Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २६ जून, २०२१

आपले गिर्‍हाईक कोण?


  • पूर्वी पुण्याच्या कर्वेनगर भागात राहात असतानाची गोष्ट आहे. चौकात एक कळकट हॉटेल होते. जेमतेम चार बाकडी बसतील इतकी जागा पुढे, आत एक माणूस कसाबसा उभा राहील नि बाजूला एक लहानसे टेबल बसेल इतपत जागा ’किचन’ म्हणून. हॉटेल नावालाच, कारण सतत उकळणारा चहा, आदल्या दिवशी संध्याकाळी केलेले वडे, मिसळ, दगड झालेली इडली आणि सांबार असे अक्षरश: एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदार्थ तिथे मिळत. आमच्या ’बिडी’वाल्या मित्रांना शेजारच्या पानवाल्याकडे सिगारेट मिळे. मग त्यांची सिगारेट नि आम्हा 'फुंकसंप्रदायी' नसलेल्यांसाठी हॉटेलातून मागवलेला चहा यावर तिथे चकाट्या पिटणे चालत असे. हॉटेलचा मालक एक पैलवान होता ( अगदी सुरुवातीच्या काळात होटेलच्या नावाखाली ’पैलवानाचे हॉटेल’ अशी ठसठशीत टॅगलाईनही होती. ) नि त्याच्याहून नि… पुढे वाचा »

सोमवार, २४ मे, २०२१

व्हॉट्सअ‍ॅपपे आया था


  • चार पाच वर्षांपूर्वी एक चॅनेल पत्रकार लोकांमध्ये फिरुन त्यांच्याशी संवाद साधत होता. त्यातील अतीव गुळगुळीत मेंदूच्या बाईने ’नेहरु मुस्लिम होते’ असा दावा केला.' कशावरुन’ असा प्रश्न पत्रकाराने केला असता, ’व्हॉट्सअ‍ॅपपे आया था’ असे उत्तर दिले होते. त्यावरुन हे सुचले. त्या बाईप्रमाणेच गुळगुळीत मेंदू असलेल्या सर्वांना ही कविता सादर अर्पण. भाष्यचित्रकार: सतीश आचार्य. नेहरु असलमें मुस्लिम थे... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । ’चले जाव’ आंदोलन मोदीजीने किया था... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । दूसरा विश्वयुद्ध संघ ने जीता था... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । अगले दो सालमें सब अरबपती होंगे... ...व्हॉट्सअ‍ॅपपे आया था । मंगलवासी संस्कृतम… पुढे वाचा »

शुक्रवार, २१ मे, २०२१

जैत रे जैत : I couldn't go home again


  • मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या वाटेने जात एक मानदंड निर्माण करणारे जे चित्रपट आहेत त्यात दोन-तीन दशकांहून अधिक काळ ज्याचा बोलबाला टिकून राहिला असे मोजकेच. गाव-पाटील आणि त्याने केलेला अन्याय, त्याविरोधात बंड करुन उठलेला कुणी तरुण, या दोन्हीवर लावणी आणि लावणीवालीचा तडका; सोशिक शेतकरी; प्रेमस्वरुप आई; फुलाला फूल धडकून ज्यांच्या प्रेमाचा इजहारे इश्क पडद्यावर होतो असे माफक प्रणयपटू नि त्यांची कथा; हसण्या-हसवण्याच्या वाटेने गल्ला जमा करत गेलेले चित्रपट आणि अर्थातच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या काळातील कथानकांच्या आधारे मांडलेले कथानक... हे मराठी चित्रपटाचे ढोबळ प्रवाह. राजकारणातल्या डावपेचांचा आणि त्यावर परिणाम घडवणार्‍या समाजकारणाचा वेध घेणारा एखादा सिंहासन (१९७९), आपल्या एका प्रश्नानेच गावच्या सत्ताधार्‍याच्या मनात द्वंद्व … पुढे वाचा »

रविवार, २ मे, २०२१

काय रेऽ देवा... (पुन्हा)


  • आता पुन्हा निवडणूक येणार मग मोदींना कंठ फुटणार मग मध्येच राऊत बोलणार मग पुन्हा वैताग येणार... काय रेऽ देवा... मग तो वैताग कुणाला दाखवता नाही येणार... मग मी तो लपवणार... मग लपवूनही तो कुणाला तरी कळावंसं वाटणार... मग ते कुणीतरी ओळखणार... मग मित्र असतील तर ओरडणार... भक्त असतील तर चिडणार... मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार... आणि या सगळ्याशी ठाकरेंना काहीच घेणं-देणं नसणार... काय रेऽ देवा... मग त्याच वेळी दूर टीव्ही चालू असणार... मग त्यावर अर्णब ओरडत असणार... मग त्याला अंजनाची साथ असणार... मग सुधीरनेही गळा साफ केला असणार... मग तिथे उपाध्येही आलेले असणार... मग तू ही नेमकं आत्ता एन्डीटीव्हीच पाहात असशील का असा प्रश्न पडणार मग उगाच डोक्यात थोडेफार गरगरणार मग ना घेणं ना देणं पण … पुढे वाचा »

