Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ७ : लाकूडतोड्याची साक्ष


  • सामुराईच्या आत्म्याची साक्ष   << मागील भाग न्यायालयातील साक्षींचा तपशील तिसर्‍या माणसाला सांगून संपलेला आहे. राशोमोन द्वारावर लाकूडतोड्या अस्वस्थपणे फेर्‍या घालतो आहे. भिक्षू नि तो माणूस खाली बसून त्याच्याकडे पाहत आहेत. लाकूडतोड्या अस्वस्थपणे द्वाराच्या आतल्या बाजूला चालत जातो, अचानक वळतो नि म्हणतो “हे खोटं आहे. तिथे खंजीर नव्हताच. त्याची हत्या तलवारीने झाली.” तो माणूस तुच्छपणे हसून ‘आता हे अपेक्षितच होते’ अशा नजरेने भिक्षूकडे पाहतो. लाकूडतोड्या हलके हलके पावले टाकत द्वाराच्या मागच्या बाजूला जातो, तिथे बैठक मारतो नि मान खाली घालून बसतो. शेकोटीजवळ बसलेला तो माणूस उठतो, त्याच्या जवळ जातो, त्याच्या शेजारी बसतो नि म्हणतो, “आता हे सारे मनोरंजक होते आहे. कदाचित तू स्वतः काय घडले ते पाह… पुढे वाचा »

जंगलवाटांवरचे कवडसे - ६ : सामुराईच्या आत्म्याची साक्ष


  • स्त्रीची साक्ष   << मागील भाग सामुराईच्या आत्म्याला आवाहन केले जात आहे. माझ्याशी लग्न कर- ताजोमारू स्त्रीला विनवतोय. सामुराईचा आत्मा सांगू लागतो. “तिच्याशी संग केल्यानंतर तो डाकू तिच्याशी लाडीगोडीने बोलू लागला. तो म्हणत होता की ‘जंगलात अशा परपुरुषाबरोबर राहिल्याने तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले असल्याने आता ती पतीबरोबर राहू शकत नाहीच. असे असेल तर तिने तिच्या दुबळ्या पतीला सोडून त्याच्याशीच लग्न का करू नये?’ त्याने तिच्यावर अत्याचार केला तो ही त्याच्या मनात तिच्याबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातूनच. ते दोघेही वृक्षातळी निवांत बसून बोलत होते. “हे ऐकताच माझ्या पत्नीने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. ती जणू कोणत्या धुंद… पुढे वाचा »

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ५ : स्त्रीची साक्ष


  • ताजोमारूची साक्ष   << मागील भाग न्यायासनासमोर पालथी पडून ती स्त्री विलाप करते आहे. स्थान तेच पण पार्श्वभूमीमधे थोडा बदल आहे... पूर्वीच्या तीन साक्षींच्या वेळी मागील साक्षीदारांना पुढच्या साक्षीच्या वेळी पार्श्वभूमीवर बसवले होते. त्यामुळे भिक्षूच्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या नि ताजोमारूच्या साक्षीच्या वेळी लाकूडतोड्या आणि भिक्षू पाठीमागे बसलेले होते. लाकूडतोड्या, भिक्षू आणि तिसरा पोलिस, हे तिघे तुकड्यातुकड्याने आपापले अनुभव सांगताहेत. लाकूडतोड्याच्या साक्षीने एक हत्या झाली आहे असे कळते, भिक्षूच्या साक्षीने घटनस्थळापाशी त्याने एका स्त्री-पुरुषाला पाहिले होते हे सांगितले जाते, तर पोलिसाच्या साक्षीने त्याने संशयिताला– एका डाकूला पकडून आणले आहे. लाकूडतोड्याने ज्या गुन्ह्याची परिणती - ते प्रेत - पाहिले त्या गुन्ह्याचा आरोप त्याच्या… पुढे वाचा »

