Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, २१ जून, २०१५

आम्ही सारे स्टँप-कलेक्टर


  • मागच्या वर्षी २ ऑक्टोबरला नव्यानेच अधिकारारुढ झालेल्या सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’ची सुरुवात केली. गावात, खेड्यांपाड्यांत, शहरातील गल्लोगल्ली, स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सुरू झाला. सर्व वृत्तपत्रांतून मोदींचा पूर्ण पानभर फोटो असलेल्या जाहिराती झळकू लागल्या. सारा सोहळा एकुणच वाजतगाजत पार पडला. वृत्तपत्रांतून, सोशल मीडियांतून आपण 'साजरा केलेल्या' स्वच्छता दिनाचे फोटो आणि रसभरीत वर्णने वाचायला मिळू लागली. दीर्घकाळ वेतन न मिळाल्यामुळे, भाजपाशासित पूर्व-दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी प्रथम मार्च महिन्यात, आणि आता जून मधे तब्बल बारा दिवस संप केला. या काळात सार्‍या दिल्लीचा कचरा डेपो झालेला दिसला. ऑक्टोबरमधे हाती झाडू घेतलेले ते स्वयंसेवक, कार्यकर्ते या काळात कुठे सफाई करताना दिसले नाहीत. तसे मार्चमधे जेव्हा योगेन्द्र यादव … पुढे वाचा »

शनिवार, १३ जून, २०१५

चाले वाचाळांची दिंडी


  • ४ जूनला मणिपूरमधल्या डोग्रा रेजिमेंटच्या जवानांच्या झालेल्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवादी गटांच्या दोन तळांवर ९ तारखेला पहाटे भारतीय लष्कराने आणि वायुदलाने हल्ला करून ते उध्वस्त केले. या ऑपरेशनची माहिती  ‘आर्मी हेडक्वार्टर्स’ तर्फे मे.ज. रणबीर सिंग यांनी माध्यमांना दिली. त्यानुसार भारतीय सैन्याने ‘म्यानमारच्या सहकार्याने’, ‘सीमेलगत’ दोन तळांवर हल्ला करून ते उध्वस्त केले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने भारतीय लष्कराने ‘म्यानमारच्या भूमीवर’ येऊन कारवाई केली असल्याचा, पण म्यानमारचे लष्कर यात प्रत्यक्ष सहभागी नसल्याचा, दावा म्यानमारच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे संचालक झॉ-ताय यांच्या हवाल्याने केला होता. परंतु AFP या वृत्तसंस्थेला दिलेल्या अधिकृत निवेदनात झॉ-ताय यांनी केवळ ‘सहमती नि सहकार्या’चा, यात म्यानमारचे लष्कर प्रत्यक्ष सहभागी झाले नसल्याचा… पुढे वाचा »

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

‘सायलेंट मोडमधल्या कविता’: नव्या जाणिवांची विचक्षण कविता


  • गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन ‘जागतिकीकरण’ या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने, आणि या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या हाताला जणू सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला ‘मोबाईल’ या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली. जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, ‘माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला’ असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या … पुढे वाचा »