Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे


  • कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं ‘असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी’, पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते. एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे ‘विशेष आकर्षण’ घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘सनी लिओन’ असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप … पुढे वाचा »

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

तो कलकलाट होता...


  • काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. ( जिथे लिहिला, त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला .) त्यात एक मुख्य धागा होता, तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे; नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे संदर्भ देत ते लेखन अनेक ठिकाणी उल्लेखनीय मानले गेल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता. निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या, नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती. खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्‍याचा आभास निर्माण करणे, हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार … पुढे वाचा »

गुरुवार, २ जून, २०१६

आपलं आपलं दु:ख


  • गालव हा विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य. शिक्षण समाप्तीनंतर कोणतीही गुरुदक्षिणा न मागता गुरुंनी त्याला घरी परत जाण्यास अनुमती दिली. पण गुरुदक्षिणा देण्यास गालव हटून बसला. संतापलेल्या गुरुंनी मग ‘ज्यांचा एकच कान काळा आहे, असे आठशे पांढरेशुभ्र घोडे’ गुरुदक्षिणा म्हणून मागितले. असली विचित्र गुरुदक्षिणा ऐकून गालव स्तंभित झाला नि त्याने विपुल शोक केला. मग असे घोडे मिळवण्यासाठी मदत मागायला तो सम्राट ययातीकडे आला. त्याच्याकडे असे घोडे नव्हते, पण आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवणे हे त्याच्या राजेपणाला न शोभणारे. मग तो आपल्या राजेपणाला शोभेसा(?) तोडगा त्यावर काढला. ‘रुपगुणाची खाण’ अशी ख्याती असलेली आपली कन्या ‘माधवी’ त्याने गालवाला दिली नि ‘तिच्या सहाय्याने तू घोडे मिळवू शकशील’ असा सल्ला त्याला दिला. पण हे करतानाच ययातीने अशी अट घातली होती की, ‘ति… पुढे वाचा »

गुरुवार, २६ मे, २०१६

वादे वादे जायते वादंग:


  • ( एका – बहुधा तथाकथित सवर्ण वर्गात मोडणार्‍या – फेसबुक-मित्राने एका पोस्टमध्ये असा मुद्दा मांडला होता, की ‘सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.’ एरवी जात या विषयावर न लिहिण्याचा माझा दंडक मोडून त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ) --- अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. ‘इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल’ हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे. एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असेही लोक आहेत, तसेही लोक आहेत. त्यातल्या टीकेच्या सोयीचे प्रकारचे लोक हे ‘प्रातिनिधिक’ समजून वागत गेलो तर धागे जुळणारच नाही. एक नक्की की, द्वेषाचे पेरणी अ… पुढे वाचा »

शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

ऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे


  • रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी   << मागील भाग दरवर्षी ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, दुसरेच कुणी लायक कसे होते, याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्‍या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते. पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात. ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे. यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात ‘ब्रेकिंग न्यूज’ नसते; सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आ… पुढे वाचा »

सोमवार, २१ मार्च, २०१६

एवरीबडी लव्ज् रेमंड...


  • विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट विस्तारासह ‘ बोर्डचाट्याच्या शोधात ’ या शीर्षकाखाली ‘ वेचित चाललो... ’ या ब्लॉगवर हलवली आहे. - oOo - पुढे वाचा »

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

ते काहीच म्हणाले नाहीत...


  • काल ‘ते म्हणाले’ , आज ‘ ’ते काहीच म्हणाले नाहीत‘ ’. त्यांना फारच डिवचलं तेव्हा म्हणाले, ‘There I spoke, here I remain silent’ त्यांचे आडगल्लीतले उपाध्यक्ष म्हणाले ‘याची जीभ कापा, पाच लाख देतो’ ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांचे लोकनियुक्त खासदार म्हणाले ‘याची तंगडी मोडा, अकरा लाख देतो’ ... ते काहीच म्हणाले नाहीत... यांच्या ‘संन्यासी’ नेत्या म्हणाल्या ‘त्यांना’ पुरे निखंदून काढा ... ते काहीच म्हणाले नाहीत त्यांची चिल्लीपिल्ली म्हणाली ‘त्या’ लोकांना गो़ळ्या घाला ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांचा ओसाडवाडीचा नेता म्हणाला ‘ते’ सगळे देशद्रोही आहेत, ठार मारा ... ते काहीच म्हणाले नाहीत... त्यांची वानरसेना म्हणाली सगळ्या पुरोगाम्यांना फाशी द्या ... ते काहीच म्हणाले नाह… पुढे वाचा »

गुरुवार, १७ मार्च, २०१६

ते म्हणाले...


  • ते म्हणाले, तुम्ही ‘भारतमाता की जय’ म्हटलेच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले ‘जय जगत्’, कुणी म्हणाले, ‘आम्ही म्हणणार नाही.’ नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराज की जय’ म्हटलेच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले ‘केम?’, कुणी म्हटले ‘आम्ही म्हणणार नाही’ नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले. ते म्हणाले, तुम्ही ‘वंदे मातरम्’ म्हटलेच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले गोल टोपीवाले म्हणाले, ‘आम्ही म्हणणार नाही.’ नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले. ते म्हणाले, तुम्ही तिरंगा उंच फडकवलाच पाहिजे बरेच कुणी बरेच काही खुश झाले तळमजल्यावरचे म्हणाले ‘आम्हाला शक्य नाही.’ तळमजल्यावरच्यांना त्यांनी ‘निलंबित’ केले. ते म्हणाले, ‘जय श्रीराम, जय रामराज्य… पुढे वाचा »