Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

‘सायलेंट मोडमधल्या कविता’: नव्या जाणिवांची विचक्षण कविता


  • गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन ‘जागतिकीकरण’ या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने, आणि या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या हाताला जणू सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला ‘मोबाईल’ या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली. जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, ‘माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला’ असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या … पुढे वाचा »

रविवार, ८ मार्च, २०१५

नागालँडमधील घटनेची परिमाणे आणि अन्वयार्थ


  • या आठवड्यातील गुरुवारी नागालँडमधे एका तथाकथित बलात्कार्‍याला संतप्त जमावाने तुरुंगातून खेचून बाहेर काढले, आणि मरेस्तोवर मारले. त्या मारहाणीने मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहाला भर चौकात फाशी दिल्याप्रमाणे टांगून ठेवले. जमावातील लोकांची संख्या आणि त्यांचा आवेश पाहता तुरुंगावर नेमलेले अधिकारी नि पोलिस यांना जमावाला विरोध करण्याची हिंमत झालीच नाही. या घटनेवरून सुमारे दहा वर्षांपूर्वी नागपुरात दोनेकशे स्त्रियांच्या जमावाने अक्कू यादव नावाच्या बलात्कार्‍याला, सराईत गुंडाला, भर रस्त्यावर दगडांनी ठेचून मारल्याची आठवण होणे अपरिहार्य होते. प्रथम संघटना उभी करून, तिच्या सहाय्याने स्वार्थी हेतू मनात ठेवून, हिंसक घटना घडवून आणल्याची उदाहरणे आपल्या देशात पैशाला पासरी मिळतात. पण मुळातच समाजातील एक असंघटित भाग एखाद्या आरोपीविरुद्ध वा गुन्हेगाराविरुद्ध… पुढे वाचा »

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

एफ-१, वन झीरो फाईव: तंबूत शिरू पाहणार्‍या उंटाची गोष्ट


  • लहानपणी आपण सार्‍यांनीच तंबूत शिरलेल्या उंटाची गोष्ट ऐकली असेल. थोडे डोके तंबूत आणू का, पोटाला थंडी वाजते आहे ते आत घेऊ का, शेपटावर माशा बसून चावताहेत ते आत घेऊ का, असे करत हळूहळू पुरा तंबूत शिरलेला नि अखेर मालकालाच हाकलून तंबूच बळकावून बसलेल्या उंटाची गोष्ट! मुळात मालकाने उंट पाळला, तो त्याची कामे करण्यासाठी पण अखेर तो मालकाचेच काही हिरावून घेऊ लागला. माणसाच्या जगण्यात असे अनेक अदृष्य उंट त्याच्या हक्काचे बरेच काही बळकावून बसलेले असतात, आधी डोके, मग पोट असे करत संपूर्णपणे तंबूत घुसून तो तंबूच ताब्यात घेतात. यात माणसाने स्वतःच निर्माण केलेल्या व्यवस्था फार मोठा वाटा बळकावताना दिसतात. काहीवेळा हे उंट जन्मतःच आपल्या बोकांडी बसलेले असतात, त्यांच्यापासून सुटका नसते. ‘या उंटांपासून आपले तंबू कसे वाचवायचे?’ असा वरकरणी साधा वाटणारा प्रश्न, सं… पुढे वाचा »

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५

AAPtard मित्रांना अनावृत पत्र


  • माझ्या AAPtard मित्रांनो, या संबोधनाने तुम्ही मुळीच विचलित होणार नाही याची खात्री आहे. कारण तुमच्या नेत्याला त्याच्या आजारावरून, गळ्यातील मफलरवरून झालेल्या हिणकस शेरेबाजीला भीक न घालता तुम्ही त्याचा ‘मफरलमॅन’ बनवून चोख प्रत्युत्तर दिले होते. तसेच ‘रिटार्ड’शी साधर्म्य सांगणारे हे हिणकस संबोधनही तुम्ही मनावर न घेता गल्ली बोळातून आपले काम निष्ठेने चालू ठेवले नि दिल्लीत विजयश्री खेचून आणली. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. हे संबोधन देणारे स्वतःला तुमच्यापेक्षा बरेच बुद्धिमान वगैरे समजत असावेत. एखाद्या मंदबुद्धी समजल्या गेलेल्या भावाने, स्वतःला कुशाग्र बुद्धिमान समजणार्‍या भावाला दिलेली ही मात आहे, नुसती मातच नव्हे तर काही सेकंदात अस्मान दाखवणे आहे. तेव्हा आता हे संबोधनही तुम्ही अभिमानाने मिरवायला हरकत नाही. राज्याराज्यातून जमवलेली फौ… पुढे वाचा »

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ११ (अंतिम भाग) : भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - ३


  • भविष्यासाठी संभाव्य पर्याय आणि कृती - २   << मागील भाग फ. तत्त्वांची सर्वसमावेशकता किंवा व्यापकता: बदलत्या काळाचे भान नसणे आणि आपल्या तत्त्वज्ञानाला कालातीत समजणे हा खरं तर धार्मिक कट्टरपंथीयांचा सर्वात मोठा दोष. काळाचे चक्र फिरवून मागे नेऊन पुन्हा एकवार आपल्या प्रभावाच्या काळात जगाला नेता येईल असा भाबडा नि अव्यवहार्य विचार हा फक्त यांचा दोष आहे असे नव्हे असे आता म्हणावे लागेल. आज समाजवादी मंडळीही नव्या काळाच्या संदर्भात आपले तत्त्वज्ञान तपासून पाहतात का, त्यात काय बदल करावे लागतील याचा उहापोह करतात का नि काही मते, तत्त्वे ही कालबाह्य झाली असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यांना सोडून देऊन पुढे जाण्यासाठी काही संघटित प्रयत्न वा यंत्रणा उभी करतात का वा त्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करतात का? लोहियांचा समाजवाद भारतीय समा… पुढे वाचा »