Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

नाचत ना...


  • (काव्यशार्दुल गोविंदाग्रज यांना स्मरून ) नाचत ना भाजपात, आता । राकाँच्या कळपात, नाथा ॥ आणिक होती, चिकी मावशी (१) । तावडेंची उलघाल, नाथा ॥ खुर्ची उलटली, सत्ता हरपली । काकांच्या फटक्यात, नाना ॥ तो तर वरती, नवबिहारी (२) । सर्व हताश पाहात, नाना ॥ --- गीत: काव्यकार्टुन संगीत: आताबास्कर संगीत मंडळी गायक: चंद्रकांत छोटीमिशी (कोरस: आयटीसेल) नाटक: सं. खुर्चीप्रभाव राग: मुन्शिपाल्टी कानडा चाल: उद्धवा नेऊ नको नाथास … पुढे वाचा »

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ‘मल्ल्याला सल्ला’)


  • https://blogs.navbharattimes.indiatimes.com/ येथून साभार. (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून ) अब्ज अब्ज जपून ठेव, कोहिनूर हिर्‍यापरी ॥ ध्रु.॥ काय बोलले जन हे, विसरुन तू जा सगळे, जमविली जी माया तू, जाण अंती तीच खरी ॥ १ ॥ लाज नको पळताना, खंत नको स्मरताना काळ जाता विसरिल रे, जनता ही तुज सहजी ॥ २ ॥ राख लक्ष स्वप्नांची, हतबल त्या गरीबांची, तव कृपेने बुडले जे, उडु दे वार्‍यावरी ॥ ३ ॥ - मजेत पेडगांवकर - oOo - --- संबंधित लेखन: अशी ही पळवापळवी >> अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >> --- पुढे वाचा »

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

मुंबईत वीज गेली...


  • मुंबईत वीज गेली म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले पंजाबमधील शेतकर्‍यांना पाठिंबा देणारा नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला. कंगनाने ट्विट करुन त्यातील व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे यावर कम्युनिस्ट विचारवंताने एकशे तेरावा लेख लिहिला आणि सायक्लोस्टाईल करुन आपल्या मित्रांना पाठवला माहिती अधिकाराचा वापर करुन मोराच्या पिसांची संख्या राहुल गांधीनी माहिती करुन घेतली कपिल सिब्बल यांनी त्याबाबत सोनियांकडे तक्रार केली आपले तिकिट कापण्यामागे मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा गुप्त … पुढे वाचा »

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

टीव्ही लागले रे, टीव्ही लागले


  • (कविवर्य शंकर रामाणी यांची क्षमा मागून) टीव्ही लागले रे, टीव्ही लागले कुणाच्या घरातिल टीव्ही लागले रवीची प्रभा मंद अंधूकताना याने लावले रे, त्याने लावले! दिसा कष्टुनि जे जाहले श्रमी जन सारे अखेरीस सैलावले इथे कावलो मी, सर्व गलग्यामुळे मनी प्रार्थना, वीज घालवाच रे सुरू बातम्या या कुणाच्या घरी कुणी हास्यजत्रेत हो दंगले संत्रस्त मम मनाच्या तळीचे शिवीसूक्त हे ओठातुनि ओघळे - सतत त्रस्तमी (ऊर्फ मंदार काळे) - oOo - ( मित्रवर्य उत्पल व. बा. यांच्या सहकार्याने...) इथे पत्रकारितेची पडली शवे त्यावरी नफ्याची गगनचुंबी घरे स्क्रीन जयाचा बुद्धी शोषून घेतो त्या इडियटाचे पिसे लागले रे टीव्ही लागले रे...टीव्ही लागले... - oOo - पुढे वाचा »

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

मी कवी होणारच!


