Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

मी पुन्हा येईन...


  • सिद्धांत बेलवलकर या ’उभ्या-उभ्या विनोदवीराने’ त्याच्या एका सादरीकरणामध्ये खड्डेही ’मी पुन्हा येईन’ म्हणतात असा पंच घेतला. त्यावरुन स्फुरलेले हे विडंबन. https://twitter.com/MiPunhaaYein/photo येथून साभार. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन (समूहघोष) पाऊस पडला, खड्डे झाले, खड्ड्यांमध्ये तलाव झाले. लोक चिडले, नेत्याला भिडले, नेत्याचे आदेश निघाले कामगार कामाला लागले, डांबराची पिंपे घेऊन आले. डांबर खडीचे मिश्रण ओतले, तर खड्ड्यांतून आवाज आले... ॥१॥ (समूहघोष) घरात झुरळे फार झाली ताटावर त्यांनी चढाई केली जेवण्याचीही चोरी झाली घरची मंडळी त्रस्त झाली औषधे घेऊन माणसे आली सांदीकोपर्‍यात चढाई केली अखेरच्या झुरळाने माघार घेतली खिडकीतून जाताना गर्जना केली... ॥२॥… पुढे वाचा »

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश


  • फार पूर्वी लहानपणी पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या एका व्यक्तिचित्रात (पुस्तकाचे नाव बहुधा ’मणिदीप’ होते. चु. भू. द्या घ्या) काश्मीरचा राजा मातृगुप्त याच्या न्यायबुद्धीची एक लहानशी गोष्ट वाचनात आली होती. कुण्या एका व्यापार्‍याची शंभर सुवर्णमुद्रा असलेली पिशवी विहीरीत पडते. त्याचा शोक ऐकून एक साहसिक ’ती बाहेर काढून दिली तर मला काय द्याल?’ अशी विचारणा करतो. त्यावर व्यापारी म्हणतो, ’आता तसेही माझ्याहातून ते धन गेल्यात जमा आहे. बाहेर काढल्यावर तुम्हाला आवडेल ते मला द्या.’ म्हणतो. तो साहसिक ती पिशवी बाहेर काढून त्यातील एक सुवर्णमुद्रा व्यापार्‍याच्या हाती टेकवतो. व्यापारी अर्थातच संतापतो, राजाकडे दाद मागतो.’ वरकरणी परिस्थितीचे प्रेक्षक आणि अर्थातच खुद्द साहसिकाला ’व्यापार्‍याने म्हटल्यानुसार… पुढे वाचा »

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

‘लंगोटाची उपासना’ ऊर्फ ‘भूतकालभोग्यांची आस, आभास आणि अट्टाहास’


  • तुम्ही जन्माला येता, त्यानंतर सुरुवातीची एक दोन वर्षे तुमचे जन्मदाते/पालक तुम्हाला तुम्हाला लंगोटात लपेटून टाकतात. तुमचे नियंत्रण नसलेल्या उत्सर्जितांनी तो लंगोट खराब झाला, की बदलण्याचे कामही तेच करत असतात. सोबत तुम्हाला आहार देणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादि जबाबदार्‍याही त्या पालकांनीच स्वीकारलेल्या असतात. थोडक्यात तुम्ही तुमचे पालक आणि तो लंगोट यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असता. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने तुमची ’त्या आई-बापाचे मूल’ याहून कोणतीही वेगळी ओळख नसते. कारण अजून तुम्ही खूप लहान असता. स्वत:च्या पायावर उभे राहणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याला आवश्यक असणारे शारीर बळ, कुवत आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो. तुमच्या आयुष्यातील सर्वस्वी परावलंबी काळाचा आधार म्हणून त्या लंगोटाचे स्थान असते . … पुढे वाचा »

रविवार, १७ जानेवारी, २०२१

चर्चा अजून संपलेली नाही...


  • चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू. --- पोस्ट: या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू. प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का? प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात. प्रतिसाद ३: आपल्या देशातील … पुढे वाचा »

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

समीक्षक


  • (अनुभवातून...) अमुकचे नवीन विनोदी पुस्तक आले... तो म्हणाला... ’ह्यॅ: सगळा मध्यमवर्गीय कचरा. यात सामाजिक खोली नाही.’ तमुकची सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली. तो म्हणाला... ’ह्यॅ: संकुचित परिघात फिरते. तिला वैश्विक परिमाण नाही.’ ढमुकचा नवा कथासंग्रह आला. तो म्हणाला... ’ह्यॅ: उगाच आव आणणारे लेखन. घाटाचा नीट अभ्यास नाही.’ चामुकचा नवा कवितासंग्रह आला तो म्हणाला... ’ह्यॅ: पोज घेऊन केलेले लेखन. त्याला अनुभवसंपृक्ततेची जोड नाही. चापलूसचा नवा चारोळीसंग्रह आला तो म्हणाला... ’ह्यॅ: नुसत्या अनुभवाच्या रांगोळ्या. त्याला वैचारिक बैठक नाही.’ पामुकची (१) नवी कादंबरी आली. पानेही न फाडता तो म्हणाला... ’ह्यॅ: आपल्याकडे कुणाला जमणार नाही. कथानक असे खोल उतरले पाहिजे.’ आणि… पुढे वाचा »

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

... नाना म्हणाले


  • https://www.standingstills.com/ येथून साभार. आमच्यावेळी असं नव्हतं... नाना म्हणाले नातवाला चौथीत नव्वद टक्केच मिळाले ’फार लाडावून ठेवलाय आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले नातवाला पाचवीत अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले ’अभ्यासाच्या अतिरेकात मूल चिणेल आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले शाळेतल्या गॅदरिंगमध्ये नातीच्या नाचाचा कार्यक्रम झाला ’अभ्यास सोडून नसते धंदे, आमच्यावेळी असं नव्हतं...' नाना म्हणाले नातीला चौथीत स्कॉलरशिप मिळाली. ’पुस्तकी किडे झालेत सगळे, आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले मागच्या वर्षी पाऊस दोन दिवस उशीरा आला... ’हल्ली सदा दुष्काळच असतो आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले यावर्षी पाऊस दीड दिवस आधी आला ’सारे ग्लोबल व… पुढे वाचा »

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

दोन स्टँप


  • कुरियरच्या जमान्यात लोक स्टँपला विसरलेत म्हणे. पूर्वी, प्रेमपत्र असो की वसुलीची नोटीस स्टँप लावायचा की पोस्टखाते निर्लिप्तपणे पत्र इच्छितस्थळी पोचवायचे. म्हणे, आता दोन नवे स्टँप आलेत यांना पैसेही द्यावे लागत नाहीत काहीही खपवायचे असले की या दोनपैकी एक चिकटवा नि समाज तुम्हाला हवे ते निमूटपणे शिरोधार्य मानतो या दोन स्टँपची छपाई थेट केंद्रीय पातळीवर होते ज्यांना हवे त्यांना ते फुकट मिळतात, अट एकच... ते न वापरणार्‍यांना सतत दूषणे द्यायची दूषणे देणॆ हे आवडीचे काम जनता अतिशय आनंदाने करते स्टँप लावलेली रिकामी पाकीटे नि पॅकेट्स संपत्ती म्हणून मिरवते आणि स्टँप न लावलेले कितीही उपयुक्त असले तरी बाणेदारपणे फेकून देते... रिकाम्यापोटी पाठवण्याजोगे काहीच नसलेले लो… पुढे वाचा »

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

वाचाळ तू मैत्रिणी


  • (रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.) एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली. एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्‍याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्‍यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला... भाष्यचित्रकार: सतीश आचार्य. … पुढे वाचा »