Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, १७ जुलै, २०२३

जम्प-कट - ७ : एकाधिकार ते विनिमय-व्यवहार


  • अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध) « मागील भाग --- एकाधिकार नागर आयुष्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या हा माणसाचा शेजार आहे. आपल्या मालकाबरोबर फिरायला आलेल्या पाळीव कुत्र्याने आपल्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण केल्याच्या भावनेतून त्याच्यावर खच्चून भुंकणार्‍या या टोळ्यांसोबत सहजीवन माणसाने स्वीकारले आहे. दोन प्रतिस्पर्धी शेजारी टोळ्यांमध्ये रात्री-अपरात्री भडकणार्‍या हद्दीच्या लढायांचे आपण जागृत(!) साक्षीदार असतो. लांडग्यांचा समूहघोष अधिकारक्षेत्राची निश्चिती आणि संरक्षण हा अतिप्राचीन काळापासून प्राणिजीवनाचा अविभाज्य भाग आहे. कुत्र्यांप्रमाणेच माकडांच्या, लांडग्यांच्या वा जंगली कुत्र्यांच्या टोळ्यांचे प्रदेश त्यांनी आखून घेतलेले असतात. वाघ-सिंहादी मार्जारकुलातील प्राण्यांमध्येही ही हद्द… पुढे वाचा »

शनिवार, ८ जुलै, २०२३

बॉटासुराचा उदयास्त


  • दर महिन्याच्या अखेरीस मी ब्लॉगचा आढावा घेत असतो. पोस्ट, ड्राफ्ट्स वगैरेसह मी तिथे वाचक-राबता कसा आहे हे ही पाहात असतो. मागील महिन्यात माझ्या ‘वेचित चाललो...’( vechitchaalalo.blogspot.com ) या ब्लॉगवर वाचक-राबता प्रचंड वाढला आहे असे दिसून आले. पहिली प्रतिक्रिया ‘व्वा: आपला ब्लॉग बरेच लोक वाचू लागलेले दिसतात.’ अशी होती. पण नंतर असे दिसले की एरवी सरासरी मासिक वाचनांच्या जवळजवळ दहापट वाचने झाली आहेत. हे अजिबात संभाव्य नाही असे माझे मत आहे. कारण एकतर ब्लॉग मराठीमधून, त्यात जेमतेम दीड-एकशे पोस्ट्स. इतक्या वेगाने वाचायचे म्हणजे काही हजारात लोक इकडे वळायला हवेत. हे अशक्यच आहे. थोडे खणल्यावर लक्षात आले अगदी दर तीन ते पाच मिनिटाला एक या वेगाने हिट्स मिळत आहेत. मग डोक्यात प्रकाश पडला, की कुणीतरी बॉट(BOT) लावून ठेवलेला दिसतो. … पुढे वाचा »

बुधवार, १४ जून, २०२३

जम्प-कट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)


  • अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध) « मागील भाग --- Pope Francis addresses the crowd before delivering his Easter message from the main balcony of St. Peter’s Basilica at the Vatican on 16th April 2017 . जगभरातील प्रत्येक माणसांत एक संभ्रमित जनावर दडलेले असते. जनावरांच्या तुलनेत माणसाची ग्रहणशक्ती जितकी वाढली आहे त्या मानाने आकलनशक्ती अजून बरीच मागे आहे. त्यामुळे अनेकदा माणसाला अनेक प्रश्नांना, माहितीला, समस्यांना सामोरे जावे लागते ज्याच्याबाबत काय करायचे हे त्याला/तिला उमगत नाही. समस्या समोर असते पण तिच्या कारणांचे आकलन त्याला/तिला झालेले नसते. अशा वेळी एकतर कुणाला तरी ते झाले आहे आणि त्या समस्यांचे उत्तर त्याच्याकडे आहे असे गृहित धरणे सोयीचे असते. काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात… पुढे वाचा »

रविवार, ४ जून, २०२३

जम्प-कट - ५ : अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)


  • कुटुंबव्यवस्था आणि वारसा « मागील भाग --- मानवाच्या टोळीजीवनाच्या काळात त्याचे आयुष्य भूक, भावना आणि भय या तीनच बाबींभोवती बांधलेले होते. भूक अन्नाने भागवली जात होती. टोळीजीवनामध्ये आपल्या टोळीतील व्यक्तींबाबत बांधिलकी, आपलेपण तर अन्य टोळीतील व्यक्तींबाबत द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व या भावना असत. माणसाची भूक भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नसंपादन, आहारसिद्धता याबाबत लेखमालेच्या मागील भागांमध्ये विवेचन आलेले आहे. त्याचप्रमाणे मानवी समाजव्यवस्था विविध संक्रमणातून जात असतानाची स्थित्यंतरेही नोंदवलेली आहेत. या भागामध्ये मानवी जीवनात असलेले भय आणि त्या अनुषंगाने देव संकल्पनेची उत्पत्ती नि तिचा पुढील प्रवास याबाबत उहापोह केलेला आहे. भयवाटेने प्रवेश माणूस जंगलजीवी, टोळीजीवी असताना भय त्याला अनेक वाटांनी भेटीस येत असे. … पुढे वाचा »

