Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

शर्विलकाचा प्रतिशंखनाद आणि जमाव


  • Travor Noah यांच्या ’The Daily Show’ या कार्यक्रमातील ’Trump Weaponizes Victimhood' हा एपिसोड ‘आपले सब्जेक्ट्स* कुठेतरी एक पायरी वर चढताहेत, यातून कदाचित आपल्या स्थानाला धक्का बसू शकतो’ याची जाणीव झालेल्या वर्चस्ववाद्यांच्या चलाख मांडणीचे ट्रम्प यांनी उत्तम उदाहरणच सादर केले आहे. संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी नेहमीच आकडेवारी ला प्राधान्य देतो. तिच्या अभावी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष, केलेले आरोप हे केवळ पूर्वग्रहांचे नि स्वार्थाचे अपत्य असतात. (अर्थात अलीकडे खोटे आकडेही तोंडावर फेकण्याची अहमहमिका सुरु झालेली दिसते. त्यामुळे त्या आकड्यांची विश्वासार्हता हा ही एक कळीचा मुद्दा ठरतो. ) ‘आमच्या गटावर झालेला एक अन्याय हा आमच्यावरील नि… पुढे वाचा »

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

ब्रह्मांडाचे वांझ अंडे


  • ब्रह्मांडाच्या अंड्याला फलित न करु शकलेला शुक्राणु, विश्वाच्या पसार्‍याला रचून ठेवता येईल इतक्या विस्ताराचे कपाट कपाटाला पुन्हा विश्वातच जागा द्यावी लागेल ही कॅच-२२ सिचुएशन, हे सारे आपल्याच जबाबदारीचा भाग असे समजणारा कुणी मी. क्रोएशियाच्या राजधानीत मिळणारे बेकन, कुर्डुवाडीच्या स्टेशनवर मिळणारे बेसन, राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नावर नेमके मूग गिळून बसणारे बंडातात्या... डायनासोरची वंशावळ सांगणारे आणि ‘कृण्वन्तु विश्वमजुरासिकं’ ची गर्जना करणारे क्रीट काका; त्यांना ‘डायनासोर जुरासिक काळात नव्हते’ असं सांगत मोडीत काढणारे शेरसिंग समीक्षक पाण्याच्या एका थेंबासरशी विरघळणारी काळी आई, आणि ‘आईन्स्टाईनच्या बैलाला ढोल’ म्हणणारे संशोधक गोमयानंद सरस्वती; रक्ताचा थेंब पा… पुढे वाचा »

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

‘आधार’ जीवा...


  • सर्वप्रथम व्यक्तिस्वातंत्र्याचा यथायोग्य वापर केल्याबद्दल न्या. चंद्रचूड यांचे अभिनंदन. परंतु याचा अर्थ मी त्यांच्याशी सहमत आहे असा मात्र नाही. (हे दोन्ही एकाच वेळी कसे असू शकते, हे काहींच्या चटकन ध्यानात येणार नाही. पण पुढे वाचा.) धन-विधेयक म्हणून पास करणे, आणि टेलिफोन/बँक सक्तीबाबत त्यांच्या मताशी सहमत. पण सरकारी योजनांबाबत नाही. जर खासगी बँका कर्ज देताना आपली नियमावली तयार करु शकतात, तर सरळसरळ सहानुभूती म्हणून, तुमची जबाबदारी स्वीकारुन सवलती देऊ करणारे सरकार आधारची सक्ती का करु शकत नाही? त्या योजनांचा गैरवापर टाळण्यासाठी, सुसूत्रपणे ती राबवण्यासाठी, प्रत्येक लाभधारकाची बिनचूक नि नेमकी ओळख पटवण्यासाठी (unique identification) ‘आधार’चा वापर सक्तीचा केला तर काय चूक आहे?  बँका साल्या तुमच… पुढे वाचा »

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

अशी ही पळवापळवी


  • ‘अशी ही बनवाबनवी’ला तीस वर्षे पुरी झाल्याच्या निमित्ताने थोरले महागुरु नव्या कोर्‍या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. चित्रपटाचे नाव आहे ‘अशी ही पळवापळवी’. मुख्य भूमिकांत विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि नीतिन संदेसरा यांना कास्ट केले आहे. चित्रपटातील धनंजय माने गावाकडून पुण्याकडे प्रयाण करतात, तर या रिमेकमध्ये इंटरनॅशनल लेवल आणण्याच्या दृष्टीने ते ‘मुंबईहून लंडनला पलायन करतात’ असा अपग्रेड देण्यात आला आहे. मल्ल्या प्रथम परदेशी पोचल्याने धनंजय मानेंच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे असा त्याचा दावा होता. पण ‘मेहुल आणि नीरव यांचे आल्रेडी नाते असल्याने, त्यांना माने बंधूंच्या भूमिकेत कास्ट करणे योग्य ठरेल’ असे थोरल्या महागुरुंनी त्यांच्या गळी उतरवले आहे. त्यामुळे आता मल्ल्या आणि संदेसरा य… पुढे वाचा »

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

अफवेच्या प्रसाराची साधने


  • इंदिराजींच्या काळात पहिली अणुचाचणी झाली त्या दिवशी ‘भारत हा इच्छा असेल तेव्हा अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो’ हा संदेश भारताला लष्करीदृष्ट्या बळकट करुन गेला. त्यामुळे इतिहासात तो दिवस कधीच विसरता न येण्याजोगा. त्याचप्रमाणे आजचा दिवसही कधीच विसरता न येण्याजोगा! जसे अण्वस्त्र हे लष्करीदृष्ट्या अमोघ अस्त्र तसेच ‘छद्म’ किंवा सोप्या भाषेत अफवा हे सामाजिक/राजकीय दृष्ट्या अमोघ अस्त्र. याची पहिली व्यापक चाचणी आजच्याच दिवशी १९९५ साली झाली. ती कमालीची यशस्वी झाली. ‘गणपती दूध पितो आहे.’ अशी भुमका नव्यानेच प्रचलित होऊ लागलेल्या इंटरनेटजन्य माहिती-माध्यमांतून उठली. जो उठतो तो आपल्या घरचा गणपती कसा दूध प्याला, याचे रसभरीत वर्णन समाजमाध्यमांवर करु लागला. कुणी फोटो टाकले. नवीनच हाती आलेल्या मोबाईलच्या माध्यमांतू… पुढे वाचा »