Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

थोरांची ओळख


  • शाळेत असताना एका वर्षी इतिहासातील महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासाला होती. अभ्यासक्रमाच्या या पुस्तकाचे शीर्षक होते ’थोरांची ओळख’. पण अलिकडे असे ध्यानात आले की आसपास इतके थोर लोक आहेत की त्या सार्‍यांची ओळख करुन द्यायची तर किमान शतखंडी ग्रंथच लिहावा लागेल. हे फारच खर्चिक नि वेळखाऊ काम आहे. एरवी टोमणेबाजी करणारी मीम्स बनवू म्हटले तर नको नको म्हटले तरी लोक मदतीला येतील. पण अशा उदात्त कामात सहकारी मिळणेही अवघड... अचानक मला आई म्हणायची तो एक श्लोक आठवला. आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगं कांचनम् | वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रीव संभाषणम् || वाली निर्दालनम् समुद्र तरणम् लंकापुरी दाहनम् | पश्चात्‌ रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् || चार ओळीत संपूर्ण रामायण साररूपात सांगणारा हा श्लोक आठवला नि मी एकदम ’युरेका, युरेका’ म्हणत धावत … पुढे वाचा »

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

ते म्हणतात...


  • तो म्हणाला, "फलाण्याबाबतीत गणपाचे वागणे बरोबर नाही" गणपा म्हणाला, "’त्या’बाबतीत गण्याला बोलत नाही, फाटते याची." तो म्हणाला, "ढेकाण्याबाबतीत गण्याचे वागणे बरोबर नाही." गण्या म्हणाला, "’त्या’बाबतीत गणपाला बोलत नाही, फाटते याची." तो म्हणाला, "अमुक मुद्द्यावर गण्याची बाजू योग्य आहे." ते म्हणाले, "हा छुपा मनुवादी आहे." तो म्हणाला, "तमुक मुद्द्यावर गणपाची बाजू बरोबर आहे." ते म्हणाले, " हा अर्बन-नक्षलवादी आहे.’ तो म्हणाला, "ढमुक मुद्द्यावर दोन्हीं बाजूंच्या दाव्यात तथ्य आहे." ते म्हणाले, "हे समाजवादी लेकाचे कायम कुंपणावर." तो म्हणाला, "टमुक मुद्द्यावर दोन्ही बाजूंची चूक दिसत… पुढे वाचा »

बुधवार, १४ जुलै, २०२१

भोपळे


  • pngwing.com येथून साभार. मोठ्ठ्या कलादालनात मोठ्ठ्या कलाकाराचे मोठ्ठे प्रदर्शन चालू आग्नेयेला एक चित्र माणसाचं वाटणारं बिनधडाचं मुंडकं नैऋत्येला एक शिल्प एक लोभस स्नोमॅन सनबाथ घेणारा ईशान्येला एक कॅनव्हास कचर्‍यातून कलेचा उभा एक डोलारा वायव्येला फक्त एक टेबल त्यावर मधोमध ठेवलेला भोपळा... ...एक दाढीवाला म्हणाला, परीक्षा व्यवस्थेवरचे केवढे मौलिक भाष्य एक झोळीवाला म्हणाला हॅलोविनच्या पोकळतेचा केवढा मार्मिक निषेध एक जाड-भिंगवाला म्हणाला अंतर्बाह्य रंगसंगतीचा देखणा आविष्कार एक बोकड-दाढी म्हणाली आईन्स्टाईनच्या मेंदूचे लक्ष्यवेधी इन्स्टॉलेशन इतक्यात... कुणी एक आला, तिथे पाण्याच्या बाटल्या ठेवून भोपळा घरी घेवोनि गेला - oOo - पुढे वाचा »

