-
कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग « मागील भाग --- नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली. पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, २५ एप्रिल, २०२०
जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर
Labels:
‘दिव्य मराठी’,
कोरोना,
जग जागल्यांचे,
जिज्ञासानंद,
संरक्षणव्यवस्था
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे
-
भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे असे मी म्हणतो. ते तंतोतंत खरे करण्याचा माझ्या देशबांधवांचा प्रयत्न पाहून माझे ऊर भरून येतो. आपल्या सीएम आणि पीएम ने सांगितले की एसी वापरु नका... आता ते ही अंमळ कर्मकांडवालेच, घरच्या पर्सनल एसीला धोका नाही हे सांगितलेच नाही. मग त्यांचे थाळीबंद शागीर्द त्यांची आज्ञा पाळण्यास सरसावले. मॉल, चित्रपटगृह, मोठी औद्योगिक कार्यालये यांत ’सेंट्रलाईज्ड एअर कंडिशनिंग सिस्टम’ असते, जिथे हवा रि-सर्क्युलेट होते. जिथे एअर-व्हेंट असतात तिथे हवा आत खेचली जाऊन सेंट्रल कूलिंग युनिटकडे नेली जाते. तिथे ती थंड करुन पुन्हा परत सोडली जाते. या प्रक्रियेत कामाच्या ठिकाणी जर कोरोनाचे पुंज (ड्रॉप्लेट्स) असतील, तर ते हवेबरोबर खेचले जाऊन व्हेंटमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतात. धोका इथे आहे! घरच्या - स्प्लिट वा विंडो - एसीमध्ये बाहेरच्… पुढे वाचा »
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
‘कोर्ट’ आणि एका ‘असंवेदनशील’ प्रेक्षकाच्या नजरेतून चित्रपट
-
१७ तारखेला (२०१५) 'कोर्ट' रिलीज झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला तेव्हा प्रचंड गर्दीने प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबद्दल अधिकाधिक चर्चा होऊ लागली. लोक उत्सुकतेने तो रिलीज होण्याची वाट पाहू लागले होते. चित्रपट मराठी असल्याने किती काळ टिकेल हे ठाऊक नसल्याने रिलीज झाल्या-झाल्या बघून टाकण्याचे बहुतेकांनी ठरवले होते. चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहून घेतला. वृत्तपत्रांतून आलेल्या समीक्षेतून बहुतेकांनी त्याला उत्तम रेटिंग दिले गेले. पहिल्या एक-दोन शोमधेच असा अनुभव येऊ लागला, की सर्वसामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया निराशेची होती. स्वयंघोषित चित्रपट रसिक/समीक्षकहा धक्का होता. त्यातून काही जणांनी प्रेक्षक 'असे कसे दगड हो?' अशी प्रतिक्रिया देऊ केली. थोड… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


