Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - २


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - १


  • विषयसंगतीमुळे हा लेख ’ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

नॉर्मा आणि कम्मो


  • ’हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?" "हो!" "हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!" जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ’कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियाँ चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले. काही वर्षांपूर्वी ’सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. सायलेंट मूवीजच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक. अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा, वास्… पुढे वाचा »

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

नव-चित्रकार कसे व्हावे


  • प्रथम दाढी वाढवावी. (दाढीऐवजी शेंडी चालेल का असा जातीयवादी प्रश्न विचारु नये.) आकाशात शून्यात बघून किंवा थेट जमिनीकडे पाहात तिरपे चालत जाण्याचा सराव करावा. फाटकी, विटकी जीन्स (किंवा अनेक खिशांची बर्म्युडा चालेल) वर चे गवेरा/ग्वेवेरा/ग्वेव्हाराचा अनेक वेळा धुवून विटका झालेला टी-शर्ट वापरायला सुरुवात करावी. ( त्याऐवजी वेडेवाकडे, अगम्य असे रंगांचे फटकारे असलेले चित्र ’गोंदवून’ घेतलेलाही चालेल.) कोणतेही एखादे स्वस्त अथवा फुकट असे पेंटिंगचे कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन घेऊन त्यात रोज वाट्टॆल तसे फराटे मारुन बरबटलेले चित्र बनवून फेसबुकादि समाजमाध्यमांवर ’रोज एक तरी चित्र पोस्टावे’ या न्यायाने टाकून द्यावे. सोबत एक अगम्य क्याप्शन द्यावा. एक फासा टाकून रॅंड्मली एक माध्यम निवडून हे त्या माध्यमातले आहे अस… पुढे वाचा »