रविवार, ११ जुलै, २०२१

विम्बल्डनचा पावित्र्यभंग


  • टेनिसच्या चाहत्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ही चारी धाम यात्रा. प्रत्येक धामी तयार केलेल्या कोर्टनुसार कुठे कुठल्या प्रकारचा खेळ पाहायला जावे याचा अंदाज त्यांना असतो. फ्रेंच स्पर्धेसाठी मातीची कोर्ट वापरली जात असल्याने वेगापेक्षा चौफेर खेळाला (territorial play) अधिक महत्व असते. खेळणारी खेळाडू चतुरस्र नसेल तर तिचीची डाळ तिथे शिजत नाही. त्याच्या उलट विम्बल्डनचे. इथे हिरवळीची कोर्ट असतात. त्यामुळे इथे सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली प्रकारचा खेळ अधिक होतो. यात चौफेर खेळापेक्षा अनेकदा बिनतोड (Ace) सर्व्हिस करणारी खेळाडू अधिक प्रभाव पाडत असते. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये बेसलाईन (म्हणजे कोर्टाची कड) अधिक महत्वाची तर विम्बल्डनमध्ये नेटजवळ वर्चस्व गाजवू शकणार्‍या खेळाडूच्याला यशाची शक्यता अधिक असते. अमेरिकन स्पर्धेत कृत्रिम हार्डको… पुढे वाचा »

शनिवार, १० जुलै, २०२१

माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे


  • ‘प्रॉफिट ही भगवान है’   << मागील भाग माध्यमांवरील या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले एक वाक्य इथे संदर्भासाठी पुन्हा उद्धृत करतो आहे दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक-पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले. खरंतर जेव्हा हे ध्यानात आले तेव्हापासूनच मी माध्यमांच्या वाटचालीकडे अधिक बारकाईने पाहू लागलो. पण या निरीक्षणाबाबत थोडे विस्ताराने लिहायला हवे. या चार विषयांपलिकडे असतेच काय?’ असा प्रश्न कदाचित या मनोरंजनाच्या आहारी गेलेल्यांना पडू शकेल. त्यासाठी थोडे मागे जाऊन ’दूरदर्शन’ या सरकारी माध्यमाकडे पाहता येईल. खासगी माध्यमे नव्हती तेव्हा टेलिव्हिजन मनोरंजनावर दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. त्या वेळी त्यावरुन सादर झ… पुढे वाचा »

बुधवार, ७ जुलै, २०२१

माध्यमे - २: प्रॉफिट ही भगवान है


  • 'खपते ते विकते'   << मागील भाग मागील लेखात इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या निमित्ताने चॅनेल-माध्यमांवरील कार्यक्रमांच्या विषय नि स्वरुपासंदर्भातील धंदेवाईकतेवर भाष्य केले होते. टीआरपीच्या स्पर्धेत शक्यतो जे खपते तेच विकण्याचे त्यांचे धोरण असते. पण हा काही केवळ दृश्य-माध्यमांचा दृष्टिकोन आहे असे म्हणता येणार नाही. अन्य माध्यमांचे धोरणही याच्याशी मिळतेजुळतेच असते. काही काळापूर्वी एका वेबसाईटवर मी ’चेकर्स’ हा खेळ खेळत असे. अगदी ’तज्ज्ञ पातळीवरून’ खेळणार्‍या संगणकालाही आपण सहज हरवत आहोत असे काही सामन्यांतच लक्षात आले. संख्याशास्त्रीय दृष्टीने पाहू लागल्यावर ध्यानात आले, की प्रत्येक सामन्याच सरासरी वेळ हा तीन ते चार मिनिटे इतकाच आहे. इंटरनेटवर या प्रकारचा खेळ खेळणार्‍यांच्या करणार्‍यांच्या सहनशक्तीचा हा खेळ उपलब्ध करुन देणार्… पुढे वाचा »

रविवार, ४ जुलै, २०२१

माध्यमे - १: खपते ते विकते


  • ’इंडियन आयडॉल’ या तथाकथित गुणवत्ता-शोध स्पर्धेबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. मे महिन्यामध्ये त्यात स्व. किशोरकुमार यांना आदरांजली वाहणारा विशेष भाग सादर झाला. त्यात किशोरकुमार यांचे चिरंजीव आणि गायक अमितकुमार यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमातील गायकांचे कौतुक केले होते. पण हा कार्यक्रम संपल्यावर अनेक किशोरप्रेमींनी त्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली. या कार्यक्रमात किशोरदांच्या गाण्यांची पार वाट लावली असा सूर अनेक किशोरप्रेमींनी लावला. परीक्षक म्हणून बसलेल्या नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांच्यावर टीकेची झोड उठली. स्वत: अमितकुमार तिथे उपस्थित असून त्यांनी याबाबत स्पष्टपणे न बोलता, उलट सुमार गायन नि गायकांची प्रशंसा केल्याबद्दल लोकांनी त्य… पुढे वाचा »