Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

वाचाळ तू मैत्रिणी


  • (रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.) एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली. एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्‍याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्‍यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला... भाष्यचित्रकार: सतीश आचार्य. … पुढे वाचा »

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

विडंबन झाले कवितेचे...(ऊर्फ ‘विडंबन-वेदना’)


  • सदर कवितेतील प्रसंग साक्षात घडण्यापूर्वी त्यांनी संकल्प केलेल्या आणि नंतर -साहजिकच- अपुरे सोडून दिलेल्या ’गीतमारायण’ या गीतसंग्रहातील एक गीत. https://www.news18.com/ येथून साभार. ( काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून) कळफलकाशी जडले नाते अधीर बोटांचे विडंबन झाले कवितेचे रमतारामे उगा उचलिले गीत राघवाचे कर्ण जाहले काव्यप्रभूंच्या तप्त चाहत्यांचे उभे ठाकले कविप्रेमी ते, क्रुद्ध शब्द वाचे विद्ध विडंबक पळू पाहतो, झुंड तयापाठी पदांमधि त्या एकवटुनिया निजशक्ती सारी दूर जातसे रमत्या, वाढवी अंतर दोघांचे उंचावुनिया मान जरासा कानोसा घेई तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई रंगविले गाल लाल कुणी एके रमत्याचे अंधारुनिया आले डोळे, कानी ध्वनि वाजे मुक्त हासला झुंड… पुढे वाचा »

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

द. शेटलँड बेटावर भूकंप...


  • (बातमी: 5.4-magnitude quake hits South Shetland Islands ) --- मोदींच्या भाषणांमुळेच हे झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मोदींनी ‘आम्ही भारतातून हाकललेली काँग्रेसची गेल्या सत्तर वर्षांतील पापे तिकडे जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे’ भूकंप झाल्याचा प्रतिटोला दिला. ‘तेथील एका नागरिकाने मोदींवर टीका केल्यामुळे ईश्वरानेच त्यांना शिक्षा दिली’ असे रविशंकरप्रसाद भक्तिभावाने ट्विट करते झाले. आपल्या पक्षाचा एकमेव सदस्य असलेल्या कम्युनिस्टाने ‘समाजवाद्यांनी संघाशी केलेल्या छुप्या युतीचे तिथे गाडलेले पुरावे बाहेर येण्यास यातून मदत होईल’ अशी आशा व्यक्त केली. कन्हैयाकुमारने ‘भूकंप से आजादी’ अशी नवी घोषणा दिली. पुण्यातील दक्षिण-पूर्व समाजवादी गटाने कलेक्टर कचेरीसमोर पंधरा मिनिटे घोषणा देऊन अंटार्क्ट… पुढे वाचा »

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

नाचत ना...


  • (काव्यशार्दुल गोविंदाग्रज यांना स्मरून ) नाचत ना भाजपात, आता । राकाँच्या कळपात, नाथा ॥ आणिक होती, चिकी मावशी (१) । तावडेंची उलघाल, नाथा ॥ खुर्ची उलटली, सत्ता हरपली । काकांच्या फटक्यात, नाना ॥ तो तर वरती, नवबिहारी (२) । सर्व हताश पाहात, नाना ॥ --- गीत: काव्यकार्टुन संगीत: आताबास्कर संगीत मंडळी गायक: चंद्रकांत छोटीमिशी (कोरस: आयटीसेल) नाटक: सं. खुर्चीप्रभाव राग: मुन्शिपाल्टी कानडा चाल: उद्धवा नेऊ नको नाथास … पुढे वाचा »

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ‘मल्ल्याला सल्ला’)


  • https://blogs.navbharattimes.indiatimes.com/ येथून साभार. (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून ) अब्ज अब्ज जपून ठेव, कोहिनूर हिर्‍यापरी ॥ ध्रु.॥ काय बोलले जन हे, विसरुन तू जा सगळे, जमविली जी माया तू, जाण अंती तीच खरी ॥ १ ॥ लाज नको पळताना, खंत नको स्मरताना काळ जाता विसरिल रे, जनता ही तुज सहजी ॥ २ ॥ राख लक्ष स्वप्नांची, हतबल त्या गरीबांची, तव कृपेने बुडले जे, उडु दे वार्‍यावरी ॥ ३ ॥ - मजेत पेडगांवकर - oOo - --- संबंधित लेखन: अशी ही पळवापळवी >> अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >> --- पुढे वाचा »

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

मुंबईत वीज गेली...


  • मुंबईत वीज गेली म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले पंजाबमधील शेतकर्‍यांना पाठिंबा देणारा नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला. कंगनाने ट्विट करुन त्यातील व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे यावर कम्युनिस्ट विचारवंताने एकशे तेरावा लेख लिहिला आणि सायक्लोस्टाईल करुन आपल्या मित्रांना पाठवला माहिती अधिकाराचा वापर करुन मोराच्या पिसांची संख्या राहुल गांधीनी माहिती करुन घेतली कपिल सिब्बल यांनी त्याबाबत सोनियांकडे तक्रार केली आपले तिकिट कापण्यामागे मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा गुप्त … पुढे वाचा »

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

टीव्ही लागले रे, टीव्ही लागले


  • (कविवर्य शंकर रामाणी यांची क्षमा मागून) टीव्ही लागले रे, टीव्ही लागले कुणाच्या घरातिल टीव्ही लागले रवीची प्रभा मंद अंधूकताना याने लावले रे, त्याने लावले! दिसा कष्टुनि जे जाहले श्रमी जन सारे अखेरीस सैलावले इथे कावलो मी, सर्व गलग्यामुळे मनी प्रार्थना, वीज घालवाच रे सुरू बातम्या या कुणाच्या घरी कुणी हास्यजत्रेत हो दंगले संत्रस्त मम मनाच्या तळीचे शिवीसूक्त हे ओठातुनि ओघळे - सतत त्रस्तमी (ऊर्फ मंदार काळे) - oOo - ( मित्रवर्य उत्पल व. बा. यांच्या सहकार्याने...) इथे पत्रकारितेची पडली शवे त्यावरी नफ्याची गगनचुंबी घरे स्क्रीन जयाचा बुद्धी शोषून घेतो त्या इडियटाचे पिसे लागले रे टीव्ही लागले रे...टीव्ही लागले... - oOo - पुढे वाचा »

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

मी कवी होणारच!


  • तो म्हणाला, मी कवी होणारच! मग त्याने कवी होण्याचे प्लॅनिंग केले मार्केट रिसर्च एजन्सीला गाठले, काव्य-बाजाराचा कानोसा घेऊन खपाऊ विषयांवर अ‍ॅन्युअल रिपोर्ट बनवून देण्याचे काँट्रॅक्ट दिले सर्वात प्रथम सौंदर्यवादाचा अंगरखा त्याने लपेटून घेतला गारवा, पारवा, मारवाच्या जुड्या बांधून जय्यत तयार ठेवल्या हिरव्या माडांच्या एका बनात वळणावळणाच्या लाल वाटेवर प्राजक्तापासून सायलीपर्यंत, बहाव्यापासून पिंपळापर्यंत सारे समोर राहतील अशा एका घरात मुक्काम हलवला सुलभ मराठी व्याकरणाचे एक स्वस्त पुस्तक आणले मग शब्दांचे मात्रांशी, मात्रांचे आकड्यांशी गणित ठाकून ठोकून जुळवत कविता लिहायला लागला यथावकाश शंभरेक कविता अगदी नेटाने खरडून झाल्या फेसबुकवर शे-सव्वाशे लाईक जमा करू लागल्य… पुढे वाचा »