Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ५ मार्च, २०२३

‘देस’: वैचारिक गोंधळाच्या कृतिशून्यतेचे नाटक


  • गेल्या दशका-दोन दशकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्र, देश, देशभक्ती वगैरे विचार नि भावनांचे चलनात रुपांतर झाले आहे, आणि आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एखाद्या देशाच्या चलनाप्रमाणे त्याचे अवमूल्यनही. साधारण २०१४ ते १९ दरम्यान यांचा वापर अक्षरश: सुट्या पैशांसारखा अरत्र-परत्र सर्वत्र होत होता. पण देशभक्ती म्हणजे काय? ती केवळ एक भावना आहे, की तिला कृतीची जोडही हवी? की त्याहून पुढचे पाऊल म्हणजे कुण्या ‘गुरुजीं’च्या आदेशानुसार केलेली ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’? त्याहीपूर्वीचे प्रश्न ‘देश म्हणजे काय?’, ‘माझा देश कोणता? या दोनही प्रश्नांचे उत्तर सैद्धांतिक, बौद्धिक पातळीवर द्यायचे की केवळ अनुसरणाच्या, हा ज्याच्या त्याचा निर्णय असतो. बहुसंख्या ही अर्थातच अनुसरणाचा मार्ग निवडते. पण पुढचा प्रश्न असा असतो की ज्यांना… पुढे वाचा »

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सत्तेचे सोपान


  • कधी पापा, पाठीवर थापा कधी हपापा, कधी गपापा कधी थट्टा, कधी रट्टा कधी सत्ता, कधी बट्टा कधी चंदन, कधी भंजन कधी खंडन, कधी भांडण कधी झेंडा, कधी दंडा कधी चंदा, कधी गुंडा कधी थाप, कधी व्हॉट्स-अॅप कधी चाप, कधी मार-काप कधी खांदा, कधी फंदा नाही मंदा, कधी धंदा - रमताराम पुढे वाचा »

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

जम्प-कट - २ : अन्नं वै प्राणिनां प्राणा


  • मानवी जीवनप्रवासाचा ‘जम्प-कट’ « मागील भाग --- --- अन्नं वै प्राणिनां प्राणा । अन्नमोजो बलं सुखम् । तस्मात्कारणात्सद्भिरन्नदः प्राणदः स्मृतः ।।" - (भविष्यपुराण--१६९.३०) अन्न हेच प्राणिमात्रांचा प्राण आहे. अन्न हे ओज, बल आणि सुखही आहे. यास्तव अन्नदात्यालाच प्राणदाताही म्हटले जाते. --- या जीवसृष्टीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी त्याच्या आहार आणि संरक्षण या दोन मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी लागते. प्रत्येक प्राण्याच्या आयुष्याच्या मोठा भाग या दोन गरजांनी व्यापलेला असतो. बारकाईने पाहिले तर या दोनही गरजा परस्परांशी निगडितच दिसतात. जीवो जीवस्य जीवनम्‌ जीवसृष्टी ही ‘जीवो जीवस्य जीवनम्‌’ या तत्त्वाच्या आधारे चालणारी एक प्रकारची बंदिस्त व्य… पुढे वाचा »

फुकट घेतला मान


  • प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक धोरणांबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करणारा अमेरिकास्थित ’हिन्डेनबर्ग’चा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या शेअर्सनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांच्यामार्फत गुंतलेल्या सर्वसामान्यांच्या पैसा धोक्यात आला. अदानींनी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याऐवजी राष्ट्रवादाची ढाल पुढे केली. त्याला अनुसरून स्वयंघोषित राष्ट्रभक्तांचे बुद्धिहीन जथे अदानींच्या समर्थनार्थ धावले... ( शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांची क्षमा मागून...) “नाही खर्चली कवडी दमडी, नाही सांडिला घाम फुकट घेतला मान, भाऊ (१) मी फुकट घेतला दाम.” “कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे हुशारी; देशबंधूच्या बचतीतील मी, सहज … पुढे वाचा »

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (उत्तरार्ध) : सामाजिक संक्रमण


  • माध्यमांतील प्रतिबिंब « मागील भाग --- सहा-आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ‘पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला. निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्‍यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कांगावा करत धुडगूस घा… पुढे वाचा »