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

लॉकडाऊनची धुळवड


  • गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊनमधील बंधने टप्प्या-टप्प्याने सैल करत दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. एक-दोन महिन्यात पुन्हा संसर्गाने उचल खाल्ली असता पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. त्यावर पुण्यातील व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणाले, ’लॉकडाऊनमुळे काहीही फायदा झालेला नाही, कोरोना वाढतोच आहे.’ इतके ठाम विधान ऐकून मला हसू आले होते. अर्थात उलट दिशेने ’वा: लॉकडाऊनचा खूप फायदा झाला बघा’ म्हणून कुणी प्रत्युत्तर दिले असते तरी मला त्या ठामपणाचेही हसू आलेच असते. याचे कारण म्हणजे फायदा झाला नाही म्हणणारे ’नाही रे’ लोक किंवा झाला म्हणणारे ’आहे रे’ लोक हे दोघेही त्यांच्या पूर्वग्रह आणि मुख्य म्हणजे स्वार्थाच्या आधारे ’ठोकून देतो ऐसा जी’ करत असतात. त्या विधानांमागे माहिती, डेटा, विश्लेषण वा मूल्यमापनाचा भाग नसतो . … पुढे वाचा »

रविवार, २१ मार्च, २०२१

बालक - पालक


  • मागील आठवड्यात तीन दशकांपूर्वी बॉलिवूडमध्ये कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या स्मृती विश्वास यांच्या वृद्धापकाळातील दारूण स्थितीबाबत बातमी वाचली. काही काळापूर्वी अशाच स्वरुपाची बातमी गीता कपूर या तुलनेने दुय्यम अभिनेत्रीबाबत वाचण्यास मिळाली होती. कारकीर्दीच्या भरात असताना मिळवलेला पैसा हा पुढची पिढी, नातेवाईक किंवा स्नेह्यांमुळे बळकावल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक विपन्नतेचा सामना करावा लागल्याची ही उदाहरणे. गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली होती. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळाली. आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे… पुढे वाचा »

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

मी पुन्हा येईन...


  • सिद्धांत बेलवलकर या ’उभ्या-उभ्या विनोदवीराने’ त्याच्या एका सादरीकरणामध्ये खड्डेही ’मी पुन्हा येईन’ म्हणतात असा पंच घेतला. त्यावरुन स्फुरलेले हे विडंबन. https://twitter.com/MiPunhaaYein/photo येथून साभार. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन (समूहघोष) पाऊस पडला, खड्डे झाले, खड्ड्यांमध्ये तलाव झाले. लोक चिडले, नेत्याला भिडले, नेत्याचे आदेश निघाले कामगार कामाला लागले, डांबराची पिंपे घेऊन आले. डांबर खडीचे मिश्रण ओतले, तर खड्ड्यांतून आवाज आले... ॥१॥ (समूहघोष) घरात झुरळे फार झाली ताटावर त्यांनी चढाई केली जेवण्याचीही चोरी झाली घरची मंडळी त्रस्त झाली औषधे घेऊन माणसे आली सांदीकोपर्‍यात चढाई केली अखेरच्या झुरळाने माघार घेतली खिडकीतून जाताना गर्जना केली... ॥२॥… पुढे वाचा »

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश


  • फार पूर्वी लहानपणी पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या एका व्यक्तिचित्रात (पुस्तकाचे नाव बहुधा ’मणिदीप’ होते. चु. भू. द्या घ्या) काश्मीरचा राजा मातृगुप्त याच्या न्यायबुद्धीची एक लहानशी गोष्ट वाचनात आली होती. कुण्या एका व्यापार्‍याची शंभर सुवर्णमुद्रा असलेली पिशवी विहीरीत पडते. त्याचा शोक ऐकून एक साहसिक ’ती बाहेर काढून दिली तर मला काय द्याल?’ अशी विचारणा करतो. त्यावर व्यापारी म्हणतो, ’आता तसेही माझ्याहातून ते धन गेल्यात जमा आहे. बाहेर काढल्यावर तुम्हाला आवडेल ते मला द्या.’ म्हणतो. तो साहसिक ती पिशवी बाहेर काढून त्यातील एक सुवर्णमुद्रा व्यापार्‍याच्या हाती टेकवतो. व्यापारी अर्थातच संतापतो, राजाकडे दाद मागतो.’ वरकरणी परिस्थितीचे प्रेक्षक आणि अर्थातच खुद्द साहसिकाला ’व्यापार्‍याने म्हटल्यानुसार… पुढे वाचा »