  • तो म्हणाला, मी कवी होणारच! मग त्याने कवी होण्याचे प्लॅनिंग केले मार्केट रिसर्च एजन्सीला गाठले, काव्य-बाजाराचा कानोसा घेऊन खपाऊ विषयांवर अ‍ॅन्युअल रिपोर्ट बनवून देण्याचे काँट्रॅक्ट दिले सर्वात प्रथम सौंदर्यवादाचा अंगरखा त्याने लपेटून घेतला गारवा, पारवा, मारवाच्या जुड्या बांधून जय्यत तयार ठेवल्या हिरव्या माडांच्या एका बनात वळणावळणाच्या लाल वाटेवर प्राजक्तापासून सायलीपर्यंत, बहाव्यापासून पिंपळापर्यंत सारे समोर राहतील अशा एका घरात मुक्काम हलवला सुलभ मराठी व्याकरणाचे एक स्वस्त पुस्तक आणले मग शब्दांचे मात्रांशी, मात्रांचे आकड्यांशी गणित ठाकून ठोकून जुळवत कविता लिहायला लागला यथावकाश शंभरेक कविता अगदी नेटाने खरडून झाल्या फेसबुकवर शे-सव्वाशे लाईक जमा करू लागल्य… पुढे वाचा »

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

माजी मुख्यमंत्र्याचे खुर्चीस प्रेमपत्र


  • https://seenpng.com/ येथून साभार. (कविवर्य अनिल यांची क्षमा मागून) थकले गं डोळे माझे वाट तुझी पाहता वाट तुझी पाहता गं रात्रंदिन जागता सुकला गं कंठ माझा आरोपां आळविता आरोपां आळविता गं ध्यान तुझे करिता सरले गं मित्र माझे मजला तू त्यागता मजला तू त्यागता गं अन् त्याची* हो जाया शिणला गं जीव माझा तुजविण राहता तुजविण राहता गं तू नच भेटता - स्वप्निल (ऊर्फ मंदार काळे) - oOo - * सांगा पाहू तो कोण? पुढे वाचा »

एका एरॅटिक*-नेटग्रस्ताची कैफियत


  • https://i1.wp.com/amitguptaz.com/ येथून साभार. (कविवर्य आरती प्रभू यांची क्षमा मागून) ते येते आणिक जाते येताना काही बिट्स (१) आणते अन् जाताना टाटा करते येणे-जाणे, डालो (२) होणे असते असे जे न कधी पुरे होते येताना कधी मध्ये थांबते तर जाताना एरर देते न कळे काही उगीच काही आकळत मज काही नाही कारणावाचून उगीच का हे असे अडते? येतानाची कसली रीत, बाईट्स (३) ऐवजी देई ते बिट जाताना कधी हळूच जाई येण्यासाठीच फिरुन जाई प्रकट होते, विरुन जाते, जे टवळे - चालूदे प्रभू (ऊर्फ मंदार काळे) - oOo - (१). बिट्स (Bits) हे संगणकामध्ये साठवणुकीचे असलेले एकक.   (२). आभासीविश्वातील ‘शॉर्टहॅंड मराठी’मध्ये ‘डाऊनलोड’साठी वापरला जाणारा शब्द.   (३). संगणकाच्या साठ… पुढे वाचा »

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

कर्तव्यच्युत पेस्टकंट्रोलयोध्याप्रत...


  • (कविवर्य वा. रा. कांत यांची क्षमा मागून) झुरळांची माळ पळे, अजुनि मम घरात भेट आपुली स्मरशी काय तू मनात ? पेरिता फडताळी तू थेंब त्या द्रवाचे कोण्या छिद्रात असे कोण बैसलेले हलकट ते झुरळ लपे छान सुशेगात त्या वेळी, ओट्यावर, आणि तयाखाली स्वर्णिमाच* जणू पसरे, भर दिवसा काली फिरत असे, टिच्चून ते, माझिया घरात हातांसह स्प्रेगनने तुवा लढताना हर्बलाचे करडे कळे, मळुनि लावताना मिशीधारी झुरळ तुज, खिजविते खलात** तू गेलास, सोडुनि ती माळ, काय झाले, सरपटणे ते तयांचे, अजुनि उरे मागे स्मरते ती, पलटण का, कधि तुझ्या मनात? - चिं. ता. क्रांत (ऊर्फ मंदार काळे) - oOo - * स्वर्णिम अर्थात सोनेरी रंगाचे झुरळ ** खल आणि बत्ता जोडीतील पुढे वाचा »