Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, ५ मार्च, २०१८

प्रेम कुणावरही करावं


  • विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. तो इथे वाचता येईल. - oOo - पुढे वाचा »

शनिवार, ३ मार्च, २०१८

परवा आमचा पोपट वारला


  • ‘परवा आमचा पोपट वारला’ असा निरोप अतुल पेठेंकडून मिळाला होता. म्हणून रीतीप्रमाणे चार जणांना सोबत घेऊन काल त्यांना भेटायला गेलो. आता चार लोक औपचारिक प्रश्न विचारतात तसे आम्ही विचारु म्हटलं नि थोडावेळ बसून निघू असा प्लान होता. पण कसलं काय. एक तासाहून अधिक काळ पार धरुन अख्खी ष्टोरीच ऐकवलीन्‌ या माणसानं. नतद्रष्ट तर इतका की तासभर हसवत ठेवलं आणि. बरं दिसतं का सांगा बरं हे? प्रसंग काय नि आपण वागतो काय. पेठेंसारख्या ‘सुलझा हुआ’ आदमी असं वागेल अशी अग्गदी कल्पना नव्हती होऽ. पोपट झाला म्हणून काय झालं, शेवटी एक फ्यामिली मेंम्बरच तो, शिवाय नावाने थेट जुन्या राज्यकर्त्यांच्या वंशावळीशी नाते सांगणारा, साधासुधा नव्हे. मऽग? अगदीच ताळतंत्र सोडलन् हो या माणसानं. शिट्या काय वाजवतो, त्यावर गाणी काय म्हणतो… पुढे वाचा »

शुक्रवार, २ मार्च, २०१८

खरा इतिहास, खोटा इतिहास


  • अमका इतिहास हा ‘खोटा इतिहास’ आहे नि अमका इतिहास ‘खरा इतिहास’ आहे हे अनेक लोक छातीठोकपणे सांगतात, तेव्हा मला प्रचंड न्यूनगंड येतो. मुद्रित माध्यमांचा शोध लागून दस्तऐवजीकरण चालू झालेल्या काळातील, किंवा एका दिवसांतच एका देशातून दुसर्‍या दूरवरच्या देशात पोचता येईल इतकी अत्याधुनिक विमानसेवा सुरु झालेल्या काळातील; काही घटना, उक्ती/उद्धृते यांच्याबद्दल ठामपणे सांगणे मला अवघड जाते. तिथे प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास यांच्याबाबत ठामपणे खरे-खोटे करणारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माच्या प्रेषिताहून महान असतात, असे माझे नम्र मत आहे. आता हेच बघाना, एका विज्ञानविषयक वीडिओ बघत असताना एकदम ठेच लागली. त्यात एक खगोलशास्त्रज्ञ असं म्हणाली, "Albert Einstein had said, 'Not only is the universe stranger than we imagine, it is stranger than we can … पुढे वाचा »

गुरुवार, १ मार्च, २०१८

ठणाठणा वाजे बीन


  • ‘एखाद्या कामाची पद्धतशीरपणे लहान लहान कामांत विभागणी करुन ते पार पाडणे, वा एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करुन त्याचे उत्तर शोधणे हे आपले कौशल्य आहे’ हा माज उतरवायचा असेल तर एक करा. घरी एक ‘बीनबॅग’ आणा! नाही, माझे डोके पूर्ण ताळ्यावर ठेवूनच मी लिहिले आहे हे. --- बॅग येते. तुम्ही बीन्स स्वतंत्रपणे मागवता. ‘बीन्स भरताना दारे खिडक्या घट्ट लावून घे’ अशी अनुभवजन्य ताकीद मित्राने तुम्हाला दिलेली असते. तुम्ही तो सल्ला तंतोतंत पाळता. थोड्या चुकार बीन्स वगळता – त्यांच्यावर बारीक नजर ठेवून तुम्ही लगेचच ताब्यात घेता – अगदी व्यवस्थितपणॆ बॅगमध्ये त्या भरता. अजिबात गोंधळ न होता काम पार पाडल्याबद्दल खुश होऊन, स्वत:लाच शाबासकी देता. काही दिवस जातात... सफाईसाठी तुम्ही बॅग उचलता, तर पाठीमागे एक दोन ब… पुढे वाचा »

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

नेहरु आणि पटेल: बाता आणि वास्तव


  • १. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. २. त्यावेळी ते तीव्र मधुमेहाने आजारी होते. ३. डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा... ३अ. भारत स्वतंत्र होऊन तेव्हा जेमतेम तीन वर्षे झाली होती. म्हणजे तेव्हा पुन्हा ‘भारताचा शाप’(!) असलेले नेहरु पंतप्रधान झालेच असते. ३ब. अजून भारतातील पहिल्या निवडणुकाही पार पडल्या नव्हत्या. ४. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारतीय सेनेचे पहिले ‘कमांडर-इन-चीफ’ होते. आणि ज्या अर्थी संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय ते ‘एकट्याने’ घेऊ शकत होते, आणि तो ‘एकट्याने’ अंमलातही आणू शकत होते त्या अर्थी त्यांना शासनात भरपूर निर्णयस्वातंत्र्य नि अधिकार होते असे म्हणावे लागेल. ज्या अर्थी नेहरुंनी त्यांना यात स्वातंत्र्… पुढे वाचा »