Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २९ मे, २०२५

मूषकान्योक्ती


  • १. सारी धुमश्चक्री संपली. सारे आवाज शांत झाले. थोडा वेळ गेला नि मूषकराज न्हाणीघराच्या बिळातून बाहेर डोकावता झाला. त्याने कानोसा घेतला. घरात शांतता असल्याची खात्री झाल्यावर तो बाहेर आला. तेथून तो माजघरात प्रवेश करता झाला. कानोसा घेऊन घरची स्त्री तिथे नसल्याची खात्री करुन घेतली. मग तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला. घरात नि घराबाहेर मघाशी झालेल्या हाणामारीतील जखमी मंडळी परसात नि मागच्या वाडीमध्ये दिसत होती. त्यांची तावातावाने काही चर्चा चालू होती. इतक्या दूरवरुन त्यातील तपशील ऐकू येत नव्हता. मूषकराज वैतागला. त्याने मागचे दार आतून बंद असल्याची खात्री करुन घेतली नि मग तो खिडकीच्या एका गजावर उभा राहिला. त्या सार्‍यांना दरडावणारे एक जोरदार भाषण त्याने ठोकले. पण ख… पुढे वाचा »

शुक्रवार, २३ मे, २०२५

सुजन गवसला जो


  • ‘गाणार्‍याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा. परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते. त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही. मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला ब… पुढे वाचा »

गुरुवार, २२ मे, २०२५

क्रिकेटमधील उपेक्षितास दाद


  • क्रिकेटमध्ये पंच हा प्राणी तेवढाच लोकप्रिय आहे जेवढे निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम ! प्रातिनिधिक स्थिरचित्र. https://www.sportskeeda.com/ येथून साभार. आपण जिंकलो, तर ‘पंचाची कामगिरी नि:पक्ष होती’ असा गौरव करायचा किंवा ‘ते ही शेवटी माणूसच आहेत’ अशी मखलाशी करायची. जर हरलो, तर त्यांचा वापर हुकमी बळी म्हणून खापर फोडण्यास (म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिम, पुरोगाम्यांसाठी मध्यमवर्ग वगैरे वगैरे) त्यांचा वापर करायचा हे ठरलेले असते. त्यातच DRS म्हणजे Digital Review System (त्यालाही मागास भारतीय मानसिकतेच्या बीसीसीआयने बराच काळ ‘बिनचूक नाही’ या बिनडोक तर्कास पुढे करुन रोखून धरले होते.) आल्यापासून पंच हे अधिकच दडपणाखाली काम करु लागले आहेत. त्यांना एखादा निर्णय मिलिसेकंदात घ्यायचा … पुढे वाचा »

रविवार, १८ मे, २०२५

बाबेलचा दुसरा मनोरा


  • फार फार... फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्‍या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता. The Tower of Babel. पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मन… पुढे वाचा »

रविवार, ११ मे, २०२५

Will He...?


  • रोममधील कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर नवे पोप म्हणून चर्चच्या सर्वोच्चपदी आरूढ झालेले Robert Fancis Prevost हे गणित विषयातील पदवीधर आहेत. या संयोगवश सुचलेली ही कविता. Will He...? Pope Leo XIV Is it a new hope, if a Mathematician becomes a Pope? Will he count fractions, and not just whole numbers? Will he be rational, filter out infinite irrational? Will he prefer integration over the age-old differentiation? Will he draw a line with a color other than white? Will he connect to the point outside his circle? Will he...? पुढे वाचा »