घेतली तरी वैचारिक मंडळी सर्व एक होऊन मतदान करत नसतात. वैचारिक मंडळी नेहमीच मूठभर असतात, आणि ही मंडळी कायम काँग्रेसच्या विरोधातच उभी राहिली आहेत. मग सत्ताही नाही नि वैचारिक मंडळींत स्थानही नाही … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


