-
कर्जाच्या विळख्यात अडकलेले अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स एनर्जी’ ही कंपनी, अखेर अदानींच्या छावणीत दाखल झाली. ग्राहक विजेची बिलं भरायला रांगेत उभे राहिले, ‘रिलायन्स’च्या जागी ‘अदानी’ हे नाव त्यांना दिसले! दुसरीकडे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या त्यांच्या कंपनीला, सरकारी आशीर्वादाने राफेल विमानांच्या उत्पादनाचे मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हा राजकीय वर्तुळात सर्वाधिक वादग्रस्त (अगदी बोफोर्सपेक्षाही) प्रश्न बनला. धीरूभाईंच्या मृत्यूनंतर ज्यांच्याकडे त्यांचा खरा वारस म्हणून पाहिले गेले, त्यांचीच उतरती भाजणी सुरू झाली. राजकारणात असो की व्यावसायिक क्षेत्रात, एका पार्टीच्या दोन पार्ट्या झाल्या की, नकळत आपण म्हणजे समाज एका बाजूला झुकतो. अमुक एक हाच खरा वारसदार, असे आपण समजू लागतो. पुढे हाच प्रगती करेल नि दुसऱ्या बाजूला माघार घ्यावी लागेल, असा काहीसा… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८
वारसदारांचा अपकर्ष!
भेकड नेते आणि शेंदाड शिपाई
-
ज्या लोकांना वाटतं किंवा वाटत होतं की महात्मा गांधीजींना मारलंच पाहिजे होतं, त्यांना ‘जिना आणि माऊंटबॅटन (किंवा त्यांचे पूर्वसुरी) यांना का मारलं नाही?’ असा प्रश्न पडत नाही. याचं एक कारण म्हणजे विचार करणे त्यांच्या रक्तात नसते, हे तर आहेच पण त्या पलीकडे मुळात गांधींबद्दल द्वेष असणार्यांच्या प्रचाराला बळी पडलेले असतात. या प्रचारकांच्या द्वेषामध्ये एका बनियाने आपल्या सारख्या जन्मजात श्रेष्ठींऐवजी देशातील जनतेचे नेतृत्व करावे, ही अहंकाराला बसलेली मोठी ठेच मुख्यत: कारणीभूत असते . आता ज्यांना जिना किंवा एखादा ब्रिटिश अधिकारी ठार मारण्याऐवजी गांधींवर हत्यार चालवणे, त्यांची हत्या करणे अधिक महत्वाचे का वाटत असावे? याचे एक कारण म्हणजे त्यांना परिणामापेक्षा श्रेयाची अधिक आस होती हे नंतर दिसून आले आहे . ज्यांना असं वाटत होतं किंवा वाटतं, ते प्रा… पुढे वाचा »
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८
शर्विलकाचा प्रतिशंखनाद आणि जमाव
-
Travor Noah यांच्या ’The Daily Show’ या कार्यक्रमातील ’Trump Weaponizes Victimhood' हा एपिसोड ‘आपले सब्जेक्ट्स* कुठेतरी एक पायरी वर चढताहेत, यातून कदाचित आपल्या स्थानाला धक्का बसू शकतो’ याची जाणीव झालेल्या वर्चस्ववाद्यांच्या चलाख मांडणीचे ट्रम्प यांनी उत्तम उदाहरणच सादर केले आहे. संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी नेहमीच आकडेवारी ला प्राधान्य देतो. तिच्या अभावी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष, केलेले आरोप हे केवळ पूर्वग्रहांचे नि स्वार्थाचे अपत्य असतात. (अर्थात अलीकडे खोटे आकडेही तोंडावर फेकण्याची अहमहमिका सुरु झालेली दिसते. त्यामुळे त्या आकड्यांची विश्वासार्हता हा ही एक कळीचा मुद्दा ठरतो. ) ‘आमच्या गटावर झालेला एक अन्याय हा आमच्यावरील नि… पुढे वाचा »
शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८
ब्रह्मांडाचे वांझ अंडे
-
ब्रह्मांडाच्या अंड्याला फलित न करु शकलेला शुक्राणु, विश्वाच्या पसार्याला रचून ठेवता येईल इतक्या विस्ताराचे कपाट कपाटाला पुन्हा विश्वातच जागा द्यावी लागेल ही कॅच-२२ सिचुएशन, हे सारे आपल्याच जबाबदारीचा भाग असे समजणारा कुणी मी. क्रोएशियाच्या राजधानीत मिळणारे बेकन, कुर्डुवाडीच्या स्टेशनवर मिळणारे बेसन, राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नावर नेमके मूग गिळून बसणारे बंडातात्या... डायनासोरची वंशावळ सांगणारे आणि ‘कृण्वन्तु विश्वमजुरासिकं’ ची गर्जना करणारे क्रीट काका; त्यांना ‘डायनासोर जुरासिक काळात नव्हते’ असं सांगत मोडीत काढणारे शेरसिंग समीक्षक पाण्याच्या एका थेंबासरशी विरघळणारी काळी आई, आणि ‘आईन्स्टाईनच्या बैलाला ढोल’ म्हणणारे संशोधक गोमयानंद सरस्वती; रक्ताचा थेंब पा… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)