Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

छद्म पर्यावरणवाद्यांचा धोका


  • ‘ काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का? ’ या मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने एक महत्त्वाचा प्रश्न धसास लावण्यात आल्यामुळे कंपनीला समाजाच्या एका गटात प्रतिष्ठा मिळाली. पण तलवारीला दोन्ही बाजूंनी धार असते हे लवकरच कंपनीला दिसून आले. काही काळानंतर एका (बहुधा ग्रीन-पीस) पर्यावरणवादी संघटनेचे लोक कंपनीसमोरच्या फुटपाथवर जमले, आणि कंपनीच्या नि विशेष करुन आमच्या चेअरमनच्या नावे निषेधाच्या घोषणा देऊ लागले. हे आंदोलन बराच काळ चालले होते. त्यांनी चेअरमनच्या नावे लिहिलेल्या बॅनरवर त्याला चक्क प्राणी-द्वेष्टा ठरवून टाकले होते. मागच्या लेखात उल्लेख केलेले तेच सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर एकाच स्वरुपाच्या मूल्यमापनासाठी नव्हते. त्यातील संख्याशास्त्रीय तंत्रे ही अनेक क्षेत्रात… पुढे वाचा »

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

काही जमाती अधिक भ्रष्ट आहेत का?


  • (शेखर गुप्ता यांचा लेख: Are Leaders from 'lower' casts and subaltern groups more corrupt? ) --- काही काळापूर्वी माझ्या पहिल्या आयटी कंपनीत काम करत असताना त्यांच्या एका सॉफ्टवेअरबाबत एक इंटरेस्टिंग टेस्ट केस वाचली होती. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये गोर्‍या व्यक्तींपेक्षा कातडीचा रंग काळा असलेल्या – आफ्रिकन-अमेरिकन – लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण आणि तीव्रता अधिक आहे अशी तक्रार मानवाधिकार संघटना बराच काळ करीत होत्या. परंतु नुसता दावा पुरेसा नसतो. कारण परस्परविरोधी दावे, आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात नि प्रत्येक बाजूला आपले मत हे वास्तवच आहे असा ठाम विश्वास असतोच. अशा वेळी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा लागतो, नि निष्कर्षाला अधिक विश्वासार्ह दावा म्हणून समोर ठेवावे लाग… पुढे वाचा »

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

ओझ्मा आणि वेदनेची वाट


  • विषयसंगती ध्यानात घेऊन, काही अधिक भर घालून, हा लेख ‘ परीकथा आणि वेदनेची वाट ’ या शीर्षकासह ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवला आहे. - oOo - पुढे वाचा »

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (उत्तरार्ध) : रत्नजडित पण बिनधारेची कट्यार


  • सेरिपी « मागील भाग --- ‘कट्यार...’ नाटकाबद्दल बाबत बोलताना प्रामुख्याने त्यातील व्यक्तिरेखांचा विचार मागील भागात केला आहे. आता याच व्यक्तिरेखा चित्रपटात कशा येतात ते पाहणे रोचक ठरेल. पण सुरुवातीलाच हे स्पष्ट केले पाहिजे, चित्रपटाचे नाव नि कथानकाचा गाभा तोच असला, तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे हे अमान्य करता येणार नाही. तेव्हा ‘नाटकात जे आहे ते इथे का नाही, किंवा चित्रपटात नव्याने जे आले आहे ते का आले आहे?’ हे दोन प्रश्न गैरलागू आहेत. ते चित्रपटकथा-लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. परंतु दोन्हींमध्ये जे सामायिक आहे, त्याची तुलना मात्र करणे शक्य आहे नि न्याय्यही. चित्रपटात सामान्य प्रेक्षकासाठी बरेच रंग गडद करावे लागतात हे मान्य. पण चित्रपटात गडदच काय पण भडक करून, वर पात्रांची नि कथानकांची संपूर्ण मोडतोड केली आहे. इतकी की … पुढे वाचा »

‘कट्यार काळजात घुसली’ - एक दृष्टिक्षेप (पूर्वार्ध) : सेरिपी


  • अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली माणसेही, निदान बाथरुममध्ये तरी – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – अधेमधे आपला गळा तासून पाहतात. असा सुरांचा मोहक दंश जर योग्य वयात झाला, तर त्या डसण्यातून जी बाधा होते, ती अलौकिक अशीच असते. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातल्या सदाशिवला तो सूर सापडतो ‘पंडित भानुशंकरां’च्या गाण्यातून. त्या सुरांनी वेड लावलेला तो दहा-बारा वर्षांचा मुलगा, त्यांच्या अनुपस्थितीतही अनेक वर्षे सांभाळून ठेवतो, आणि अखेर घरच्या जबाबदारी… पुढे वाचा »