Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, २० एप्रिल, २०२२

कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने


  • बातमी: कुराणाचा प्रथमच संस्कृतमध्ये भावानुवाद ; दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या ग्रंथाचे शुक्रवारी प्रकाशन --- काही काळापूर्वी जावेद अख्तर यांचे रेख़्ता या वार्षिक उर्दू संमेलनातील भाषण ऐकले होते, त्यावर ’वेचित चाललो...’ वर (’ भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार ’) लिहिलेही होते. त्या भाषणादरम्यान त्यांनी केलेला एक उल्लेख मला रोचक वाटला होता. ते असं सांगतात की, १७९८ मध्ये कुराण प्रथम उर्दूमध्ये अनुवादित केले गेले. त्यावेळी ’असल्या अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले’ म्हणून तो अनुवाद करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा काढला होता. त्याचवेळी ’असल्या अमंगळ भाषेला ’देव’नागरी नावाने ओळखळी जाणारी आमची पवित्र लिपी वापरल्याने ती विटाळेल’ असा विरोध हिंदू समाजातील संभावितांनी केला होता. ’अमंगळतेच्या कल्पना अमंगळ मनातूनच येतात’ हे माझे … पुढे वाचा »

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ६ : अनुक्रमणिका आणि सूची


  • मजकूर सुरक्षितता « मागील भाग --- ब्लॉगच्या मजकुराची शक्य तेवढ्या सुरक्षिततेची सोय केल्यावर आता पुढच्या टप्प्यात विचार करायचा, तो ब्लॉगच्या सुशोभीकरणाचा. त्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी, बाबी वा पर्याय वाचकाला उपयुक्त ठरु शकतात याचा विचार करायला हवा. हा विचार तुमच्या ब्लॉगमधील विषयांच्या अनुषंगाने व्हावा. एका प्रकारच्या ब्लॉगसाठी जे तंत्र कामात येईल, तेच सर्व प्रकारच्या ब्लॉग्सना लागू असेल असे नव्हे. व्यावसायिक ब्लॉग्समध्ये उपयुक्त ठरणारे पर्याय साहित्यिक लेखनाच्या ब्लॉगमध्ये तितकेच उपयुक्त असतील असे नाही. आणि तिथे उपयुक्त असणारे पर्याय हे प्रासंगिक लेखनाच्या, 'सुचले तसे' अथवा run of the mill प्रकारच्या लेखनाच्या ब्लॉगवर कामात येतील असे नाही. बहुतेक ब्लॉगमंचांवर तुमच्या पोस्ट्सची अनुक… पुढे वाचा »

रविवार, १० एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ५ : मजकूर सुरक्षितता


  • ब्लॉग लिहिल्यानंतर « मागील भाग --- वास्तव आयुष्यात मृत्यू टाळता येत नाही, औषधांनी त्याची संभाव्यता कमी करता येते. आभासी जगात लेखन-चौर्य टाळता येत नाही, पण त्याची संभाव्यता कमी करता येते. - स्वामी जिज्ञासानंद काही वर्षांपूर्वी मी मराठी संस्थळांवर सक्रीय होतो तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याचे आणि माझे लेखन आवडल्याचे एका संस्थळमित्राने 'व्यक्तिगत निरोपाने’ (हा संस्थळावरचा खासमखास शब्द) कळवले. मी बुचकळ्यात पडलो. माझा ब्लॉगच नव्हता आणि मी तसा नुकताच लिहू लागलो होतो. दोन-चार बरे लेख या पलिकडे फारसे लिहिलेही नव्हते. त्या लेखनाला आज मी लेखन म्हणू धजणार नाही. फेसबुक पोस्टच्या दर्जाचे ते लेखन म्हणता येईल. Shutterstock.com येथून साभार. कुतूहल म्हणून मी शोधले, तर माझा एक ले… पुढे वाचा »

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ४ : ब्लॉग लिहिल्यानंतर


  • ब्लॉग लिहिताना « मागील भाग --- ब्लॉग तयार केल्यानंतर, ब्लॉगपोस्ट लिहिल्यानंतर बहुतेक ब्लॉगर मंडळी ’प्रसिद्ध करा’ (Publish) पर्याय वापरतात नि थांबतात. याच्यापुढे काही असते याची बहुतेकांना माहिती नसते. काही मंडळी तर इतकी बेफिकीर दिसतात, की त्यांच्या एकाच पोस्टमध्ये वेगवेगळ्या आकाराचा वा प्रकाराचा फॉन्ट असणारा मजकूर दिसतो. अन्य एडिटरमधून किंवा अन्य वेबसाईटवरून पेस्ट करताना त्याच्या फॉरमॅटिंगचे काय होते, याबाबत बहुतेक सारे अनभिज्ञ असतात. बरं निदान समोर वेगवेगळे फॉन्ट दिसत असताना ते सुधारून कसे घ्यावे याचा विचार तरी करावा. यातील काही मंडळी तर पोस्ट प्रसिद्ध केल्यावर ती पोस्ट, आपला ब्लॉग, निदान आपल्या ब्राउजरवर व्यवस्थित दिसते का, याची शहानिशाही करत नसावेत असा मला दाट संशय आहे. (जसे फेसबुकवर शेअर बटन दाबल्यावर आपली वॉल पाहून आपल्याला अपेक्षि… पुढे वाचा »

