Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

प्रश्नोपनिषद - १: पुनर्जन्म


  • मी जडवादी आहे की अंधश्रद्ध, की आणखी काही मधले, हे आपल्याला ठाऊक नाही. पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. पुनर्जन्म नि पारलौकिक हे दोन विषय तर आपल्या डोस्क्याला लै म्हंजे लैच त्रास देतात. त्यातील तत्त्व, स्वार्थ, परमार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष ( हे असं आठवतील ते जड शब्द ठोकून देणे हल्लीच एका माजी वृत्तपत्र संपादकाकडून शिकलो ) वगैरे बाजू जाऊ द्या हो, ते सगळं आपल्याला बाप जन्मी समजणार नाहीच. मी म्हणतोय ते या सगळ्याच्या ‘ऑपरेशनल’ बाजूबद्दल. आता हेच बघा ना, आमच्या दोस्त लोकांची मारे जोरदार चर्चा घडत होती, ‘पुनर्जन्म असतो की नाही?’, नि आमच्या टकुर्‍यात भलतेच प्रश्न. त्या नादात तिकडे महत्त्वाचे काही मुद्दे येऊन गेले तिकडे लक्षच नाही. बहुमोल असे ज्ञानसंपादनाचे क्षण आम्ही दवडले, पहिल्यापासून आम्… पुढे वाचा »

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ६: काही टिपणे


  • फासे पडले नि फासही   << मागील भाग या लेखमालिकेच्या तिसर्‍या भागात रोशच्या व्यावसायिक नीतीचे विवरण आपण पाहिले. अॅडम्सच्या यापुढील लढ्याचे मूळ यात होते. परंतु हे सारे तपशील देताना यामधे नेमके गैर काय, आक्षेपार्ह काय किंवा बेकायदेशीर काय याबाबत अ‍ॅडम्स काहीच बोलत नाही. कदाचित हे सारे स्वयंसिद्ध आहे असा त्याचा समज असावा. पण पुढील घटनाक्रमामधे जेव्हा रोशला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले ते नेमके कोणत्या मुद्यावरून हे आपल्याला समजून घ्यायला हवे तरच तो घटनाक्रम नीट समजावून घेता येईल. अॅडम्सने याबाबत पुरेशी कारणमीमांसा दिलेली नाही. युरपिय आयोगाच्या संबंधित कागदपत्रात याबाबत काय आहे हे ही मला ठाऊक नाही. मग आता रोशला नक्की कोणत्या मुद्यावर दोषी ठरवले नि कसे याचे विश्लेषण करून आपणच ही कारणमीमांसा मांडण्याचा प्रयत्न करून पाहू. एक महत्त… पुढे वाचा »

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ५: फासे पडले नि फासही


  • मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश   << मागील भाग रोशच्या कारभाराने अस्वस्थ झालेल्या स्टॅन्ले अ‍ॅडम्सने २५ फेब्रुवारी १९७३ रोजी ई.ई.सी.च्या स्पर्धानियम विभागाचे आयुक्त ‘अल्बर्ट बॉर्श’ (Albert Borschette) यांना रोशच्या गैरकारभाराबद्दल माहिती देणारं पहिल पत्रं पोस्ट केलं नि या दीर्घ लढ्याला प्रारंभ झाला ( सदर पत्र खाली दिलेल्या दुवा क्र. २ वरील दस्तऐवजात वाचता येईल. त्याचबरोबर तेथे त्याने रोश नि अन्य कंपन्यांच्या गैरकारभारासंबंधी अधिक माहिती देणारे दुसरे एक पत्र लिहिले आहे ते ही वाचता येईल. ) या पत्रात त्याने आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आपले नाव बाहेर फुटू नये याची काळजी घेण्याची विनंतीही केली होती नि सदर गैरप्रकारांच्या तपासासाठी आपले पूर्ण सहकार्य देऊ केले होते. पुढे त्याने अधिक माहिती मिळवून देऊन आपले आश्वासन पुरे ही केले. आपल्या … पुढे वाचा »

गुरुवार, ५ मे, २०११

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ४: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश


  • रोशची कार्यपद्धती   << मागील भाग सामान्यपणे औषध निर्मिती कंपन्यांना त्यांचा संशोधन-खर्च - जो अवाढव्य असतो - भरून येण्यासाठी ते औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. या काळात अन्य कोणत्याही उत्पादकाला या उत्पादनाशी मिळतेजुळते असे उत्पादन बाजारात आणण्यास मनाई केलेली असते. हा कालावधी उलटल्यानंतर मात्र अन्य उत्पादक या किंवा तत्सम द्रव्याचे उत्पादन करू शकतात. यात उत्पादन-एकाधिकार नि संशोधन-एकाधिकार असे दोन भाग असू शकतात. हा एकाधिकार काळ वाढवून मिळावा यासाठी बहुतेक औषध कंपन्या प्रयत्नशील असतात. यात त्यांना मोठा धोका वाटतो तो ‘जेनेरिक ड्रग’ निर्मात्या औषध कंपन्यांचा. या कंपन्या सामान्यपणे स्वतंत्र संशोधन करीत नाहीत. बाजारात आलेले औषधच ते द्रव्याच्या फॉर्म्युलात वेगळेपण दाखवण्यापुरता बदल करून तांत्रिकदृष्ट्या नवे औषध बाजा… पुढे वाचा »