शुक्रवार, १२ मे, २०२३

जल्पकांस—


  • ( शाहीर रामजोशी यांच्या पायीच्या धूलिकणातून फुटलेला अंकुर) ’कोर्ट’ चित्रपटामध्ये शाहिराच्या भूमिकेत वीरा साथीदार. गटागटाने ट्विटा मारूनि सोटा धरिशी का मनीं जगाची उठाठेव कां तरी? पोस्टीत अथवा ट्विटेत (१) हो का, रिळांत (२) घ्या हो कधी स्नेहाचे नांव निज अंतरी काय मनांत धरूनि इतरांशी वाकडे ही काय जगाचे हित करतिल माकडे आंतून थरकती, बाहेर वीर फाकडे अगा शेळपटा उगा स्वत:ला शूर म्हणविसी गड्या करुनि फुकाच्या काड्या भला जन्म हा तुला लाभला मनुष्यप्राण्याचा धरिशी का डूख अहि (३) सारखा ट्विटेट्विटेवर शिळा पडो या, बिळांत लपुनि फेका तरिही न होय ’तयाची’ (४) कृपा दर्भ वृत्तीचा मनीं धरोनी टोचशी कोणा फुका जाळिशी तव रुधिराला वृथा गुंडउदंडउद्दंड झुंड झुंडीची कृपा न सार्थक, वांझच सार… पुढे वाचा »

शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

कविचा वडा


  • https://pixers.hk/ येथून साभार. “डोंगराला आग लागलेली आहे... डोंगराला आग लागलेली आहे, आणि तू बटाटेवडा खातो आहेस...?” कविता सादर करणार्‍या कविने माझ्याकडे बोट दाखवले. मी दचकलो! बटाटेवडा निसटून चटणीमध्ये... आणि ड्रग्जचा व्हावा तसा मला चटणीचा ओव्हरडोस “... याला तूच जबाबदार आहेस!” ऐकणार्‍या चार जणांकडे फिरवून कविने बोट माझ्यावर रोखले. “पण मी कुठे लावली ती आग?” मी वड्यापासून तिखट चटणी निपटून काढत विचारले. “पण ती लागताक्षणीच विझवायला धावलाही नाहीस तू.” कविने डोळे वटारत म्हटले. “तू तरी कुठे विझवायला गेलास?” मी हेत्वारोप कम व्हॉटअबाऊटरी असा दुहेरी राष्ट्रीय तर्क अनुसरला. “पण मी कवी आहे आणि कविता वाचतो आहे.” कवी छाती फुगवून म्हणाला. “मी ही खादाड आहे आ… पुढे वाचा »

सोमवार, २४ एप्रिल, २०२३

ह्याला भाजप आवडत नाही... (ऊर्फ इलेक्शनचा ’गारवा’)


  • (’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा.) (कवि सौमित्र यांची क्षमा मागून...) ह्याला भाजप आवडत नाही, त्याला भाजप आवडतो. निकाल हाती आल्यावर हा त्याच्या तावडीत सापडतो. ’मी तुला आवडतो, पण भाजप आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.’ ’भाजप म्हणजे चिखल सारा, एक तू सुदृढ कमळ.’ ’भाजप म्हणजे हुकमी सत्ता, अमित किती प्रेमळ.’ ’भाजप नंतर दगा देतो, भाजप दगाबाजी’ ’भाजप म्हणजे वॉशिंग-मशीन, भाजप तरती होडी.’ ’भाजप म्हणजे मुरगळल्या माना, भाजप म्हणजे मुकी वरात.’ ’भाजपमध्ये, तपासातून सुटून, मन होऊन बसतं निवांत.' जेव्हा जेव्हा इलेक्शन येते, दरवेळी असं होतं सरकारवरून भांडण होऊन, लोकांमध्ये हसं होतं भाजप आवडत नसला, तरी … पुढे वाचा »

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

जम्प-कट - ४ : कुटुंबव्यवस्था आणि वारसा


  • टोळी ते समाज आणि माणूस « मागील भाग --- खाण तशी माती, झाड तशी कैरी जी. ए. कुलकर्णींच्या ’बखर बिम्म’ची मध्ये बिम्म आंब्याच्या झाडाला विचारतो की, ’तुझ्या झाडाला आंबेच का लागतात?’ त्या प्रश्नाला झाडाने दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणते, ’असेच काही नाही. माझ्या झाडाला संत्री, मोसंबी, सफरचंदे, केळी अशीही फळे लागतात. पण ती सर्व कैरीसारखीच दिसतात.’ तीन-चार वर्षे वयाच्या बिम्मची जिज्ञासू बुद्धी ज्या पातळीवर असते, त्याच पातळीवर टोळीमानवाचीही असावी. एखाद्या फळातून निघालेली बी रुजली तर त्यातून आलेल्या झाडाला परत तेच फळ येते, तसेच माणसाचे मूल हे माणसासारखेच असते हे त्याला समजत होते. अनुवांशिकतेचे वैज्ञानिक कोडे उकलण्यास अजून कित्येक सहस्रकांचा अवकाश असला, तरी निव्वळ निरीक्षणाच… पुढे वाचा »