-
मागील आठवड्यात तीन दशकांपूर्वी बॉलिवूडमध्ये कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या स्मृती विश्वास यांच्या वृद्धापकाळातील दारूण स्थितीबाबत बातमी वाचली. काही काळापूर्वी अशाच स्वरुपाची बातमी गीता कपूर या तुलनेने दुय्यम अभिनेत्रीबाबत वाचण्यास मिळाली होती. कारकीर्दीच्या भरात असताना मिळवलेला पैसा हा पुढची पिढी, नातेवाईक किंवा स्नेह्यांमुळे बळकावल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक विपन्नतेचा सामना करावा लागल्याची ही उदाहरणे. गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली होती. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळाली. आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, २१ मार्च, २०२१
बालक - पालक
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१
मी पुन्हा येईन...
-
सिद्धांत बेलवलकर या ’उभ्या-उभ्या विनोदवीराने’ त्याच्या एका सादरीकरणामध्ये खड्डेही ’मी पुन्हा येईन’ म्हणतात असा पंच घेतला. त्यावरुन स्फुरलेले हे विडंबन. https://twitter.com/MiPunhaaYein/photo येथून साभार. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन (समूहघोष) पाऊस पडला, खड्डे झाले, खड्ड्यांमध्ये तलाव झाले. लोक चिडले, नेत्याला भिडले, नेत्याचे आदेश निघाले कामगार कामाला लागले, डांबराची पिंपे घेऊन आले. डांबर खडीचे मिश्रण ओतले, तर खड्ड्यांतून आवाज आले... ॥१॥ (समूहघोष) घरात झुरळे फार झाली ताटावर त्यांनी चढाई केली जेवण्याचीही चोरी झाली घरची मंडळी त्रस्त झाली औषधे घेऊन माणसे आली सांदीकोपर्यात चढाई केली अखेरच्या झुरळाने माघार घेतली खिडकीतून जाताना गर्जना केली... ॥२॥… पुढे वाचा »
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१
न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश
-
फार पूर्वी लहानपणी पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या एका व्यक्तिचित्रात (पुस्तकाचे नाव बहुधा ’मणिदीप’ होते. चु. भू. द्या घ्या) काश्मीरचा राजा मातृगुप्त याच्या न्यायबुद्धीची एक लहानशी गोष्ट वाचनात आली होती. कुण्या एका व्यापार्याची शंभर सुवर्णमुद्रा असलेली पिशवी विहीरीत पडते. त्याचा शोक ऐकून एक साहसिक ’ती बाहेर काढून दिली तर मला काय द्याल?’ अशी विचारणा करतो. त्यावर व्यापारी म्हणतो, ’आता तसेही माझ्याहातून ते धन गेल्यात जमा आहे. बाहेर काढल्यावर तुम्हाला आवडेल ते मला द्या.’ म्हणतो. तो साहसिक ती पिशवी बाहेर काढून त्यातील एक सुवर्णमुद्रा व्यापार्याच्या हाती टेकवतो. व्यापारी अर्थातच संतापतो, राजाकडे दाद मागतो.’ वरकरणी परिस्थितीचे प्रेक्षक आणि अर्थातच खुद्द साहसिकाला ’व्यापार्याने म्हटल्यानुसार… पुढे वाचा »
मंगळवार, २६ जानेवारी, २०२१
‘लंगोटाची उपासना’ ऊर्फ ‘भूतकालभोग्यांची आस, आभास आणि अट्टाहास’
-
तुम्ही जन्माला येता, त्यानंतर सुरुवातीची एक दोन वर्षे तुमचे जन्मदाते/पालक तुम्हाला तुम्हाला लंगोटात लपेटून टाकतात. तुमचे नियंत्रण नसलेल्या उत्सर्जितांनी तो लंगोट खराब झाला, की बदलण्याचे कामही तेच करत असतात. सोबत तुम्हाला आहार देणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादि जबाबदार्याही त्या पालकांनीच स्वीकारलेल्या असतात. थोडक्यात तुम्ही तुमचे पालक आणि तो लंगोट यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असता. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने तुमची ’त्या आई-बापाचे मूल’ याहून कोणतीही वेगळी ओळख नसते. कारण अजून तुम्ही खूप लहान असता. स्वत:च्या पायावर उभे राहणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याला आवश्यक असणारे शारीर बळ, कुवत आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो. तुमच्या आयुष्यातील सर्वस्वी परावलंबी काळाचा आधार म्हणून त्या लंगोटाचे स्थान असते . … पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
भूमिका,
संस्कृती,
समाज
रविवार, १७ जानेवारी, २०२१
चर्चा अजून संपलेली नाही...
-
चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू. --- पोस्ट: या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू. प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का? प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात. प्रतिसाद ३: आपल्या देशातील … पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)




