-
एखादा सुरेखसा चित्रपट नुकताच मिळालेला असतो. रात्री जेवणानंतर किचनची कामे पटापट उरकून तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ, असे मनचे मांडे खात असता. सफाई करत असताना नुकत्याच आणलेल्या सहा कपांच्या सेट मधला एक कप तुमच्या हातून निसटतो, सुमारे तीन-साडेतीन फुटावरुन सरळ जमिनीवर आदळतो. आणि दोन तीन भक्कम टप्पे खात पाचेक फुटावर जाऊन विसावतो. इतका मार खाऊन त्या कपाचा कानच फक्त तुटतो.
आता तुमच्यासमोर ‘याचे काय करावे?’ हा यक्षप्रश्न उभा राहतो.
alittlechange.com.au येथून साभार.हा कप आता बाद झाला म्हणून टाकून द्यावा, तर त्याची एक बाजू पाहता ते अवघड दिसते. एकतर नवा आहे, त्यात कानाचा गेलेला बळी वगळता, इतका मार खाऊनही टवकाही न उडालेली बॉडी भक्कम असल्याचा पुरावा देत असते. त्याचबरोबर तो बहिरा कप चहाखेरीज अन्य काही द्रवपदार्थ साठवता येत असल्याचा फायदा समोर ठेवून,किचनचे अन्य भागधारक त्याला फेकून देण्यास विरोध करणार, याची तुम्हाला पक्की खात्री असते...
पण दुसरीकडे साधा कागद कापतानाही ९० म्हणजे नव्वदच अंशात कापला गेला पाहिजे, इतके दुराग्रही असलेले तुम्ही; त्याचा तो तुटका कान तुम्हाला कायमच ‘अपुरेपणही लगे’ ची आठवण करुन देत समोर ठाण मांडून बसणार नि कायमचा त्रास देणार हे ही लक्षात येते...
तिसरा पर्याय म्हणजे हातून निसटून पडला त्यावेळीच कानासोबत त्याचे काही तुकडे झाले, अशी बतावणी करता यावी म्हणून त्या कपावर बत्ता, हातोडी वा तत्सम वस्तूने प्रहार करुन एक-दोन तुकडे पाडावेत. पण सशाहूनही कोमल हृदयाचे असल्याने तुमच्या हातून असा विध्वंस होणे शक्यच नसते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वैर्यासमोरही असे अवघड प्रश्न उभे राहू नयेत हो कधी.- oOo -
शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८
कप के बिछडे हम आज...
संबंधित लेखन
विरंगुळा
विश्लेषण

अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी
(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन...

पदवीधरा...
(एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २...

राजसा, किती दिसांत...
उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment... ( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा