-
’व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?’ हा प्रश्न अनेकांकडून- विशेषत: हवी ती मुलगी भाव देत नसल्यामुळे व्यथित झाल्यामुळे स्वत:ला गुड बॉईज समणार्यांकडून, विचारला जात असतो. परवा फेसबुकवरच कुणाच्या तरी प्रतिसादात वाचला आणि काही काळापूर्वी पाहिलेल्या एका मालिकेची आठवण झाली. www.shutterstock.com येथून साभार. स्टार्स हॉलो नावाचे एक लहानसे शहर. अशा ठिकाणी असते तसे साधारण कम्युनिटी लाईफ, शहरीकरणातून आलेल्या व्यक्तिकेंद्रित आयुष्याचा प्रवाह तितकासा बलवान झालेला नाही. इथे लोरलाय नावाची एक स्त्री आपल्या मुलीसह राहते आहे. ही रोरी १६ वर्षांची अतिशय गोड मुलगी, आसपासच्या सर्वांची आवडती. अमुक बाबतीत, अमुक व्यक्तीबाबत इतके सहानुभूतीने वागण्याची वा सक्रीय मदतीची काय गरज होती?’ या प्रश्नावर ’यू नो, इट्स र… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
मंगळवार, २१ जून, २०२२
व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?
सोमवार, २० जून, २०२२
बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी
-
तीन-चार महिन्यांपूर्वी हिजाबचा मुद्दा तापवला जात होता, तेव्हा पुरोगामी विचारांच्या मंडळींची चांगलीच कोंडी झाली होती. ’हिजाब घालण्याचे स्वातंत्र्य’ यात स्वातंत्र्य हे मूल्य आहे म्हणून ती बाजू घ्यावी, तर हिजाबसारख्या मागास पद्धतीची भलापण केल्याचे पाप पदरी पडते. आणि हिजाब विरोधकांचे म्हणणे योग्य म्हणावे, तर एका समाजाबाहेरच्या गटाने त्या समाजावर लादलेल्या निर्णयाचे समर्थन केल्याचे ( आणि व्यक्ति-स्वातंत्र्याला विरोध केल्याचे ) पाप पदरी पडते . आज ’अग्निपथ’ योजनेच्या निमित्ताने देशभरात ज्या घडामोडी चालू आहेत, त्यांनी साधकबाधक विचार करणार्यांची पुन्हा एकवार कोंडी केली आहे. ’तुम्ही आमच्या बाजूचे की विरोधकांच्या?’ हा एक प्रश्न, आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी सार्या जगालाच दिलेली ’तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर दहशतवाद्यांच्या… पुढे वाचा »
गुरुवार, २ जून, २०२२
हनुमान जन्मला गं सखे
-
अमेरिकेमध्ये जसे ’खटला जॉनी डेप जिंकेल, की त्याची भूतपूर्व पत्नी एम्बर हर्ड?’ हा सध्या राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे, तद्वत ’हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ हा विषय भरतभूमीमध्ये सांप्रतकाळी महत्वाचा होऊन बसला आहे. किष्किंधा, अंजनेरी यांच्या वादात आता सोलापुरातील कुगावनेही उडी घेतली आहे. तीनही ठिकाणी ’हनुमानाचा जन्म आमच्या गावी झाला’ अशी श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. ते तसे मान्य झाल्याने वाढलेल्या भक्ति-पर्यटनामध्ये त्यातील काहींचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतील, हे ही त्यांच्या ’श्रद्धे’चे कारण असू शकेल. पण अशा माणसांना वगळून आपण ज्यांची खरोखर तशी श्रद्धा आहे अशांचीच बाजू ध्यानात घेऊ. श्री भक्त-हनुमान मंदिर रम्बोदा, श्रीलंका. विषय एका धर्मांतर्गत असल्याने सध्या शास्त्रार्थावर न… पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
धर्मव्यवस्था,
श्रद्धा,
सत्ताकारण
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)