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ४ : ताजोमारूची साक्ष


  • कथाप्रवेश   << मागील भाग ताजोमारू सांगू लागतो, “तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. रणरणत्या दुपारी एका विशाल वृक्षातळी मी विश्रांती घेत पडलो होतो. समोरून एक पुरूष घोड्यावर बसलेल्या एका स्त्रीला घेऊन येत होता. मला पाहताच तो थांबला. त्याच्या चेहर्‍यावर भय दिसले. नकळत त्याने आपल्या तलवारीला हात घातला. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपी जाण्याच्या प्रयत्नात होतो. ते पाहून तो थोडा आश्वस्त झाला. एक नजर माझ्यावर ठेवून तो पुढे चालू लागला. ते माझ्याजवळून पुढे जात असतानाच ती झुळुक आली. पाने सळसळली नि मला ओलांडून त्या घोड्यावरील स्त्रीला स्पर्श करून पुढे निघून गेली. त्या झुळुकीने त्या स्त्रीचे अवगुंठन दूर झाले नि तिचा चेहरा माझ्या नजरेस पडला. “कदाचित तिचा चेहरा क्षणभरच दिसला म्हणून असेल, ( ती खरंतर फारशी सुंदर नसावी, किंवा निदान आज ती तश… पुढे वाचा »

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - ३ : कथाप्रवेश


  • दोन कथा, सहा माणसे   << मागील भाग “क्योटो: बारावे शतक, दुष्काळ आणि लढाया यांनी उद्ध्वस्त झालेली राजधानी” (१) राशोमोन द्वार धुवांधार पाऊस कोसळतोय. कधीकाळी भक्कम वाटावेत असे वासे असलेले छप्पर शिरी घेऊन एक वेशीसारखे द्वार उभे आहे. पण ते छप्पर आता विवर्ण झाले आहे. त्यातील छिद्रातून, भगदाडातून तो पाऊस बेलगामपणे आत घुसतो आहे. आजूबाजूला मोडून पडलेले वासे दिसतात, नि शबल झालेल्या भिंती. कधीकाळी या वैभवशाली असलेल्या द्वाराला तोलून धरणारे चार-पाच पुरूष उंचीचे नि किमान दोघा-तिघांना मिळूनच कवेत घेता येतील असे भरभक्कम खांबही आता विदीर्ण झाले आहेत.  छपराला दाद न देता आत घुसलेल्या पावसाच्या पाण्याने जमिनीवर तळी साचली आहेत. बाजूलाच या द्वाराचा कधीकाळी आधार असलेला एक भक्कम खांब पराभूत होऊ… पुढे वाचा »

रविवार, ८ एप्रिल, २०१२

जंगलवाटांवरचे कवडसे - २ : दोन कथा, सहा माणसे


  • उपोद्घात   << मागील भाग ‘राशोमोन’ या अविस्मरणीय चित्रपटाबद्दल इतके लिहिले गेले आहे, की आता आम्ही राशोमोनवर लिहिणार म्हटल्यावर ‘आता तुम्ही नवीन काय सांगणार?’ असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. पण ‘राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनी कवणे काय चालोची नये?’ अशी माउलींच्या शब्दांची उसनवार करून उलट विचारणा करून आमचे घोडे दामटतो. चित्रपटाची पटकथा ही घटनाक्रमाचा विचार करता अतिशय छोटा जीव असलेली कथा आहे. कथेचा गाभा ‘इन द ग्रोव्ह’ ही रुनोसुको अकुतागावाची आकाराने लहान, पण आवाक्याने मोठी गोष्ट. कथानक लहानसेच. जंगलातून एक सामुराई आपल्या पत्नीसह चालला असताना तेथील एका ताजोमारू या कुप्रसिद्ध डाकूच्या मनात त्या स्त्रीबाबत लालसा निर्माण होऊन तो तिच्यावर अत्याचार करतो. यात त्या सामुराईचाही मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ता… पुढे वाचा »