मंगळवार, ३ मे, २०११

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती


  • रोश आणि अ‍ॅडम्स   << मागील भाग रोश त्यावेळी सर्व आवश्यक जीवनसत्त्वांचे उत्पादन करत असे. अशी उत्पादने बनवणार्‍या अन्य कंपन्यांना रोशने आपली उत्पादने घाऊक भावात कमी किंमतीने देऊ करून आपले कारखाने बंद करावेत यासाठी राजी करत असे. अर्थात यात एका बाजूने त्या उत्पादकाचा प्रत्यक्ष फायदा ही लालूच, नपेक्षा त्याच्या ग्राहकांना त्याच्या घाऊक खरेदी किंमती इतकीच किरकोळ विक्रीची किंमत देऊ करण्याची अप्रत्यक्ष धमकी असे दुहेरी शस्त्र वापरले जाई. अॅडम्सच्या कारकीर्दीतच किमान पाच प्रमुख उद्योगांनी आपले कारखाने बंद करून आवश्यक ती जीवनसत्त्वे रोशकडून घ्यायला सुरवात केली. याच दुहेरी अस्त्राचा वापर करूनच अमेरिकेत बड्या मॉल कंपन्यांनी स्थानिक ‘अंकल-आंटी शॉप्स’चा बळी कसा घेतला याचे विवेचन अनिल अवचट यांच्या ‘अमेरिका’ या पुस्तकात आले आहे. याच भवितव्याच्य… पुढे वाचा »

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - २: रोश आणि अ‍ॅडम्स


  • प्रस्तावना आणि भूमिका   << मागील भाग स्टॅन्ले अ‍ॅडम्स: स्टॅन्ले अ‍ॅडम्स हा तसा सुखवस्तू घरातील, माल्टा ( जो आज स्वतंत्र देश आहे ) सारख्या छोट्या ब्रिटिश कॉलनीमधे जन्मलेला. तरुण वयातच विविध भाषांमध्ये प्रवीण झालेला हा तरुण मुळातच सुखवस्तू घरचा नि त्यात सुरवातीच्या काळात जहाज-विमा कंपनीचा एजंट, ब्रिटिश वकिलातीचा प्रतिनिधी, हौशी शेतकरी वगैरे बराच काही होता. पण सुखवस्तूपणाला साजेलशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी म्हणून मग तो औषध व्यवसायाकडे वळला. वेगवेगळ्या देशात नि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम तीन वर्षे काम केल्यावर एका बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीत दाखल झाला. इथून दोन वर्षातच त्याला प्रसिद्ध स्विस कंपनी ‘हॉफमन-ला रोश’ या कंपनीने उचलला. ( एकमेकांचे एम्प्लॉई पळवण्यालाही परंपरा आहे पहा, आपल्या आय टी कंपन्यांनी लाज वाटून घ्यायचं कारण नाही. )… पुढे वाचा »

बुधवार, २७ एप्रिल, २०११

‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका


  • प्रास्ताविक : मानवी इतिहासात अनेक टप्पे आले. प्रथम रक्ताच्या नात्याच्या व्यक्ती एका गणात रहात असत. त्यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जाई. मूळचे एक कार्य – मुख्यत: शिकार, अन्नवाटप नि संरक्षण – एकाहुन अधिक कार्यात विभागून ते विविध व्यक्तींना वाटून देऊन ते साध्य करण्यात येई. हे कार्य त्या गणाच्या, समाजाच्या संदर्भात असे. आहार आणि निद्रा ही दोनच कार्ये खर्‍या अर्थाने वैयक्तिक पातळीवर असत. यानंतर गणांच्या संमीलनातून व्यापक असा समाज बनला, नि त्याचवेळी गणसंस्थेचा आधार असलेल्या बृहत्कुटुंबाचा संकोच होऊन ‘एक-केंद्री’ (nuclear) कुटुंबव्यवस्था रूढ होऊ लागली. आता समाजाअंतर्गत गणाचे/कुटुंबाचे हक्क हा नवा प्रश्न समोर आला. त्याचप्रमाणे याच्याविरुद्ध असा कुटुंबाअंतर्गत/गणाअंतर्गत/समाजाअंतर्गत असा ‘वैय्यक्तिक स्वार्थ’ नि हक्क उपस्थित झाला. समाजव… पुढे वाचा »

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?


  • सध्या क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. त्या निमित्ताने त्यासंबंधी विविध चर्चा, कार्यक्रम झडताहेत. सगळेच हात धुवून घेताहेत. मग आपणच का मागे रहा. म्हणून आम्हीही काहीतरी लिहू म्हटले. बरेच दिवस आमच्या डोक्यात हा विषय ठिय्या देऊन बसला आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की ‘क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?’ थांबा थांबा, थोडंसं इस्कटून सांगतो. क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात– खरंतर यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडतात. ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षक हे मैदानावर बहुसंख्येने असले, तरी ते तुलनेने दुय्यम असतात. मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण प्रश्न असा आहे की ‘हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही?’ आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे लिहितो आहे. एखादा फलं… पुढे वाचा »