-
पूर्वी पुण्याच्या कर्वेनगर भागात राहात असतानाची गोष्ट आहे. चौकात एक कळकट हॉटेल होते. जेमतेम चार बाकडी बसतील इतकी जागा पुढे, आत एक माणूस कसाबसा उभा राहील नि बाजूला एक लहानसे टेबल बसेल इतपत जागा ’किचन’ म्हणून. हॉटेल नावालाच, कारण सतत उकळणारा चहा, आदल्या दिवशी संध्याकाळी केलेले वडे, मिसळ, दगड झालेली इडली आणि सांबार असे अक्षरश: एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदार्थ तिथे मिळत. आमच्या ’बिडी’वाल्या मित्रांना शेजारच्या पानवाल्याकडे सिगारेट मिळे. मग त्यांची सिगारेट नि आम्हा 'फुंकसंप्रदायी' नसलेल्यांसाठी हॉटेलातून मागवलेला चहा यावर तिथे चकाट्या पिटणे चालत असे. हॉटेलचा मालक एक पैलवान होता ( अगदी सुरुवातीच्या काळात होटेलच्या नावाखाली ’पैलवानाचे हॉटेल’ अशी ठसठशीत टॅगलाईनही होती. ) नि त्याच्याहून नि… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
‘मिळून सार्याजणी’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
‘मिळून सार्याजणी’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, २६ जून, २०२१
आपले गिर्हाईक कोण?
Labels:
‘अक्षरनामा’,
‘मिळून सार्याजणी’,
अर्थकारण,
जिज्ञासानंद,
राजकारण,
समाज
रविवार, २१ मार्च, २०२१
बालक - पालक
-
मागील आठवड्यात तीन दशकांपूर्वी बॉलिवूडमध्ये कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या स्मृती विश्वास यांच्या वृद्धापकाळातील दारूण स्थितीबाबत बातमी वाचली. काही काळापूर्वी अशाच स्वरुपाची बातमी गीता कपूर या तुलनेने दुय्यम अभिनेत्रीबाबत वाचण्यास मिळाली होती. कारकीर्दीच्या भरात असताना मिळवलेला पैसा हा पुढची पिढी, नातेवाईक किंवा स्नेह्यांमुळे बळकावल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक विपन्नतेचा सामना करावा लागल्याची ही उदाहरणे. गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली होती. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळाली. आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

