-
--- प्रास्ताविक: अलीकडील काही वर्षांत राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे शब्द चलनी नाण्यासारखे नि हत्यारासारखेही वापरले जाऊ लागले आहेत. या दोहोंच्या पूर्वसुरी म्हणता येतील अशा राष्ट्रभावना नि राष्ट्रीय एकात्मता या दोन संज्ञा आता बव्हंशी लुप्त झालेल्या आहेत. या बदलाला देशातील सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, तांत्रिक आणि अर्थातच आर्थिक संक्रमणाला जोडून पाहता येते. त्यातून एक संगती हाती लागते. प्रामुख्याने करमणूकप्रधान माध्यमांतून दिसलेली ही संगती आणि त्यांतील आकलन वास्तवाला जोडून पाहण्याचा हा प्रयत्न. --- १. अनेकता में एकता भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे... अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली अ… पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, २६ जानेवारी, २०२३
राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (पूर्वार्ध) : माध्यमांतील प्रतिबिंब
Labels:
‘अक्षरनामा’,
चलच्चित्रे,
जिज्ञासानंद,
माध्यमे,
राष्ट्रीय एकात्मता
रविवार, १५ जानेवारी, २०२३
जम्प-कट - १ : मानवी जीवनप्रवासाचा ‘जम्प-कट’
-
( 'मुक्त-संवाद' या मासिकात प्रसिद्ध होत असलेल्या ’जम्प-कट’ या मालिकेतील पहिला भाग ) सदर रेखाचित्र deviantart.com या कला-देवाणघेवाण संस्थळावर Killb94 या सदस्याने रेखाटले आहे. पन्नास वर्षांपूर्वी ‘ २००१ अ स्पेस ओडिसी ’ म्हणून चित्रपट येऊन गेला. त्यातील सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये मानवी उत्क्रांतीच्या आद्यकाळातील वानरमानव नुकतेच हत्याराप्रमाणे वापरण्यास शिकलेले एक हाड विजयोन्मादाने हवेत उंच भिरकावतो. ते इतके उंच जाते की थेट अंतराळात पोहोचते आणि हळूहळू एका अंतराळयानात परिवर्तित होते. मानवी प्रगतीची झेप दहा सेकंदाहून कमी अवधीत दाखवणारा तो प्रसंग चित्रपट इतिहासात संस्मरणीय मानला जातो. चित्रपटाच्या परिभाषेमध्ये जम्प-कट याचा अर्थ एकाच प्रसंग… पुढे वाचा »
रविवार, ८ जानेवारी, २०२३
भावनांचा प्रवाहो चालला
-
२०११ सालच्या एप्रिल महिन्यांतील घटना. मी तेव्हा हिंजवडीमधील एका कंपनीसोबत काम करत होतो. आमचा एक परदेशी अन्नदाता (client) आला होता. जेवणासाठी त्याला घेऊन आम्ही त्याच परिसरातील एका होटेलकडे चाललो होतो. एका वळणावर ‘मी-अण्णा’ असे लिहिलेल्या गांधी-टोप्या घातलेला आयटी-कामगारांचा एक मोर्चा आम्हाला आडवा गेला. लोकपाल या नव्या व्यवस्थेच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा होता. शाळेच्या भाषेत सांगायचे तर ‘मधल्या सुटी’मध्ये काढलेला. https://news.biharprabha.com/ येथून साभार. मुळात त्या मागणीच्या परिणामकारकतेबाबत मी फारसा आशावादी नव्हतो. त्यात ही मंडळी जे कर्मकांड करत आहेत ते पाहून मला हसू आले. आमचा ‘मुख्य तंत्रज्ञान अधिकारी’ (CTO) … पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
जिज्ञासानंद,
भूमिका,
राजकारण,
समाज
रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२
प्रस्थान ऊर्फ Exit : दोन भाषणांचे नाटक
-
मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये उजव्या विचारांचे बोल्सेनारो यांचा पराभव होऊन डाव्या विचारांचे नेते लुला डि’सिल्वा यांची भावी अध्यक्ष म्हणून निवड झाली. याउलट गेली दोन दशके अस्थिर राजकीय परिस्थिती अनुभवणार्या इस्रायलमध्ये पाच वर्षांत चौथ्यांदा निवडणूक होऊन उजव्या विचारांचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू निसटत्या बहुमताने निवडून येत पुन्हा एकवार पंतप्रधान होऊ घातले आहेत. लोकशाही राष्ट्रांमध्ये सत्तेचा लंबक असा इकडून तिकडे फिरणे ही नित्याची बाब आहे. समाजातील मूठभर व्यक्ती विशिष्ट वैचारिक भूमिकेशी बांधील असतात. अमका नेता वा पक्ष हा अमुक विचारसरणीचा आहे म्हणून त्याला निवडून देणारे बहुसंख्य लोक त्या वैचारिक भूमिकेबद्दल अज्ञानीच असताना दिसतात. याशिवाय मोठ्या संख्येने नागरिक अथवा मतदार हे प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करत … पुढे वाचा »
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२
सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (उत्तरार्ध) : स्वरूप, दर्शन व आकलन
-
प्रचलित निकष « मागील भाग --- अमुक एक विधान, एखादी गोष्ट सत्य की असत्य याचा निवाडा करण्यासाठी ’ते पूर्णतः अनावृत, निर्लेप, अविकृत स्वरूपात आपल्यासमोर आले आहे याची आपल्याला खात्री देता येते का? ’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थीच द्यावे लागते ते आपल्या समोर येते ते एखाद्या माध्यमातून; मग ते एखाद्या व्यक्तीचे भाष्य अथवा निवेदन असेल, छायाचित्र असेल, घटनेचे केलेले व्हिडीयो शूटिंग असेल, त्याबाबत वृत्तपत्रात किंवा चॅनेल्सवर आलेली बातमी असेल, एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून आलेले वर्णन असेल की आणखी काही. त्या त्या माध्यमाच्या मर्यादा, त्यात सहेतुक वा अहेतुक झालेले बदल यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाहून वेगळे असे एक अवगुंठित, विलेपित असे नवे ’तथ्य’ आपल्यासमोर येत असते. अशा अवगुंठित, विलेपित रूपालाच आपण सत्य मानून अन्वेषणाच्या कसोटीवर पारखत बसू तर… पुढे वाचा »
Labels:
‘मुक्त-संवाद’,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
समाज
सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष
-
प्रास्ताविक: एका वास्तवात अनेक सत्ये दडलेली असतात. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे, आकलनात येणारे सत्य निराळे. जीएंच्या कथा असोत वा कुरोसावाचा राशोमान हा सिनेमा, सत्याचे पापुद्रे संपता संपत नाहीत. म्हणूनच ओशोंसारखा एखादा योगी सत्याच्या पडताळणीचा जोरकस आग्रह लावून धरतो, तर जे. कृष्णमूर्ती ‘Truth is a pathless land’ असे म्हणून आपल्याला हतबुद्ध करतात. अशात सत्य नेमके कशाला म्हणायचे, कसे ते जाणायचे हा सनातन पेच काळागणिक अधिक गुंतागुंतीचा होत जातो. त्यावरचे हे विवेचन... --- "हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत! भंडारा कधी काळा, राखेसारखा असतो होय? तो असतो हळ… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)