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ३ : ब्लॉग लिहिताना


  • माझी वाटचाल « मागील भाग --- (हा भाग सामान्य तयारीचा आहे. ज्यांना ब्लॉग सुरु करायचा आहे पण त्याबाबत अजिबात माहिती नाही अशांना अधिक उपयुक्त. मी स्वत: ब्लॉगर वापरत असल्याने इथे स्क्रीनशॉट्स त्याचे दिले आहेत.) सर्वात प्रथम तुम्हाला स्वत:चा असा ब्लॉग पत्ता तयार करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला ब्लॉगचे नाव निश्चित करुन त्यानुसार पत्ता तयार करता येईल. उदा. रमताराम या टोपणनावाने मी संस्थळावर लेखन करत असल्याने ’रमतारामाचे विश्रांतीस्थळ’ हे माझ्या ब्लॉगचे नाव निवडले आणि म्हणून ramataram हा माझा ब्लॉग पत्ता निश्चित केला. आता हा ब्लॉग तयार करण्यासाठी मी प्रथम ब्लॉगर.कॉम (किंवा तुमचा ब्लॉगसेवादाता जो असेल तो) वर लॉगिन केले. (गुगलचा फायदा - आणि कदाचित तोटाही - हा की एकदा गुगल लॉगिन केले की ब्लॉगरव… पुढे वाचा »

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - २ : माझी वाटचाल


  • माध्यमे « मागील भाग --- मराठी समाजमाध्यमे माझ्याबाबत बोलायचे तर माझी वाटचाल ही मराठी समाजमाध्यमांवरून सुरू झाली. अगदी थोड्या काळासाठी मायबोली ( maayboli.com ) व मनोगत ( manogat.com ), मग बराच काळ मिसळपाव ( misalpav.com ) आणि अखेरीस मीमराठी (mimarathi.net ... हे आता अस्तंगत झाले) आणि अगदी अधूनमधून उपक्रम ( mr.upakram.org ... हे आता वाचनमात्र करण्यात आले आहे.) अशा मराठी संस्थळांवर मुक्काम झाला. यांची मांडणी प्रासंगिक, अप्रासंगिक आणि मूलभूत मुद्द्यांवरच्या दीर्घ लेखनाला सोयीची अशी आहे. तुम्हाला जसा वापर करायचा तसा करावा. यापैकी 'मनोगत’चे वैशिष्ट्य हे की त्यांनी प्रथमच शुद्धलेखन-चिकित्सा प्रणाली उपलब्ध करुन दिली. गमभन’ नावाचाच सोपा एडिटर आणि ही सुविधा यांमुळे लेखनाच्या वाचनीयते… पुढे वाचा »

माझी ब्लॉगयात्रा - १ : माध्यमे


  • दोन वर्षांनंतर फेसबुकवर पुन्हा पाऊल ठेवल्यानंतर मी माझ्या ब्लॉग्सवरील काही लेखांच्या लिंक्स फेसबुकवर शेअर केल्या. दोन चार पोस्ट झाल्यावर, माझ्याइतक्याच उद्धट असलेल्या एका मित्राने विचारलं, ’शिळ्या कढीला का ऊत आणतो आहेस?’ तो असे विचारतो आहे, म्हणजे ’त्याने हे आधीच वाचले असावे का?’ असा प्रश्न माझ्या मनात उमटला. पण हा मित्र ’फक्त समोर येईल तेच वाचतो’ गटातला असल्याने हे शक्य नव्हते. मग हे ’कुठल्या अर्थाने शिळे?’ तर म्हणे, ’ब्लॉगवर आधीच छापले आहेस ना?’ गंमत आहे पाहा. लेखकाने एखादी कथा कादंबरी लिहिल्यानंतर किती काळाने ती आपण वाचतो? गेलाबाजार त्याचे पुस्तक छापून बाजारात आल्यावर, किती काळाने ते आणतो, वाचतो. आपल्या आधी इतर अनेकांनी त्याच्या प्रती नेऊन वाचलेले असते. पण ते लेखन शिळे आहे असे आपण म्हणत नाही. पण डिजिटल माध्यमात मात्र यांना रोज ताजे ले… पुढे वाचा »